agriculture news in Marathi favorable condition for monsoon Maharashtra | Agrowon

मॉन्सूनला पोषक वातावरण 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 15 जून 2021

नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) वेगाने प्रवास करत आहेत. उत्तर भारत मॉन्सून व्यापत असून पुढे सरकण्यासाठी पोषक वातावरण आहे. सोमवारी (ता.१४) मॉन्सूनने फारशी प्रगती केलेली नव्हती.

पुणे : नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) वेगाने प्रवास करत आहेत. उत्तर भारत मॉन्सून व्यापत असून पुढे सरकण्यासाठी पोषक वातावरण आहे. सोमवारी (ता.१४) मॉन्सूनने फारशी प्रगती केलेली नव्हती. मात्र, आज आणखी काही भागांत दाखल होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. 

अंदमान बेटावर नैऋत्य मोसमी वारे २१ मे रोजी दाखल झाले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी जोरदार मुसंडी मारत वेगाने पुढे सरकला होता. त्यानंतर काही प्रमाणात प्रवास मंदावला होता. एक जून रोजी मॉन्सूनचा प्रवास सुरू होण्यास सुरूवात झाल्यानंतर ३ जून रोजी केरळात दाखल झाला होता. त्यानंतर टप्याटप्याने कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, मध्य प्रदेश व उत्तरेकडे चाल केली होती. रविवारी (ता. १३) मॉन्सूनने मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगालच्या अनेक 
भागात दाखल झाला. आजही (ता.१५) आणखी काही भागांत दाखल होण्याची शक्यता आहे. 

मॉन्सूनने गेल्या काही दिवसांत चांगलीच प्रगती केल्याने उत्तरेकडे वेगाने वाटचाल केली आहे. गेल्या २६ दिवसांत मॉन्सूनने जम्मू काश्मीरपर्यंत मजल मारली आहे. यंदा हवामान विभागाच्या सुधारित अंदाजानुसार मॉन्सून हंगामात (जून ते सप्टेंबर) सर्वसाधारण म्हणजेच १०१ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रासह मध्य भारतात १०६ टक्के पावसाची शक्यता आहे. मॉन्सूनने दीव, सुरत, नंदुरबार, भोपाळ, नाऊगाऊ, हमिरपूर, बाराबंकी, बरेली, शहारानपूर, अंबाला आणि अमृतसरपर्यंत मजल मारली आहे. 
 


इतर बातम्या
तुळशी धरणक्षेत्रात उच्चांकी ८९५...कोल्हापूर : जिल्ह्यातील तुळशी (ता.राधानगरी)...
टीका, आरोपांचा समाचार; दुसऱ्या दिवशीही...नवी दिल्ली : संयुक्त किसान मोर्चाने आयोजित शेतकरी...
कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची...पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या...
मराठवाड्यात पावसाचा जोर ओसरलाऔरंगाबाद : मराठवाड्यात गुरूवारच्या (ता.२२) तुलनेत...
औरंगाबाद जिल्ह्यात हमीभावातील ज्वारी,...औरंगाबाद : जिल्ह्यात आधारभूत दराने खरेदी केंद्र...
नांदेड जिल्ह्यात खरीप पिके पाण्याखालीनांदेड : जिल्ह्यात बुधवारनंतर गुरुवारी झालेल्या...
खानदेशात कांद्याच्या रोपवाटिका...जळगाव : खानदेशात कांदा रोपवाटिकांमध्ये रोपे...
अतिवृष्टीचा हिंगोलीतील ७१ गावांत दणकाहिंगोली ः जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात जुलै...
चिपळूणमधील दीड हजार जणांना पुरातून...रत्नागिरी : अतिवृष्टीचा तडाखा चिपळूण, खेड,...
‘हतनूर’चे ३६ दरवाजे उघडलेजळगाव : तापीनदीवरील भुसावळनजीकच्या हतनूर धरणाच्या...
`रावळगाव`च्या जप्त साखर विक्रीतून ‘...नाशिक : ‘‘मालेगाव तालुक्यातील एस.जे. शुगर रावळगाव...
पेठ, त्र्यंबकेश्वरला मुसळधारनाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात पेठ,...
बुलडाण्यातील खरीप पीकविमा प्रश्नावर...बुलडाणा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या खरीप...
पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने कामबंद...वाशीम : जिल्ह्यात पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने...
शेकडो घरे पाण्याखाली; दरड कोसळून...सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात गुरुवारी (ता. २२)...
पुणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रात पावसाचा...पुणे : पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार...
अतिवृष्टी, पुराचा अकोल्यातील ३३ हजार...अकोला : जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे ३३ हजार...
गोसीखुर्द प्रकल्पाचे ३१ दरवाजे उघडले नागपूर : विदर्भात सर्वदूर पावसाने जनजीवन विस्कळीत...
सातारा जिल्ह्यातील पाच धरणांतून ७५ हजार... सातारा : गेले तीन दिवस सातारा जिल्ह्याच्‍या...
ढगफुटीने हाहाकारपुणे : पश्‍चिम महाराष्ट्रात मॉन्सूनच्या पावसाने...