परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात ग्रामपंचायत उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

परभणी ः हिंगोली जिल्ह्यात ग्रामपंचायतींसाठी दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ६०. ५०, तर परभणी जिल्ह्यात ६९. ६८ टक्के मतदान झाले.
The fate of Gram Panchayat candidates in Parbhani, Hingoli, Nanded districts is closed in the ballot box
The fate of Gram Panchayat candidates in Parbhani, Hingoli, Nanded districts is closed in the ballot box

परभणी ः हिंगोली जिल्ह्यात ग्रामपंचायतींसाठी दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ६०. ५०, तर परभणी जिल्ह्यात  ६९. ६८ टक्के मतदान झाले. दोन्ही जिल्ह्यातील ९२० ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी (ता.१५) मतदान झाले. तर, नांदेड जिल्ह्यात  ९०७ ग्रामपंचायतींसाठी ६९.९२ टक्के मतदान झाले. उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रांत बंद झाले.

सोमवारी (ता.१८) निकाल जाहीर करण्यात येतील. परभणी जिल्ह्यात ५६६ पैकी ६८ ग्रामपंयातींची निवडणूक बिनविरोध झाली. त्यामुळे शुक्रवारी (ता.१५) नऊ तालुक्यातील ४९८ ग्रामपंचायतींसाठी १ हजार ५७३ मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले. जिल्ह्यातील ८ हजार ७१७ उमेदवारांच्या भवितव्याचा निर्णय मतदारांनी घेतला. दुपारी दोन वाजेपर्यंत सरासरी ३५ ते ३७ टक्के मतदान झाले होते.

हिंगोली जिल्ह्यातील ४९५ पैकी ७३ ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली.  त्यामुळे इतर ठिकाणची निवडणूक झाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com