agriculture news in marathi favorable conditions for rain in maharashtra | Agrowon

राज्यात वादळी पावसाला आज पोषक हवामान

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 16 एप्रिल 2020

आज (ता.१६) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी पावसाची शक्यता आहे.

पुणे : राज्यात वाढलेला उन्हाचा चटका तापदायक ठरत असतानाच, पूर्व मोसमी पावसाला पोषक हवामान होत आहे. आज (ता.१६) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी पावसाची शक्यता आहे. तर उन्हाचा वाढलेला चटकाही कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. बुधवारी (ता.१५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला येथे देशातील उच्चांकी ४३.३, तर जळगाव येथे ४३.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

मध्य महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नाशिक, सोलापूर, मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, परभणी, नांदेड, विदर्भातील अकोला, अमरावती, बुलडाणा, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, नागपूर, वाशीम, वर्धा येथे तापमान चाळीशीपार गेले आहे. पुढील काळात उन्हाचा ताप आणखी वाढण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशापासून मध्य महाराष्ट्र, गोवा, अरबी समुद्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा आहे. यामुळे आजपासून (ता.१६) राज्यात तुरळक ठिकाणी जोरदार वारे, मेघगर्जना, विजांसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने 
वर्तविली आहे.

बुधवारी (ता. १५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३९.१, जळगाव ४३.२, धुळे ४२.०, कोल्हापूर ३७.६, महाबळेश्‍वर ३३.३, नाशिक ४०.१, निफाड ३९.४, सांगली ३८.०, सातारा ३८.१, सोलापूर ४०.२, डहाणू ३४.२, सांताक्रूझ ३५.२, रत्नागिरी ३४.६, औरंगाबाद ४०.३, बीड ४१.५, परभणी ४१.२, नांदेड ४१.५, अकोला ४३.४, अमरावती ४२.०, बुलडाणा ४०.०, ब्रह्मपुरी ४०.४, चंद्रपूर ४१.४, गोंदिया ३९.२, नागपूर ४१.२, वाशीम ४०.०, वर्धा ४०.२.


इतर अॅग्रो विशेष
पीककर्ज वाटपात राज्यात कोल्हापूर प्रथम...कोल्हापूर : जिल्ह्याकरिता पीक कर्जाचे वार्षिक...
कृषी विधेयकांना वाढता विरोधनवी दिल्लीः देशभरात ठिकठिकाणी विशेषतः पंजाब आणि...
तंबी देताच फळपिकांची विमा भरपाई झाली...पुणे: फळपिक विमा योजनेतील अडवून ठेवलेली नुकसान...
कांदा उत्पादकांची सावध चाल नाशिक: केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा...
मराठवाड्यात पावसाचे धुमशान पुणे ः मराठवाड्यात पावसाचे धुमशान सुरूच आहे....
ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी निवडणूक...मुंबई: कोरोनामुळे स्थगित करण्यात आलेल्या आणि...
हलक्या पावसाची शक्यता पुणे ः बंगाल उपसागराच्या ईशान्य परिसरात उद्या (ता...
शेतकऱ्यांना उभारी देणारी संत ज्ञानेश्‍...किनखेडा (ता.रिसोड,जि.वाशीम) येथील प्रगतशील शेतकरी...
बाजार स्वातंत्र्यांची मागणी पूर्ण पुणेः केंद्र सरकारने सादर केलेल्या शेती आणि पणन...
गुणवत्तापूर्ण हळद, डाळींची थेट...सनपुरी (जि. परभणी) येथील प्रयोगशील शेतकरी नरेश...
मराठवाड्यात जोरदार पावसाचा पिकांना फटकाऔरंगाबाद, परभणी : औरंगाबाद, जालना, बीड, लातूर,...
हजारो टन कांदा निर्यातीच्या प्रतीक्षेतमुंबई/नाशिक : देशभरात कांदा निर्यातबंदी...
बीटी वांग्याच्या दुसऱ्या टप्प्यातील...पुणे : देशभरात चर्चेत असलेल्या बीटी वांग्याच्या...
साखर निर्यातीचे करार ५७ लाख टनांवरकोल्हापूर : देशातल्या साखर निर्यातीचे करार आता ५७...
तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यतापुणे ः बंगालचा उपसागर व उत्तर तामिळनाडूच्या...
दूध सल्लागार समिती कागदावरचपुणे : राज्यस्तरीय दूध सल्लागार समितीची एकही बैठक...
राज्यात मोसंबी १००० ते ४००० रुपये...औरंगाबादमध्ये १००० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल...
कांदा, लसूण शेतीत बहिरवाडीने मिळवली...बहिरवाडी (ता. जि. नगर) हे छोटे गाव कांदा व लसूण...
स्पर्धेत टिकण्यासाठी ‘ई-नाम’केंद्र सरकारने कृषी, पणन व्यवस्थेत सुधारणा घडवून...
बाजार सुधारणांत नको राजकीय धुळवडकोरोनाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या संसद...