जानेवारीच्या अखेरीस उपोषण

शेतकऱ्यांच्या हिताच्या मागण्यांसाठी पुन्हा उपोषणाचा इशारा दिल्यानंतर आता भाजपचे नेते भेटीसाठी येत असले तरी आपण उपोषणावर ठाम आहोत.
जानेवारीच्या अखेरीस उपोषण Fasting at the end of January
जानेवारीच्या अखेरीस उपोषण Fasting at the end of January

नगर : शेतकऱ्यांच्या हिताच्या मागण्यांसाठी पुन्हा उपोषणाचा इशारा दिल्यानंतर आता भाजपचे नेते भेटीसाठी येत असले तरी आपण उपोषणावर ठाम आहोत. गेल्या चार वर्षांपासून केंद्र सरकारशी संघर्ष सुरू आहे. दिल्लीत व राळेगण सिद्धीत उपोषण केल्यानंतरही केंद्र सरकारने दिलेली दोन्ही लेखी आश्वासने पाळली नाहीत. आता आणखी एक महिनाभर वाट पाहीन नाहीतर जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात नवी दिल्लीतील रामलीला किंवा जंतरमंतरवर शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शेवटचे उपोषण सुरू करणार असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटले आहे.   केंद्र सरकारला उपोषणाचा इशारा दिल्यानंतर विधानसभेतील माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे व खासदार डॉक्टर भागवत कराड यांच्या नंतर गुरुवारी (ता. २४)  माजी मंत्री गिरीश महाजन यांनी हजारे यांची भेट घेऊन दीड तास चर्चा केली होती.  त्या बाबत बोलताना हजारे म्हणाले, ‘‘राज्य सरकारने सूचविलेल्या हमीभावापेक्षा केंद्रीय कृषीमूल्य आयोगाकडून ४० ते ५० टक्के हमीभाव कमी केला जात आहे. केंद्राने स्वामिनाथन आयोगाचा अहवाल स्वीकारला आहे. संसदेत शेतमालाला उत्पादन खर्चावर दीडपट हमीभाव देण्याचे जाहीर केले  आहे. मात्र वास्तव वेगळेच असल्याचे दिसून येते.’’ रामलीला मैदानाची आंदोलनासाठी मागणी  राज्य कृषिमूल्य आयोगाने पाठविलेल्या दरात केंद्रीय कृषिमूल्य आयोगाकडून मोठी कपात केली जाते. केंद्राचा कृषिमूल्य आयोग हा केंद्र सरकार व केंद्रीय कृषिमंत्र्याच्या आधीन आहे. त्यामुळे केंद्रीय कृषिमूल्य आयोगाला निवडणूक आयोगाप्रमाणे संविधानात्मक दर्जा देऊन स्वायत्तता देण्याची गरज आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर दोनदा उपोषणे केल्यानंतर लेखी आश्‍वासने मिळाली. केंद्र सरकारला १८ पत्रे लिहिली आहेत. परंतु त्याची अंमलबजावणी केंद्र सरकारने केली नाही. त्यामुळे नाइलाजाने शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी पुन्हा उपोषण आंदोलन करावे लागत आहे. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात उपोषण आंदोलनासाठी रामलीला मैदानाची मागणी नवी दिल्लीच्या पोलिस आयुक्तांकडे केली आहे, असेही हजारे म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com