agriculture news in marathi, Fear of being wasted due to irregular rainfall | Agrowon

अनियमित पावसामुळे पेरणी वाया जाण्याची भीती

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 13 जुलै 2018

औरंगाबाद : मराठवाड्यात पावसाच्या अनियमिततेचा खेळ पुन्हा एकदा अनुभवायला येतो आहे. ढगांची गर्दी, पण शिडकाव्यापलीकडे पाऊस नाही. त्यामुळे पाऊस येईल या आशेवर पेरणी करणारे शेतकरी चिंतेत पडले असल्याचे, तर ज्यांनी जूनच्या अखेरीस पेरणी केली त्यांच्यावर पावसाअभावी पेरलेले पीक मोडण्याची वेळ आल्याचे चित्र पहायला मिळते आहे. जालना व औरंगाबाद जिल्ह्यातील बहुतांश भागात स्थिती चिंताजनक अशीच आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यात पावसाच्या अनियमिततेचा खेळ पुन्हा एकदा अनुभवायला येतो आहे. ढगांची गर्दी, पण शिडकाव्यापलीकडे पाऊस नाही. त्यामुळे पाऊस येईल या आशेवर पेरणी करणारे शेतकरी चिंतेत पडले असल्याचे, तर ज्यांनी जूनच्या अखेरीस पेरणी केली त्यांच्यावर पावसाअभावी पेरलेले पीक मोडण्याची वेळ आल्याचे चित्र पहायला मिळते आहे. जालना व औरंगाबाद जिल्ह्यातील बहुतांश भागात स्थिती चिंताजनक अशीच आहे.

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्‍यांतर्गत येत असलेल्या डोमगाव शिवारात अजून पेरणी नाही. बुधवारी (ता. ११) एकीकडे फुल्या पाडणे व दुसरीकडे कपाशीची लागवड करण्याचे काम शेतकऱ्यांनी हाती घेतले होते. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्‍याला लागून असलेल्या अंबड तालुक्‍यातीलच अंकुशनगर, राजेशनगर, साष्टेपिंपळगाव शिरातही डोमेगावप्रमाणेच स्थिती होती. डोमेगावच्या आसपासच्या झोडेगाव, वडी लासुरा, सोनक पिंपळगाव, चिंचखेड करडगाव आदी पाच ते सहा गाव शिवारात हीच स्थिती असल्याची माहिती शेतकरी जगन्नाथ रनमळे यांनी दिली. पुरेसा पाऊस ओल नसली तरी कपाशीची लागवड करतोय. कवर वाट पहावं आता, अंदाज आहे पाऊस येण्याचा, मग येईलच, या आशेवर पेरणी करीत असल्याचे अर्जुन भिंगारे म्हणाले.

अंबड तालुक्‍यातील साष्टे पिंपळगाव, राजेशनगर शिवारातही कपाशी लागवड व तूर पेरणीचे काम सुरू होते. जी पिकं पेरायची होती त्यांचा कालावधी पाऊसच न झाल्याने हातचा गेला. मग आता निव्वळ तुरीची पेरणी करण्याचा प्रयत्न साष्टे पिंपळगाव शिवारात सुरू असल्याचे दिसून आले. औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्‍यातील सैदापूर शिवारातही आजघडीला कपाशीची लागवड सुरू आहे.

पेरलेले मोडण्याची वेळ
जालना जिल्ह्यातील वखारी येथील निवृत्ती घुले यांनी २२ जूनला आधी पडलेल्या पावसाच्या भरवशावर दीड एकर सोयाबीनची पेरणी केली. हवामान खात्याचा अंदाज व इतरांचाही अंदाज पाऊस असल्याने पेरणी केली. परंतू नंतर पिकाची उगवण चांगली होण्याइतपत पाऊस पडला नाही. त्यामुळे उगवण ४० टक्‍क्‍यांपुढे गेली नाही. शिवाय त्यानंतरही पाऊस अपेक्षित होत नसल्याने १२ जुलैला त्यांनी पेरलेले सोयाबीन मोडण्याच निर्णय घेतल्याची माहिती श्री. घुले यांनी दिली.

