महाबळेश्र्वर तालुक्यात पिके कुजण्याची भीती

महाबळेश्र्वर तालुक्यात पिके कुजण्याची भीती
महाबळेश्र्वर तालुक्यात पिके कुजण्याची भीती

सातारा ः जिल्ह्यात सर्वाधिक महाबळेश्र्वर तालुक्यास पावसाने झोडपले आहे. या अतिपावसामुळे भात, बटाटा, नाचणी ही पिके कुजण्याचा धोका निर्माण झाला आहे. तर, स्ट्राॅबेरीच्या रनरची वाढ खुंटली असून, वाटाणा लागवड रखडली असल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

महाबळेश्र्वर हा अतिपर्जन्य छायेचा तालुका म्हणून या राज्यात ओळख आहे. या तालुक्यात आॅगस्टअखेर सरासरी १८४६ मिलिमीटर पाऊस झाला आहे. या तालुक्यात संततधार पाऊस, सतत धुके, ढगाळ वातावरणामुळे दोन महिन्यांपासून सूर्यदर्शनही झालेले नाही.

या दमदार पावसाचा शेतीला फटका बसला आहे. या तालुक्यात स्ट्राॅबेरी हे नगदी पीक असून, सुमारे २५०० एकर घेतले जाते. स्ट्राॅबेरीचे जून ते आॅगस्ट महिन्यात मातृवृक्षापासून रोपेनिर्मितीची प्रक्रिया केली जाते. याच कालावधीत जास्त पाऊस झाल्याने मातृवृक्षापासून अत्यल्प फुटवे निघाले असून, फुटव्याचे रनर पिशव्यांमध्ये धरणे अवघड झाल्याने नवीन रोपे तयार होण्यावर मर्यादा आल्या आहेत. यामुळे लागवडीचा काळ लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

भात, नाचणी, बटाटा अतिपाण्यामुळे कुजू लागली आहेत. झाडाखाली असलेल्या पिकांना सर्वाधिक फटका बसत आहे. स्ट्राॅबेरीसह वाटाणा पिकांसाठी महाबळेश्वर तालुका प्रसिद्ध आहे. या तालुक्यात १५ आॅगस्टदरम्यान वाटाण्याच्या लागवडीस प्रारंभ होतो. या वेळी मात्र पाऊस सुरू असल्याने ही लागवड रखडली आहे. त्यातूनही काही शेतकऱ्यांनी केलेली लागवड पावसामुळे वाया गेली आहे.

ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी वाटाण्याच्या लागवडीस उशीर झाल्याने पहिल्या टप्प्यात मिळणारा चांगल्या दरास येथील शेतकरी मुकणार आहेत. एकूणच अतिवृष्टीचा फटाका पिकांना बसल्याने ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com