योग्य पद्धतीने होईल खेकड्यांचे फॅटनिंग

 पिंजऱ्यामध्ये खेकड्यांचे फॅटनिंग
पिंजऱ्यामध्ये खेकड्यांचे फॅटनिंग

खेकड्यांचे फॅटनिंग करण्यासाठी तलावातील संवर्धन, कांदळवनात तलाव पद्धतीने संवर्धन, कांदळवनात कुंपण पद्धतीने संवर्धन, तलावात कुंपण पद्धतीने संवर्धन आणि पिंजरा संवर्धन पद्धतीचा अवलंब करावा. या पद्धतीमुळे खेकड्यांची चांगली वाढ होते.   १) तलाव संवर्धन ः

  • ०.५ ते २ हेक्‍टर आकाराचे तलाव खेकडापालनासाठी योग्य असतात. छोटे तलाव खेकडा संवर्धनासाठी फायद्याचे ठरतात.
  • वालुकामय चिकणमातीयुक्त (५० टक्के) माती असलेले तलाव निवडावेत.
  • जास्तीत जास्त एका चौरस मीटरमध्ये एक खेकड्याचे बीज ठेवावे. जेणेकरून त्यांच्या वाढीसाठी संवर्धन कालावधीमध्ये पुरेशी जागा उपलब्ध होते.
  • लहान १० ते १०० ग्रॅम वजनाचे खेकडे संवर्धन तलावात साठवले जातात.
  • संवर्धन कालावधी ५ ते ६ महिन्यांचा असतो, तोपर्यंत ते विक्रीयोग्य होतात.
  • कोळंबी संवर्धन तलावांप्रमाणेच खेकडा संवर्धनातसुद्धा वेगवेगळे इनलेट आणि आउटलेट बनवावेत.
  • खेकडे तलावाच्या बाहेर जाऊ नये, याकरिता तलावाच्या सर्व बाजूने ताडपत्रीचे कुंपण करावे.
  • २) कांदळवनात तलाव पद्धतीने केले जाणारे संवर्धन ः

  • तलाव कांदळवनात बांधले जातात.
  • खेकडे तलावाच्या बाहेर जाऊ नयेत यासाठी संपूर्ण तलावाला जाळी लावली जाते.
  • या पद्धतीमध्ये खेकड्यांना नैसर्गिक खाद्यावर अवलंबून राहावे लागते. जसे की छोटे छोटे मासे, गोगलगाय, शिंपले, कालव, इ.
  • कांदळवनातील तलाव साधारणतः १०० चौ.मी. असावेत. ज्यांना चहूबाजूने ०.५ मी. खोलीचा कालवा तयार करावा. ज्यामध्ये ओहोटीच्या वेळीदेखील पाणी राहील. तलावाच्या मध्यभागी थोडी झुडपे ठेवावीत. जेणेकरून ओहोटीच्या वेली खेकडे तेथे आसरा घेऊ शकतील.
  • ३) कांदळवनात कुंपण पद्धतीने संवर्धन ः

  • स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेले बांबू, सुपारीच्या फांद्या १ ते १.५ मीटर खोल रोवून कुंपण केले जाते.
  • साधारणपणे १०० ते १५० चौ.मी. आकाराचे तलाव केले जातात.
  • तलावाच्या मध्यभागी काही झुडपे ठेवून बाजूने तलाव बांधावा. जेणेकरून खेकड्यांना लपण्यासाठी जागा उपलब्ध होईल.
  • तलावांमध्ये १०० ग्रॅम वजनाचे १,००० ते १,५०० खेकडे साठवले जातात. हे तलाव सातत्याने वापरता येतात.
  • भरतीच्या वेळेस छोटे मासे, कालवे, गोगलगाय हे खाद्य खेकड्यांना दिले जाते.
  • खेकडे ४ ते ८ महिन्यांत तयार होतात. खेकडे ४०० ग्रॅम किंवा त्यापेक्षा मोठे झाल्यावर काढले जातात.
  • ही पद्धती पर्यावरणपूरक असली तरी यामध्ये खेकड्यांच्या स्वभक्षण स्वभावामुळे मरतुकीचे प्रमाण ४५ ते ५० टक्के आहे. म्हणून दर चौरस मीटरला कमी साठवणूक करावी.
  • ४) तलावात कुंपण पद्धतीने संवर्धन ः

  • तलावामध्ये ४ x ४ x २.५ मीटर आकारमानाचे बांबूचे कुंपण केले जाते. कुंपणासाठी बांबू १ ते १.५ मीटर खोल रोवले जातात.
  • तलावात कुंपण करताना ते बांधाच्या जवळ केल्याने साठवणूक आणि व्यवस्थापनाला सोपे जाते.
  • ५) पिंजरा संवर्धन ः

  • बांबूपासून बनविलेल्या लहान कप्प्यांमध्ये खेकड्यांचे संवर्धन केले जाते. कप्प्यांचा आकार १ मी लांब, १ मी रुंद आणि २० सेंटिमीटर उंच ठेवावा. हे पिंजरे नऊ भागांनी एकमेकांना जोडलेले असतात.
  • उथळ खाडीच्या पाण्यामध्ये खेकडा संवर्धन पिंजऱ्यामध्ये करता येते. पिंजरा ३ मीटर लांब,२ मीटर रुंद आणि १ मीटर उंच आकाराचा असतो.
  • पिंजरे एका रांगेत रचावेत. त्यामुळे सहजपणे खाद्य आणि निरीक्षण करता येते.
  • साठवणूक ः एका पिंजऱ्यात १० खेकडे/ चौ.मी.
  • पिंजऱ्यात खेकडापालन करताना एका कप्प्यामध्ये एक खेकडा ठेवावा. या पद्धतीमध्ये मरतुकीचे दर अतिशय कमी असतो.
  • खेकड्यांना खाद्य म्हणून कमी किमतीचे मासे, शिंपले, कालवे, चिकन तुकडे, कत्तलखान्यातील टाकाऊ घटक द्यावे.
  • संपर्क ः डॉ. गौरी हरकूळकर ः ७६६६०९६७८९ (लेखिका मत्स्यपालन तज्ज्ञ आहेत)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com