agriculture news in Marathi favorable weather for rain in Vidarbha Maharashtra | Agrowon

विदर्भात पावसाला पोषक हवामान

टीम अॅग्रोवन
शनिवार, 22 फेब्रुवारी 2020

पुणे: राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ झाल्याने फेब्रुवारी महिन्यातच उन्हाचा चटका असह्य होऊ लागला आहे. शुक्रवारी (ता.२१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नगर येथे राज्यातील उच्चांकी ३६.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर ढगाळ हवामानामुळे उकाड्यातही वाढ झाली आहे. विदर्भामध्ये पावसाला पोषक हवामान होत असल्याने उद्यापासून (ता.२३) विदर्भात हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.  

पुणे: राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ झाल्याने फेब्रुवारी महिन्यातच उन्हाचा चटका असह्य होऊ लागला आहे. शुक्रवारी (ता.२१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नगर येथे राज्यातील उच्चांकी ३६.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर ढगाळ हवामानामुळे उकाड्यातही वाढ झाली आहे. विदर्भामध्ये पावसाला पोषक हवामान होत असल्याने उद्यापासून (ता.२३) विदर्भात हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.  

उत्तरेकडून थंड वाऱ्यांचे प्रवाह महाराष्ट्राकडे येत नसल्याने राज्यातील थंडी पूर्णपणे नाहीशी झाली आहे. यातच तापमान पस्तीशीपार गेल्याने उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. धुळे, जळगाव, मालेगाव, सांगली, सोलापूर, परभणी, नांदेड, अकोला येथे तापमान ३५ अंशाच्या पुढे आहे. तर बहुतांशी ठिकाणी ३३ अंशांपेक्षा अधिक कमाल तापमानाची नोंद होत आहे. किमान तापमानातही चांगलीच वाढ झाली असून, शुक्रवारी निफाड येथे नीचांकी १२.४ अंश तापमान नोंदले गेले.

मराठवाड्यापासून कर्नाटक किनारपट्टीपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात ढगाळ हवामान होत आहे. शुक्रवारी उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात ढग जमा झाले होते. उद्यापासून (ता.२३) विदर्भातील अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता आहे. तर उर्वरीत राज्यात अंशत: ढगाळ हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.  

बुधवारी (ता. १९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे किमाल व किमान (कंसात) तापमान, (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३४.५ (१६.४), नगर ३६.६, धुळे ३५.० (१४.०) जळगाव ३५.० (१६.६), कोल्हापूर ३४.१ (२०.५), महाबळेश्‍वर २९.३ (१७.६), मालेगाव ३५.२ (१८.२), नाशिक ३३.२ (१५.२), निफाड ३०.१ (१२.४), सांगली ३५.५ (२०.०), सातारा ३४.१ (१८.५), सोलापूर ३५.३ (२०.५), अलिबाग ३०.६ (१९.९), डहाणू २९.८ (१९.४), सांताक्रूझ ३४.१(२०.६), रत्नागिरी ३४.० (२०.५), औरंगाबाद ३३.३ (१७.८), परभणी ३५.८ (१९.४), नांदेड ३५.० (१५.०), अकोला ३५.७ (२०.२), अमरावती ३४.० (२०.०), बुलडाणा ३३.२ (१९.४), चंद्रपूर ३३.० (१८.२), गोंदिया ३०.५ (१३.०), नागपूर ३२.५ (१८.२), वर्धा ३३.० (१९.१), यवतमाळ ३४.५ (१९.४).


इतर अॅग्रो विशेष
शेतकरी कंपन्यांचाही ‘ई-नाम’मध्ये समावेश नवी दिल्ली: केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर...
राज्यात उन्हाचा चटका वाढला पुणे: एप्रिल महिना सुरू होताच राज्यात उन्हाच्या...
पिंपळगाव बसवंत बाजार समितीत ३० हजार...नाशिक: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मजुरटंचाई...
कोल्हापुरात तीस हजार ऊस तोडणी कामगार...कोल्हापूर: जिल्ह्यातील सुमारे तीस हजार ऊस तोडणी...
औरंगाबादमध्ये २९ टन मालाची थेट विक्रीकोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर औरंगाबाद शहरात 'शेतकरी...
कोरोनामुळे कृषी पर्यटन व्यवसाय अडचणीत सातारा : कोरोनाच्या संसर्गामुळे दिवसेंदिवस बळी...
संकटावेळी तरी पंतप्रधानांनी गंभीर...मुंबई : देशात कोरोना विषाणूने थैमान घातले असून...
‘कोरोना विरोधात जाणिवेसाठी रविवारी...पुणे : ‘‘कोरोना विरोधात उभारलेल्या लढ्याची...
कोरोनाच्या निदानासाठीच्या ‘मायलॅब'ला...पुणे ः देशातील कोरोनाच्या प्रत्येक रुग्णाच्या...
कांदा विक्रीसाठी ‘पणन’चे प्रयत्नपुणे: कोरोना लॉकडाऊनमध्ये शेतमालाची पुरवठा साखळी...
दूध संकलनास टाळाटाळ करणाऱ्यांवर कारवाई...वर्धा ः  दूध संकलनास टाळाटाळ करणाऱ्या दूध...
पालघर, डहाणू, तलासरी तालुक्यात भूकंपाचे...मुंबई: पालघर जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून...
मोसंबी मागणीअभावी बागेतचऔरंगाबाद: परिपक्व झालेल्या मोसंबीच्या मृग...
लॉकडाऊनमुळे ‘निविष्टा’ कंपन्यांची उधारी...पुणे: लॉकडाऊनमुळे राज्यातील खते, बियाणे व कीडनाशक...
तीन दिवसांत एक हजार वीस टन द्राक्ष ...पुणे ः कोरोना विषाणूमुळे राज्यातील द्राक्ष...
विदर्भ, मराठवाड्यात पुर्वमोसमी पावसाचा...पुणे : राज्यात उन्हाचा चटका चांगलाच वाढल्याने...
हरभरा खरेदीच्या नोंदणीसाठी मुदतवाढमुंबई: किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत हमी...
हापूसच्या निर्यातीसाठी युद्धपातळीवर...मुंबई: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
लॉकडाऊन संपल्यानंतर राज्यांनी गर्दी...मुंबई : लॉकडाऊन संपविल्यानंतर १५ एप्रिलला लगेच...
रासायनिक खतांचा काळाबाजार होईल; गाफील...पुणे: “देशात रासायनिक खतांचा मुबलक साठा आहे....