agriculture news in Marathi favorable condition for state Maharashtra | Agrowon

राज्यात पावसासाठी पोषक स्थिती 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 20 ऑक्टोबर 2020

बंगालचा उपसागर व दक्षिण आंध्रप्रदेश दरम्यान चक्रीय स्थिती तयार झाली आहे. ही स्थिती पावसासाठी पोषक ठरत आहे.

पुणे ः बंगालचा उपसागर व दक्षिण आंध्रप्रदेश दरम्यान चक्रीय स्थिती तयार झाली आहे. ही स्थिती पावसासाठी पोषक ठरत आहे. त्यामुळे येत्या शनिवारपर्यंत कमीअधिक स्वरूपात पाऊस पडणार आहे. आज मंगळवारी (ता. २०) कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे. 

बंगालच्या उपसागराच्या पश्चिम भागात चक्रीय वाऱ्यांची स्थिती अजूनही कायम आहे. तर कर्नाटक किनाऱ्यापासून बंगालच्या उपसागरापर्यंत वाऱ्यांचे पूर्व पश्चिम जोडक्षेत्र सक्रिय झाले आहे. दरम्यान अरबी समुद्राच्या पश्चिम भागात कमी दाबाचे क्षेत्र असून त्याचे चक्राकार वाऱ्यामध्ये रूपांतर होण्याची शक्यता आहे.

बंगालच्या उपसागराचा पश्चिम मध्य भाग व आंध्र प्रदेशाच्या दक्षिण भागात चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय आहे. त्याचा परिणाम राज्यातील हवामानावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवस ढगाळ हवामानासह कडाक्याचे ऊन पडणार असून अधूनमधून पाऊस पडणार आहे. 

राज्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडत असल्याने सकाळी काही प्रमाणात धुके पडत असल्याची स्थिती आहे. उद्या (बुधवार) ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडेल. गुरुवारी (ता. २२) ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, बीड, जालना, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पाऊस पडेल. तर विदर्भात तुरळक सरी पडतील. 

शुक्रवारी (ता. २३) रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असून मराठवाडा व विदर्भात काही अंशी ढगाळ वातावरणासह हलक्या सरी पडतील. त्यानंतर पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता असून पावसाची काहीशी उघडीप राहणार आहे. 


इतर अॅग्रो विशेष
मूळ दुखण्यावर इलाज कधी?सरकार कितीही सांगत असले की आम्ही शेतकऱ्यांना...
‘सूक्ष्म उद्योग’ घडवतील मोठा बदल पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उन्नयन...
केंद्र सरकारचा समितीचा प्रस्ताव...नवी दिल्ली : विज्ञान भवनात झालेली बैठक कोणत्याही...
यंदा हिवाळ्यात गारठा जरा अधिकच राहणारपुणे : चालू वर्षी डिसेंबर ते फेब्रुवारी या हिवाळा...
इथेनॉल प्रकल्प तारण घेऊन कारखान्यांना...पुणे : “राज्याच्या शेती व ग्रामीण अर्थकारणाला...
बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ सक्रिय;...पुणे : बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाच्या...
नव्या कायद्यामुळेच मिळाले पैसे;...धुळे : कृषी व पणन सुधारणा कायदा अस्तित्वात...
शेतकरी संघटनांचा उद्या राज्यव्यापी...नगर : केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांच्या...
कापूस खरेदीतील कटती अयोग्य; सीसीआय...जळगाव : कापूस महामंडळ (सीसीआय) शेतकऱ्यांसाठी काम...
राज्यात ‘पणन’ची दहा हजार क्विंटल कापूस...नागपूर : राज्यात महाराष्ट्र राज्य सहकारी...
मराठवाड्यात कुठे मोहर, तर कुठे...औरंगाबाद : मराठवाड्यातील केसर आंब्याच्या झाडाला...
विविध तंत्रांचा वापर सांगणारी लंबे...बुलडाणा जिल्ह्यातील माळखेड येथील गणेश लंबे यांनी...
संवादातून मिटेल संघर्षकृषी व पणन सुधारणांबाबतच्या तीन नव्या...
हमीभाव ः वादीवाल्यांचा सापळालातूरला पुर्वी वादीवाले लुटारु टोळके असायचे. ते...
केंद्राचा चर्चेचा प्रस्ताव नाकारला;...नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या वतीने...
...येथे कांदा रोपे राखणीसाठी...विसापूर, जि. सातारा  : सोन्याचे दाग-दागिने,...
कृषी विभागात आगामी बदल्या समुपदेशनाने...पुणे : कोविड-१९ साथीमुळे कृषी विभागात यंदा...
बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाच्या...पुणे :  निवार चक्रीवादळाचा प्रभाव निवळत...
कृषी पदव्युत्तर पदवीच्या प्रवेश...पुणे : राज्यातील चारही कृषी विद्यापीठाअंतर्गत...
सातत्य राखलेले पशुपालन ठरले शेतीलाही...यवतमाळ जिल्ह्यातील लोही (ता. दारव्हा) येथील...