Agriculture news in Marathi Fear of direct distribution of unauthorized inputs | Agrowon

परवानगी नसलेल्या एचटीबीटी बियाण्यांचा पुरवठा होऊ शकतो...

टीम अॅग्रोवन
सोमवार, 1 जून 2020

अमरावती ः घरपोच बियाणे वाटपाच्या माध्यमातून परवानगी नसलेल्या एचटीबीटी बियाण्यांचा पुरवठा होऊ शकतो. या माध्यमातून फसवणूक होण्याची शक्‍यता पाहता शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे यांनी केले आहे.

अमरावती ः घरपोच बियाणे वाटपाच्या माध्यमातून परवानगी नसलेल्या एचटीबीटी बियाण्यांचा पुरवठा होऊ शकतो. या माध्यमातून फसवणूक होण्याची शक्‍यता पाहता शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे यांनी केले आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी व्यापक उपायांची अंमलबजाणी केली जात आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर थेट निविष्ठा पुरविण्याच्या उपायाचाही समावेश आहे. काही अनधिकृत निविष्ठा पुरवठादारांव्दारे या संधीचा दुरुपयोग होण्याची शक्‍यता आहे. प्रचलीत, शिफारसीत तसेच शासनमान्य कापूस वाणांऐवजी त्यांच्याकडून मान्यता नसलेल्या एचटीबीटीचा पुरवठा होण्याची शक्‍यता आहे.

परिणामी शेतकऱ्यांनी अशा व्यक्‍तींपासून सावध राहावे. कापूस बियाण्यांची खरेदी अधिकृत बियाणेधारकांकडूनच करावी. त्यांच्याकडून पक्‍की पावती घ्यावी. बिलात पीक वाण, लॉट क्रमांक, वजन, अंतिम मुदत, कंपनीचे पूर्ण नाव नमूद आहे का? याची खात्री करावी. दुकानदाराने पक्‍के बिल न दिल्यास तत्काळ त्याची तक्रार कृषी विभागाकडे करावी. जिल्ह्यात कोणीही अनधिकृत बियाणे विक्री करताना आढळल्यास याबाबत तत्काळ कृषी सहायकासह कृषी विभागाला कळविण्यात यावे, असेही आवाहन चवाळे यांनी केले आहे.

थेट बियाणे पुरवठ्याच्या नावाखाली काही व्यक्‍तींकडून अनधिकृत एचटीबीटी बियाण्यांचा पुरवठा होण्याची भीती आहे. त्यावर नियंत्रण राहावे याकरिता अशा व्यक्‍तींवर कायदेशीर कारवाई देखील प्रस्तावित करण्यात आली आहे.
- विजय चवाळे,
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अमरावती


इतर बातम्या
कृषी आयुक्त दिवसेंची बदली, गायकवाड...मुंबई : राज्य सरकारने शनिवारी महत्त्वपूर्ण...
कृषी निविष्ठा विक्रेत्यांना आरोपी नव्हे...पुणे : राज्यात खते, बियाणे, कीटकनाशकांची विक्री...
आनंदाची पातळी बदलतेय उत्पन्नांनुसारआजच्या जगामध्ये सामाजिक आर्थिक निकषांमध्ये वेगाने...
सजीव प्रजातींची सर्वमान्य यादी...पृथ्वीवरील सर्व ज्ञात प्रजातींची जागतिक पातळीवर...
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यात कृषी...औरंगाबाद : मागण्यांबाबत कार्यवाही होत नसल्याने...
परभणी जिल्ह्यात आधार प्रमाणिकरणाचे २९...परभणी : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
परभणी, नांदेड, हिंगोलीत निविष्ठा...परभणी : कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी विविध...
सांगली जिल्ह्यात खते, बियाण्यांच्या ६९...सांगली :‘कृषी विभागाने जिल्ह्यातील ६९ किटकनाशके,...
सांगली जिल्ह्यात दोन लाख १९ हजार हेक्‍...सांगली : जिल्ह्यात पावसांचा खंड असला तरी  ...
कोल्हापुरात दिड हजार, खते, बियाणे...कोल्हापूर  : बियाण्यांच्या उगवणीप्रश्नी...
विदर्भात दहा हजार कृषी केंद्रांना टाळेनागपूर : कृषी विक्रेत्यांच्या न्याय्य...
नाशिक जिल्ह्यात कृषी निविष्ठा...नाशिक : कृषी निविष्ठा विक्री केंद्रांवरील...
वऱ्हाडात कृषी विक्रेत्यांचा कडकडीत बंदअकोला : सोयाबीन बियाणे न उगवल्या प्रकरणी...
नाशिक जिल्ह्यात सोयाबीन बियाणे न...नाशिक : खरिपाच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाला....
राज्यात कृषी सेवा केंद्रांचा बंद सुरूपुणेः सोयाबीन बियाणे न उगवल्या प्रकरणी...
सोलापुरात कृषी सेवा केंद्रांचा बंद...सोलापूर : बियाणे उगवणीबाबत झालेल्या तक्रारीच्या...
शेती क्षेत्रातील बदल टप्याटप्याने...नागपूर ः शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत कृषी...
पुणे जिल्ह्यात कृषी सेवा केंद्रे बंदपुणे : महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टीसाईड्स...
‘जिल्हा परिषद, ग्रामपंचायत अधिकारी, ...मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
बेलखेडा होणार संत्रा उत्पादक गावरिसोड, जि. वाशीम ः तालुक्यातील दोन हजार लोकसंख्या...