agriculture news in Marathi favorable conditions for monsoon progress Maharashtra | Agrowon

मॉन्सूनसाठी तयार होतेय पोषकस्थिती...

टीम अॅग्रोवन
सोमवार, 25 मे 2020

अंदमान, निकोबार बेटांवर मॉन्सून दाखल झाल्यानंतर ‘अम्फान’ चक्रीवादळामुळे पुढे वाटचाल झालेली नाही. सध्या बंगालच्या उपसागरासह, अरबी समुद्रातूनही मॉन्सूनच्या प्रगतीस पोषक हवामान होण्यास सुरवात झाली आहे. यंदा केरळमध्ये मॉन्सून पाच जून रोजी दाखल होण्याचा अंदाज यापुर्वीच हवामान विभागाने वर्तविला आहे. 
- डॉ. अनुपम कश्‍यपी, हवामान अंदाज प्रमुख, पुणे वेधशाळा 

पुणे: बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘अम्फान’ चक्रीवादळामुळे नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांना (मॉन्सून) चालना मिळाली. रविवारी (ता.१७) मॉन्सून दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेटांवर डेरेदाखल झाला. मात्र हे चक्रीवादळ उत्तरेकडे सरकून गेल्यानंतर मॉन्सूनने कोणतीही प्रगती केली नाही. आठ दिवसांपासून मॉन्सूनच्या प्रगतीची वाटचाल ‘जैसे थे’ असली तरी, बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रातही पुढील वाटचालीस हळूहळू पोषक स्थिती तयार होत आहे. 

हवामान विभागाने नुकत्याच जाहीर केलेल्या मॉन्सून आगमानाच्या नवीन वेळापत्रकानुसार नैर्ऋत्य मोसमी वारे २२ मेपर्यंत अंदमान बेटांच्या बहुतांशी भागावर दाखल होण्याची शक्यता गृहीत धरण्यात आली आहे. साधारणत: २० मे रोजी मॉन्सून अंदमान बेटांच्या दक्षिण भागात दाखल होतो. मात्र बंगालच्या उपसागरातील ‘अम्फान’ चक्रीवादळामुळे पाच दिवस आधीच मॉन्सून दक्षिण अंदमानात दाखल झाला. चक्रीवादळ उत्तरेकडे सरकून गेल्यानंतर तब्बल दिवसांत मॉन्सूनची कोणतही प्रगती झालेली नाही. 

हवामान विभागाच्या पुणे वेधशाळेतील हवामान अंदाज प्रमुख डॉ. अनुपम कश्‍यपी म्हणाले की, बंगालच्या उपसागरात ‘अम्फान’ चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर फारसा प्रभाव पडला नसला तरी, विदर्भासह राज्यातील बाष्प ओढून घेतले. हवामान कोरडे होऊन विदर्भात उष्ण लाट आली आहे. नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) १७ मे रोजी दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेटांवर मॉन्सून दाखल झाला.

या भागात सर्वसाधारण वेळेच्या तीन दिवस आधीच आधीच मॉन्सूनने हजेरी लावली. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे पुढील वाटचालीसाठी आवश्‍यक स्थती निर्माण झाली नाही. वादळाचा प्रभाव ओसरून पुन्हा पोषक वातावरण तयार होण्यास कालावधी लागणार आहे. 

दरम्यान, यंदा केरळातील मॉन्सूनचे आगमन काहीसे लांबणार आहे. यंदा मॉन्सून चार दिवस उशीराने पाच जून रोजी केरळात पोहोचण्याचा अंदाज आहे. तसेच मॉन्सूनचे अंदमानातील आगमनाचा, केरळातील आगमन आणि देशातील पावसाच्या प्रमाणाशी कोणतही परस्पर संबध नसल्याचे हवामान विभागाने आधीच स्पष्ट केले आहे. तर ‘अम्फाम’ चक्रीवादळामुळे प्रभावित झालेले प्रवाह सुरळीत होत असल्याने लवकरच मॉन्सून अंदमान बेटांच्या आणखी काही प्रगती करणार आहे. 

 


इतर अॅग्रो विशेष
विश्वजित माने प्रभारी कृषी आयुक्तपुणे : राज्याचे कृषी आयुक्त सुहास दिवसे यांची...
कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा बंद मागे;...औरंगाबाद :  कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा...
शण्मुख नाथन झटतोय निंब वृक्ष वाढीसाठीअकोला ः वृक्ष संवर्धन, पर्यावरणाच्या उद्देशाने...
देशात कृषी स्टार्टअपला वाव : संगीता...पुणे: जगात कृषी क्षेत्रातील प्रत्येक नववा...
सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या राज्यात ५४...पुणे ः खरीप हंगामात सोयाबीन बियाणे...
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर...पुणे: मॉन्सून सक्रिय होण्यास पोषक हवामान होत...
आमचा विद्यार्थी सहा महिन्यातच पास झाला...मुंबई: आमचा विद्यार्थी सहा महिन्यातच पास झाला,...
बांगलादेशात रेल्वेद्वारे कांदा निर्यातनाशिक: जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर कांदा...
देशात आता जनुक क्रांतीची गरज : माजी...पुणे: देशाला आता हरितक्रांती नव्हे तर आता जनुक...
शेळ्या-मेंढ्यांचे बाजार सुरु करा  नगर ः सध्या आषाढ महिना सुरु असून या महिन्यात...
बियाणे संबंधित तक्रारींचा तत्काळ निवाडा...नाशिक: निकृष्ट बियाण्यासंबंधी तक्रारी आल्यानंतर...
संत्रा उत्पादन वाढीचा अंदाजअमरावती ः पोषक वातावरणाच्या परिणामी या वर्षी...
मागण्या मान्य करा, अन्यथा दूध पुरवठा...औरंगाबाद  : अत्यल्प दर मिळत असल्याने आम्ही...
उथळ निर्णय की सखोल अभ्यासकेंद्र सरकारने ग्लायफोसेटचा वापर देशभर केवळ कीड...
लसीला लागण राजकारणाची ?‘कोरोना’ग्रस्ततेत अमेरिकेचा प्रथम क्रमांक आहे....
संगमनेर तालुका संघाकडून ५० टक्के...नगर: संगमनेर तालुका सहकारी दूध संघाने दूध...
उगाव येथे सामूहिक पातळीवर दशपर्णी अर्क...नाशिक: निफाड तालुक्यातील उगाव येथील श्री. श्री....
किसान क्रेडिट कार्डवर बिनव्याजी कर्ज...नाशिक: शेतकऱ्यांना शेतीकामासाठी आर्थिक मदत करणे...
दुधाला दर नसल्याने, दुभती जनावरे ...सोलापूर ः दुधाला मागणी असूनही केवळ योग्य तो दर...
मराठा समाजाला विश्वासात घेणार : अशोक...मुंबई : मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईत राज्य...