agriculture news in Marathi favorable condition for rain in state Maharashtra | Agrowon

राज्यात पावसाला पोषक हवामान

टीम अॅग्रोवन
रविवार, 12 जुलै 2020

राज्यात पावसाला पोषक हवामान होत असल्याने मॉन्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे.

पुणे : राज्यात पावसाला पोषक हवामान होत असल्याने मॉन्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. उद्यापासून (ता.१३) राज्यात पाऊस सुरू होणार असून, कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची, विदर्भ मराठवाड्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.  

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा हिमालयाच्या पायथ्याकडे सरकला आहे. तर पश्चिम किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्ट्याचा विस्तार कमी झाल्याने राज्यात पावसाने काहीशी उघडीप दिली आहे. तर पाऊस सुरू असलेल्या भागातही जोर ओसरला आहे.

मात्र उद्यापासून मॉन्सूनचा आस दक्षिणेकडे सरकण्याची शक्यता आहे. यामुळे कोकण किनारपट्टीसह मध्य भारतात पावसाला सुरुवात होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. आज (ता.१२) कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यता आहे.   

पावसाचा जोर ओसरला
राज्यात विविध भागात सुरू असलेल्या पावसाने काहीशी उघडीप दिली आहे. तर कोकण, घाटमाथा, धरणांच्या पाणलोटात सुरू असलेल्या पावसाचा जोरही ओसरला आहे. शनिवारी (ता.११) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणात काही ठिकाणी तर उर्वरित महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी कोसळल्या. पावसाने उघडीप दिल्याने वाढीच्या अवस्थेत असलेल्या खरीप पिकातील मशागतीच्या कामांना वेग आला आहे. काही ठिकाणी पावसाची दडी असल्याचे दिसून येत आहे. 

शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत 
पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये)  
  
कोकण : जव्हार ४४, पालघर ३५, विक्रमगड ३०, महाड ४०, पोलादपूर ३६, दापोली ५६, हर्णे ५०, खेड ३४, रत्नागिरी ५७, संगमेश्वर ४०, दोडामार्ग ६२, कणकवली ३०, कुडाळ ४७, मालवण ३६, सावंतवाडी ५३, वेंगुर्ला ५४.

मध्य महाराष्ट्र : गगनबावडा ९१, इगतपुरी ४४, जत ३१. 

मराठवाडा : पैठण ३०, मंथा २०, लातूर २९, रेणापूर २२. 

विदर्भ : बटकुली २०, मोहाडी २१, अरमोरी २२, गडचिरोली ४३, कुरखेडा ४०, मुलचेरा २२, सेलू २४. 
 


इतर अॅग्रो विशेष
पावसाची सर्वदूर संततधार; धरणसाठ्यात वाढपुणे : गेल्या दोन दिवसापासून राज्यातील बहुतांशी...
राज्यात आज आणि उद्या पाऊस जोर धरणारपुणे :  गेल्या तीन ते चार दिवसापासून...
`सक्ती’चे होईल स्वागतयुरिया विकत घेताना सोबत जैविक (जीवाणू) खते...
देशाला स्वातंत्र्य मिळाले पण...शेतमालाचेच भाव का कोसळतात? कांदा, टोमॅटो ...
नवी बाजार व्यवस्था नवी आव्हानेसध्यातरी बाजार समितीचा कर नाही म्हणून व्यापारी...
आकडे, आरोग्य अन् आयातखाद्यतेलावरील आयातशुल्कात वाढ करून आयातीवर...
पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना... पुणे : ‘पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना...
द्राक्ष पीककर्ज कर्जमाफीत बसेना आणि...नाशिक : द्राक्षासाठी घेतलेले पीककर्ज  ...
कर्जमाफीसाठी दीड हजार कोटीमुंबई: महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
जैविक खतांचा वापर सक्तीचा होणार पुणे: युरिया विकत घेताना जैविक खते देखील विकत...
राज्यातील पंधरा जिल्हा बँकांना ...लातूर ः राज्यातील अनेक जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
राज्यात पावसाची रिपरिप सुरुच पुणे ः कोकण व मध्य महाराष्ट्रात रिमझिम असून...
निकृष्ट बियाणेप्रकरणी ४० न्यायालयीन खटलेवाशीम ः यंदाच्या हंगामात निकृष्ट बियाण्यामुळे...
चांदोली धरणग्रस्त विस्थापीतांनी केली २५...मांगले, जि. सांगली ः  चांदोली धरणग्रस्तामधील...
लोकसहभागातून शेती अन् ग्रामविकासाला...उंबरीवाडी (ता.जावली,जि.सातारा) हे लहानसे गाव....
जलसंधारण मोहिमेतून पाणी टंचाईवर मातआजही माण, खटाव हे  दुष्काळी तालुका म्हणून...
पावसाचा जोर कायम राहणार पुणे: गुजरातच्या दक्षिण भागात चक्राकार...
कृषी अधीक्षक, उपसंचालकांच्या बदल्यापुणे : कोविड १९ रोगाच्या पार्श्वभूमीवर कार्यरत...
मका विक्रीचे चुकारे ४० दिवसांनंतरही थकितजळगाव ः जिल्ह्यातील सुमारे साडेतीन हजार मका...
कोकणात मुसळधारेचा अंदाजपुणे ः  उत्तर प्रदेशचा नैऋत्य भाग ते...