agriculture news in Marathi favorable conditions for return monsoon Maharashtra | Agrowon

मॉन्सूनच्या माघारीस पोषक वातावरण 

टीम अॅग्रोवन
रविवार, 25 ऑक्टोबर 2020

मॉन्सून दोन दिवसांत उत्तर महाराष्ट्र व अरबी समुद्राचा मध्य भाग, ओडिशा या भागांतून माघार घेणार आहे, अशी माहिती हवामान विभागाच्या सूत्रांनी दिली.

पुणे : मॉन्सून दोन दिवसांत उत्तर महाराष्ट्र व अरबी समुद्राचा मध्य भाग, ओडिशा या भागांतून माघार घेणार आहे, अशी माहिती हवामान विभागाच्या सूत्रांनी दिली. 

सध्या मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासासाठी अनुकूल स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे झारखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर व मध्य अरबी समुद्र, ओडिशाचा काही भाग, पश्चिम बंगाल, सिक्कीम, तेलंगणा तसेच ईशान्य भारतातील सर्वच राज्य आणि महाराष्ट्रामधून दोन दिवसांत मॉन्सून परतीचा प्रवास सुरु करणार आहे. राज्याच्या सर्वच भागातून मॉन्सून एकाच वेळी परतणार आहे. 

दरम्यान, पुढील दोन दिवस राज्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल तसेच ऑक्टोबर हिटचा चटका देखील वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

२८ ऑक्टोबरला देशातून परतणार 
बंगालच्या उपसागरातील तीव्र कमी दाबाचे क्षेत्र भूपृष्टावर येत आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत परतीचा मॉन्सून उत्तर महाराष्ट्रातून माघार घेण्याची शक्यता असून २८ ऑक्टोबरला तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक व केरळसह मॉन्सून संपूर्ण देशातून परतणार आहे, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली. 
 


इतर अॅग्रो विशेष
‘सूक्ष्म सिंचन’प्रकरणी चौकशी...औरंगाबाद/जालना : जालना जिल्ह्यात सूक्ष्म सिंचन...
बीजोत्पादन क्षेत्र नोंदणीला मुदतवाढपुणे : राज्यात रब्बी हंगामासाठी घेतल्या जाणाऱ्या...
कमी कालावधीत पक्व होणारे मधुर कलिंगड...नाशिक : बंगळूर येथील भारतीय फलोत्पादन संशोधन...
किमान तापमानात घट होणार पुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेले निवार...
डाळिंब दरात मोठी सुधारणासांगली ः राज्यातील डाळिंब पीक यंदा सततचा पाऊस आणि...
पामतेल आयात शुल्कात कपात; केंद्र...नवी दिल्ली ः केंद्र सरकारने कच्च्या...
टंचाईग्रस्त दहीगाव झाले लोकसहभागातून...सातारा जिल्ह्यातील दहीगाव गावातील ग्रामस्थांनी...
'निवार’ चक्रीवादळाचा प्रभाव; राज्यात...पुणे ः बंगालच्या उपसागरात पूर्व किनाऱ्याकडे...
केळीची मागणी कायम, दर टिकून जळगाव : दाक्षिणात्य व गुजरातमधील केळीची उत्तर...
तमिळनाडू, पुद्दुचेरीत धुमाकूळचेन्नई  ः निवार चक्रीवादळामुळे वेगवान...
गहू, हरभरा पेरणीला वेगपुणे : यंदा चांगल्या पाणीसाठ्यामुळे गहू व...
पहिल्याच टप्प्यात थकवली ३५० कोटींची ‘...पुणे : राज्याचा ऊस गाळप हंगाम सुरू झाल्यानंतर...
आर्थिक चणचण,‘लम्पी’चे पशुधन बाजारावर...सांगली ः लॉकडाउनमुळे पशुधानाचे आठवडे बाजार तब्बल...
ऊसतोडणी मजुरांची संख्या यंदा दोन...नगर : राज्यातील साखर कारखान्यांवर ऊसतोडणी...
पणन महासंघाची खरेदी उद्यापासूननागपूर : महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक...
मराठवाड्यातील बहुतांश धरणे तुडुंबऔरंगाबाद : यंदा जोरदार पावसामुळे मराठवाड्यातील...
संकटकाळात श्री ब्रॅण्डद्वारे दर्जेदार...नाशिक जिल्ह्यातील वनसगाव येथील शैलेश व संदीप या...
सणांच्या हंगामात भाव खाणारी गाडे यांची...कांजळे (ता. भोर, जि. पुणे) येथील विलास गाडे यांनी...
महाटीत उपसरपंचपदासाठी साडेदहा लाखांची...नांदेड ः ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी उपसरपंचपदाचा...
राज्यात शनिवारपासून ‘जनप्रबोधन यात्रा’नगर/पुणे ः शेतकरी आत्महत्येला कारणीभूत असलेल्या...