चिलगव्हाणमध्ये उपवासाला परवानगी नाकारली 

साहेबराव करपे यांच्या कुटुंबीयांची आत्महत्येच्यास्मृतिदिनी चिलगव्हाण येथे सामूहिक उपवास केला जातो. या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता प्रशासनाने या कार्यक्रमास परवानगी नाकारली आहे.
 चिलगव्हाणमध्ये उपवासाला  परवानगी नाकारली Fasting in Chilgavan Permission denied
चिलगव्हाणमध्ये उपवासाला  परवानगी नाकारली Fasting in Chilgavan Permission denied

यवतमाळ : देशातील पहिली शेतकरी आत्महत्या म्हणून साहेबराव करपे यांच्या कुटुंबीयांची आत्महत्या मानली जाते. गेल्या पाच वर्षांपासून त्यांच्या स्मृतिदिनी चिलगव्हाण येथे सामूहिक उपवास केला जातो. या वर्षी मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता प्रशासनाने या कार्यक्रमास परवानगी नाकारली आहे. अवघ्या पाच लोकांच्या उपस्थितीत करपे कुटुंबीयांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम होईल, अशी माहिती मनिष जाधव यांनी दिली. 

महागाव तालुक्यातील चिलगव्हाण येथील प्रयोगशील शेतकरी साहेबराव करपे यांनी कृषी क्षेत्रातील विवंचनेमुळे पत्नी, तीन मुली व एका मुलासह वर्धा जिल्ह्यात आत्महत्या केली होती. दत्तपूर येथे आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी तत्कालीन प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या नावे चिठ्ठी लिहून ठेवली होती. शेतीसमोरील अडचणींचा ऊहापोह यात करण्यात आला होता.

विशेष म्हणजे साहेबराव करपे हे चिलगव्हाणचे अनेक वर्षे सरपंच होते. त्या सोबतच या परिसरात प्रयोगशील शेतकरी म्हणून देखील त्यांची ओळख होती. त्यांच्या आत्महत्येमुळे मोठ्या प्रमाणावर हळहळ व्यक्त करण्यात आली. त्या सोबतच देशातील पहिली शेतकरी आत्महत्या म्हणून देखील याची नोंद झाली. त्यांच्या स्मृतिदिनी गेल्या पाच वर्षापासून चिलगव्हाण या त्यांच्या मूळ गावी सामूहिक उपवास केला जातो.

राज्यभरातील शेतकरी या निमित्ताने चिलगव्हाणला येतात. या वर्षी देखील साहेबराव करपे कुटुंबीयांना अभिवादन, त्या सोबतच शेतकरी विरोधी कायदे रद्द करावेत, या मागणीच्या पूर्ततेसाठी शेतकरी चिलगव्हाणला येणार होते. शेतकरी नेते अमर हबीब यांचा देखील यामध्ये समावेश होता. या संदर्भाने आयोजक मनीष जाधव यांनी प्रशासनाकडे परवानगी मागितली होती. परंतु कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाने या कार्यक्रमास परवानगी नाकारली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com