परवानगी नसलेल्या एचटीबीटी बियाण्यांचा पुरवठा होऊ शकतो...

अमरावती ः घरपोच बियाणे वाटपाच्या माध्यमातून परवानगी नसलेल्या एचटीबीटी बियाण्यांचा पुरवठा होऊ शकतो. या माध्यमातून फसवणूक होण्याची शक्‍यता पाहता शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे यांनी केले आहे.
Fear of direct distribution of unauthorized inputs
Fear of direct distribution of unauthorized inputs

अमरावती ः घरपोच बियाणे वाटपाच्या माध्यमातून परवानगी नसलेल्या एचटीबीटी बियाण्यांचा पुरवठा होऊ शकतो. या माध्यमातून फसवणूक होण्याची शक्‍यता पाहता शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे यांनी केले आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी व्यापक उपायांची अंमलबजाणी केली जात आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर थेट निविष्ठा पुरविण्याच्या उपायाचाही समावेश आहे. काही अनधिकृत निविष्ठा पुरवठादारांव्दारे या संधीचा दुरुपयोग होण्याची शक्‍यता आहे. प्रचलीत, शिफारसीत तसेच शासनमान्य कापूस वाणांऐवजी त्यांच्याकडून मान्यता नसलेल्या एचटीबीटीचा पुरवठा होण्याची शक्‍यता आहे.

परिणामी शेतकऱ्यांनी अशा व्यक्‍तींपासून सावध राहावे. कापूस बियाण्यांची खरेदी अधिकृत बियाणेधारकांकडूनच करावी. त्यांच्याकडून पक्‍की पावती घ्यावी. बिलात पीक वाण, लॉट क्रमांक, वजन, अंतिम मुदत, कंपनीचे पूर्ण नाव नमूद आहे का? याची खात्री करावी. दुकानदाराने पक्‍के बिल न दिल्यास तत्काळ त्याची तक्रार कृषी विभागाकडे करावी. जिल्ह्यात कोणीही अनधिकृत बियाणे विक्री करताना आढळल्यास याबाबत तत्काळ कृषी सहायकासह कृषी विभागाला कळविण्यात यावे, असेही आवाहन चवाळे यांनी केले आहे.

थेट बियाणे पुरवठ्याच्या नावाखाली काही व्यक्‍तींकडून अनधिकृत एचटीबीटी बियाण्यांचा पुरवठा होण्याची भीती आहे. त्यावर नियंत्रण राहावे याकरिता अशा व्यक्‍तींवर कायदेशीर कारवाई देखील प्रस्तावित करण्यात आली आहे. - विजय चवाळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अमरावती

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com