पुरेशी ओल नाहीच. ६ जूनला पाऊस आला होता. त्यानंतर आता कालपरवा थोडा पडला. कुठवर थांबावं, पाऊस येईल, असा अंदाज हाये; त्यामुळं फुल्या पाडून कपाशीची लागवड करतोय.
- अर्जुन भिंगारे, शेतकरी डोमेगाव, जि. जालना

एकीकडं शेतमालाला भाव नाही. दुसरीकडं पाऊसही असा करतोय. घरची व काही ठोक्‍यानं शेती करतो. पिकं पेरणीची वेळ निघून चालली, पण पाऊस न पडल्यामुळं शेतकऱ्यांना देशोधडीला लागण्याची येळ आली.
-जगन्नाथ रनमळे,
शेतकरी डोमेगाव जि. जालना.


इतर ताज्या घडामोडी
औसा तालुक्यात उडीद, मूग व्हायरसच्या...औसा, जि. लातूर : तालुक्यातील उडीद आणि मूग ही पिके...
शेतमजुरांसाठी कौशल्याधारीत प्रशिक्षण...नाशिक: बदलत्या पीक पद्धतीमध्ये कीडनाशक फवारणी,...
कोल्हापूर जिल्ह्यात वादळ, पुराचा उसाला...कोल्हापूर: जोरदार वाऱ्यासह सुरु असलेल्या पावसाने...
पुणे जिल्ह्यात पावसामुळे भात लागवडीला...पुणे ः गेल्या चार ते पाच दिवसांपासून पुणे...
पाथरूडच्या बंधाऱ्यांत मुबलक पाणीपाथरूड, जि. उस्मानाबाद : येथील दुधना नदीवर...
नंदुरबारमध्ये अनेक भागात पाऊस नंदुरबार ः जिल्ह्यात मागील दोन दिवसांत...
पुण्यातील धरणातून उजनीत १३ हजार ५६...सोलापूर ः उजनी धरणाच्या वरच्या बाजूला...
`पपईचा पिकविमा योजनेत समावेश करा`जळगाव ः खानदेशात कांद्यापाठोपाठ पपईचे...
बार्शीत रेशनचा १५१ पोती गहू, तांदूळ...सोलापूर ः बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीतील...
‘माढा, पंढरपूर, माळशिरसमधील...सोलापूर ः ‘‘गतवर्षी जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या...
परभणीत ऊस, चारा पिकांवर नाकतोड्याचा...परभणी : वांगी (ता.परभणी) येथील ऊस पीक झालेल्या...
पूर्ण कार्यक्षमतेने ऊस गाळप करण्याचे...नाशिक : ‘‘कादवा सहकारी साखर कारखान्याने जुन्या...
नांदेड जिल्ह्यातील सीएससी केंद्रे सुरू...नांदेड : जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्र, आधार...
अकोल्याच्या पश्चिम भागात जोरदार पाऊसनगर ः दरवर्षी जोरदार पाऊस पडत असलेल्या अकोले...
पुणे जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरीपुणे ः पुणे जिल्ह्याच्या बहुतांशी भागात पावसाने...
परभणीत वांगे प्रतिक्विंटल २००० ते ४०००...परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
बुलडाणा जिल्ह्यात अडीच लाख शेतकऱ्यांनी...बुलडाणा ः पंतप्रधान पीकविमा योजनेत जिल्ह्यातील...
जायकवाडीत ५५.३२ टक्के उपयुक्त पाणीपैठण, जि. औरंगाबाद : तालुक्यातील जायकवाडी...
नांदेड जिल्ह्यात ९ लाख ४६ हजार पीकविमा...नांदेड ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत...
कृषिपंपांना बारा तास वीज पुरवठा करा ः...भंडारा : टाळेबंदी काळातही शेतकऱ्यांनी मोठ्या...