तीळ, करडई, चवळी पिकासाठी अनुकूल हवामान

आत्तापर्यंत आपण गहू, हरभरा, रब्बी ज्वारी, कापूस, सोयाबीन, भुईमूग, उडीद, मूग, तूर, मका, जवस, वाटाणा, उन्हाळी भुईमूग आणि भात या पिकासाठी अनुकूल हवामान यांची माहिती घेतली. या भागामध्ये तीळ, करडई आणि चवळी या पिकांसाठी आवश्यक अनुकूल तापमानाची माहिती घेऊ.
Proper irrigation management should be done in the main growth stages of sesame crop
Proper irrigation management should be done in the main growth stages of sesame crop

आत्तापर्यंत आपण गहू, हरभरा, रब्बी ज्वारी, कापूस, सोयाबीन,  भुईमूग, उडीद, मूग, तूर, मका, जवस, वाटाणा, उन्हाळी  भुईमूग आणि भात या पिकासाठी अनुकूल हवामान  यांची माहिती घेतली. या भागामध्ये तीळ, करडई आणि चवळी या पिकांसाठी आवश्यक अनुकूल तापमानाची माहिती घेऊ. 

तीळ 

  • तीळ हे एक मुख्य तेलवर्गीय पीक आहे. राज्यात त्याची सलग पीक किंवा आंतरपीक म्हणून लागवड केली जाते. 
  • तीळ पीक उबदार हवामानात चांगले येते. ५०० ते ६५० मिमी पर्जन्यमानाच्या प्रदेशात सुद्धा घेतले जाऊ शकते.
  • पिकासाठी २५ ते ३५ अंश सेल्सिअस तापमान अनुकूल आहे.  
  • फुले लागणे ते परिपक्व होणे या कालावधीत कमाल तापमान ३० ते ३२ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २१ ते २२ अंश सेल्सिअस दरम्यान असल्यास चांगले उत्पादन मिळते.  
  • फुलोऱ्याच्या कालावधीत तापमान ४५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त व १५ अंश सेल्सिअसपेक्षा कमी असल्यास  पिकाच्या उत्पादनावर नकारात्मक परिणाम होतो. तापमान ४५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त व गरम हवा यामुळे पिकातील तेलाच्या प्रमाणात घट होते. 
  • फुले लागणे ते बोंडे भरणे या पिकाच्या मुख्य अवस्था असून, या कालावधीत सुरक्षित पाणी दिल्यास उत्पादन चांगले  मिळते. मात्र, या कालावधीत पाण्याचा जास्त पुरवठा झाल्यास उत्पादन व तेल उताऱ्यात घट होते. त्याच प्रमाणे विविध बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढू शकतो. 
  • योग्य जातीची निवड, पीक संरक्षण व पाणी व्यवस्थापन याची चांगले नियोजन केल्यास उत्पादन वाढण्यास मदत होते.
  • चवळी 

  • चवळी पिकाची लागवड खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात केली जाते. 
  • चवळी पीक कडधान्य वर्गातील असले तरी भाजीही  उपयोगी आहे. 
  • चवळी  हे पीक उबदार ते अर्ध शुष्क हवामानात वाढणारे पीक आहे. २० ते ३२ अंश सेल्सिअस तापमान पिकासाठी अनुकूल आहे. 
  • उगवणी ते  वाढीची अवस्था या कालावधीत सरासरी कमाल तापमान ३० ते ३२ अंश सेल्सिअस तर  सरासरी किमान तापमान २२ ते २४ अंश सेल्सिअस असावे. त्याचप्रमाणे फुलोरा ते शेंगा भरणे या कालावधीत सरासरी कमाल तापमान ३१ ते ३३ अंश सेल्सिअस तर सरासरी किमान तापमान २२ ते २३ अंश सेल्सिअस असल्यास चांगले उत्पादन मिळते. 
  • फुलधारणा ते शेंगात दाणे भरणे या मुख्य अवस्था आहेत. या कालावधीत योग्य ओलावा असल्यास उत्पादन चांगले मिळते. पीक फुलोरा ते दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना पावसाने उघडीप दिल्यास पाणी व्यवस्थापन करावे.
  • करडई 

  • करडई हे रब्बी हंगामातील एक मुख्य तेलवर्गीय पीक आहे. भारतात जवळजवळ सर्व राज्यांत करडईची लागवड बियांतील खाद्यतेलाकरिता केली जाते. 
  • करडई हे पीक कमी पाण्यासाठी किंवा अपुऱ्या ओलाव्याला सहनशील आहे. 
  • चांगल्या उत्पादनासाठी २२ ते ३५ अंश सेल्सिअस तापमान पिकासाठी अनुकूल आहे. उगवणीच्या कालावधीत  सरासरी कमाल तापमान ३४ ते ३५ अंश सेल्सिअस तर सरासरी किमान तापमान १८ ते १९ अंश सेल्सिअस असावे.
  • फुलोऱ्याच्या कालावधीत सरासरी कमाल तापमान ३० ते ३२ अंश सेल्सिअस तर  सरासरी किमान तापमान ११ ते १३ अंश सेल्सिअस असल्यास चांगले उत्पादन मिळते.  
  • करडई हे पीक दव स्थितीसाठी संवेदनशील आहे. करडई पिकात पाणी साचून राहिल्यास त्याचा पिकावर  नकारात्मक परिणाम होतो. 
  • फुलोरा आणि दाणे भरणे या मुख्य अवस्था आहेत. या कालावधीत जमिनीत योग्य ओलावा नसल्यास पिकाच्या वाढीवर व उत्पादनावर नकारात्मक परिणाम होतो. पिकाच्या मुख्य अवस्थांच्या वेळी योग्य पाणी व्यवस्थापन केल्यास उत्पादन जवळपास दुप्पट मिळू शकते.
  • संपर्क - डॉ. कैलास डाखोरे, ९४०९५४८२०२ (वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com