Agriculture news in marathi, Fasting of contract staff at Parbhani Veterinary College | Agrowon

परभणीत पशुवैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे उपोषण
टीम अॅग्रोवन
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

परभणी : पूर्वलक्षी प्रभावाने कायम सेवेत नियुक्ती द्यावी, चार महिन्याचे थकित वेतन तत्काळ द्यावे, आदी मागण्यांसाठी येथील पशुवैद्यक आणि पशुविज्ञान महाविद्यालयातील अकरामाही कंत्राटी कर्माचाऱ्यांनी मंगळवारी (ता.१३) महाविद्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केले.  

परभणी : पूर्वलक्षी प्रभावाने कायम सेवेत नियुक्ती द्यावी, चार महिन्याचे थकित वेतन तत्काळ द्यावे, आदी मागण्यांसाठी येथील पशुवैद्यक आणि पशुविज्ञान महाविद्यालयातील अकरामाही कंत्राटी कर्माचाऱ्यांनी मंगळवारी (ता.१३) महाविद्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केले.  

येथील पशुवैद्यक आणि पशुविज्ञान महाविद्यालयातील चतुर्थ श्रेणीतील रिक्त पदावर सेवा जेष्ठतेनुसार अकरामाही कंत्राटी पध्दतीने ११ नोव्हेंबर २०११ पासून ३० कंत्राटी कर्मचारी काम करत आहेत. तांत्रिक खंड वगळता हे कर्मचारी नियमित कामांवर आहेत. वेळोवेळी आंदोलने करुनही या कर्मचाऱ्यांचा कायम सेवेत सामावून घेण्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ प्रशासनाने पूर्ण नियुक्त्या रोखण्याचे ठोस असे कोणतेही कारण सांगितले नाही. तसेच नियुक्त्याही दिलेल्या नाहीत. त्यामुळे सेवा ज्येष्ठतेमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेठीस धरून वेठबिगार करण्याचे धोरण अवलंबिले गेले. 

या कर्मचाऱ्यांचे गेल्या चार महिन्यांचे वेतन थकीत आहे. त्यामुळे कुटुंबाच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. म्हणून या मागण्या मान्य कराव्यात. कृषी विद्यापीठांतील कामगारांप्रमाणे २४ जुलै २०१५ पासून सेवा नियमित करून कायम आस्थापनेवर नियुक्त्या द्याव्यात, या मागण्यांसाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मंगळवापासून उपोषण सुरू केले आहे.

इतर बातम्या
बीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९...उस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम...
खानदेशात शेतीकामात मजूरटंचाईजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व...
पोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्यविटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना...
वनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा...कडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र...
नाशिक जिल्ह्यात पावसामुळे पूर्वहंगामी...नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे...
नांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर...नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या...
कर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ...जळगाव  : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली....
पुणे विभागात खरिपाची नऊ लाख ८० हजार...पुणे  ः पावसाअभावी खरीप पेरण्या उशिराने...
कुठे गेला कृत्रिम पाऊस ; सरकारने...बदनापूर / भोकरदन, जि. जालना ः अर्धे राज्य...
रासप ५७ जागांची मागणी करणार : महादेव...हिंगोली  : आगामी विधानसभा निवडणुकीत...
मुंबई बाजार समितीच्या निवडणुकीची ‘...पुणे  ः चटई निर्देशाकांसह कोट्यवधी...
अकोला जिल्ह्यात ‘आत्मा’चा कारभार...अकोला  ः राज्याच्या कृषी विभागात कधीकाळी...
कऱ्हाडमधील ९९ शाळांना बसला महापुराचा...कऱ्हाड, जि. सातारा  : महापुरामुळे...
गडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे १७९७...गडचिरोली  ः या वर्षी अतिवृष्टीमुळे...
शेततळ्याच्या प्लॅस्टिकला तूर्त अनुदान...पुणे  : शेततळ्याच्या अस्तरीकरणाकरिता...
वारणा-कृष्णा नदीकाठच्या शेतजमिनी कोसळू...सांगली ः सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा...
जालना जिल्ह्यात वीस हजार शेतकऱ्यांच्या...जालना : जिल्ह्यातील १२० गावांत हवामान अनुकूल...
दर्जाहीन शिक्षण संस्थांवर कारवाई होणार...पुणे: राज्यात दर्जाहीन कृषी महाविद्यालये...
अवर्षणप्रवण, आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांत...अकोला ः राज्यातील अवर्षणप्रवण क्षेत्र,...
महिनाअखेरीस पावसाला पोषक हवामानपुणे : ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला राज्यात दमदार...