agriculture news in Marathi favorable condition for rain Maharashtra | Agrowon

पावसासाठी पोषक वातावरण

टीम अॅग्रोवन
सोमवार, 17 मे 2021

चक्रीवादळामुळे पश्‍चिम महाराष्ट्रात वेगाने वारे वाहत आहे. या वाऱ्यामुळे पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडत आहेत.

पुणे : चक्रीवादळामुळे पश्‍चिम महाराष्ट्रात वेगाने वारे वाहत आहे. या वाऱ्यामुळे पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडत आहेत. बहुतांशी भागांत ढगाळ वातावरण असल्याने उन्हाचा चटका काहीसा कमी झाला असला, तरी मराठवाडा व विदर्भात उन्हाच्या झळा अजूनही आहेत. रविवारी (ता. १६) सकाळी चोवीस तासांत विदर्भातील अकोला येथे सर्वाधिक ४२.२ अंश सेल्सिअसची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

गेल्या दोन दिवसांपासून अरबी समुद्रात चक्रीवादळ घोंघावत आहे. यामुळे राज्यातील भूपृष्टावर असलेले बाष्पयुक्त वारे ओढून घेतल्याने आकाश निरभ्र असल्याने काही ठिकाणी उन्हाचा चटका वाढलेला होता. तर पश्‍चिम महाराष्ट्रात वादळी वारे वाहत असल्याने कमाल तापमानाचा पारा चांगलाच घसरला होता. राजस्थान व परिसर ते मराठवाडा, मध्य प्रदेश या दरम्यान कमी दाबाचा पट्टा असून, काही प्रमाणात चक्रीय वारे सक्रिय होते. त्याचा परिणाम राज्यातील वातावरणावर झाला असून कमाल तापमानात चढउतार होत आहे. 

चक्रीवादळामुळे राज्यातील अनेक भागांत पूर्वमोसमी पाऊस बरसत आहे. मराठवाड्यातील परभणी शहर व परिसरात रविवारी दुपारी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. तर टाकळी मंडळातही काही वेळ, नगर, सोलापूर जिल्ह्यातही तुरळक सरी पडल्याने वातावरणात गारवा तयार झाला होता. त्यामुळे उकाड्यात चांगलीच घट झाली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रातील कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत दोन ते तीन अंश सेल्सिअसपर्यंत घट झाली आहे. 

राज्यात या जिल्ह्यांमध्ये होणार पूर्वमोसमी पाऊस 
सोमवार ः
संपूर्ण कोकण, भंडारा, बुलडाणा, वाशीम, यवतमाळ 
मंगळवार ः अकोला, बुलडाणा, वाशीम, यवतमाळ, उर्वरित भागात ढगाळ वातावरण 
बुधवार ः मुंबई, नगर, औरंगाबाद, जालना जिल्हे वगळता सर्व जिल्ह्यांत ढगाळ वातावरण 
गुरुवार ः दक्षिण मध्य महाराष्ट्राचा भाग 

रविवारी (ता. १६) सकाळपर्यंतच्या २४ तासांत विविध शहरांतील कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) 

  • मुंबई (सांताक्रूझ) ३५.२ 
  • अलिबाग ३६.२ 
  • रत्नागिरी ३९.५ 
  • डहाणू ३३.१ 
  • पुणे ३६.८ 
  • जळगाव ४१.७ 
  • कोल्हापूर ३४.२ 
  • महाबळेश्‍वर २६.२ 
  • मालेगाव ४०.६ 
  • नाशिक ३८.३ 
  • सांगली ३५.४ 
  • सातारा ३५.६ 
  • सोलापूर ३८.६ 
  • औरंगाबाद ३८.४ 
  • परभणी ३९.८ 
  • उस्मानाबाद ३८.६ 
  • अकोला ४२.२ 
  • अमरावती ३९.८ 
  • बुलडाणा ४१ 
  • ब्रह्मपुरी ४१.९ 
  • चंद्रपूर ४०.२ 
  • गोंदिया ३९.२ 
  • नागपूर ३९.५ 
  • वर्धा ३९.८ 

इतर अॅग्रो विशेष
विदर्भात मुसळधारेची शक्यता पुणे : उत्तरेकडे मॉन्सून गेल्यानंतर राज्यातील...
दूधप्रश्‍नी शेतकरी आक्रमक; राज्यभरात...नगर ः दुधाला दर मिळावा यासाठी गुरुवारी (ता. १७)...
‘द्राक्ष क्लस्टर’मध्ये नाशिकचा समावेश नाशिक : केंद्र सरकारने देशभरात विविध ५३ पिकांचे...
सूक्ष्म अन्न उद्योग उन्नयन योजनेला गती...पुणे ः पंतप्रधान सूक्ष्म अन्न उद्योग उन्नयन योजना...
कोकणसह कोल्हापुरात पावसाने दाणादाण पुणे : कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड,...
पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विम्याचे...सोलापूर ः राज्यातील फळबागांसाठी असलेल्या...
सिंधुदुर्ग पूरस्थितीच्या उंबरठ्यावरसिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार...
राज्यात कांदा प्रतिक्विंटल ५०० ते २३००...अकोल्यात प्रतिक्विंटल ६०० ते १६०० रुपये अकोला ः...
खानदेशातील आवार प्रगतीवर स्वारआवार (ता.जि. जळगाव) हे कापूस, दादर ज्वारीसाठी...
राज्यात २१८ तालुक्यांमध्ये दमदार पाऊस;...पुणे ः जूनच्या पहिल्या पंधरवड्यात राज्यातील २१८...
राज्यात खरीप पेरणी तीन टक्केनगर ः राज्यात यंदा आतापर्यंत खरिपाची सरासरीच्या...
दूधप्रश्‍नी आज राज्यभर किसान सभेचे...नगर ः दुधाला दर मिळावा यासाठी गुरुवारी (ता. १७)...
विदर्भात पावसाचा जोर वाढणारपुणे : राज्यातील बहुतांशी भागात उन्हासह अंशतः...
अनेक वर्षांपासून जपली आले उत्पादकता अन्...आले पिकातील दरांत दरवर्षी चढउतार होते. मात्र...
भाजीपाला बीजोत्पादनातील ‘मास्टर’जिद्द, हिंमत, अभ्यास, ज्ञान घेण्याची वृत्ती व...
कोकण, विदर्भात जोरदार पावसाची शक्यता पुणे : कोकण ते अरबी समुद्राच्या दरम्यान कमी...
पूर्वविदर्भात जोरदार पाऊस पुणे : राज्यातील काही भागांत पावसाचा दणका सुरूच...
जालन्यातील ऊस संशोधन केंद्र उभारणीला...पुणे ः ऊस शेतीच्या विकासासाठी विदर्भ,...
दूध दरांसाठी ग्रामसभांच्या ठरावाची...नगर : राज्यात दुधाला दर दिला जात नसल्याने दूध...
आता शेतकरीच करणार पीकपाहणी पुणे ः तलाठ्याकडून गावशिवारात प्रत्यक्ष पाहणी...