Agriculture news in marathi Fear of lockdown Sale of onions from farmers | Agrowon

लॉकडाउनच्या भीतीने शेतकऱ्यांकडून कांदा विक्री

टीम अॅग्रोवन
सोमवार, 5 एप्रिल 2021

लॉकडाउनच्या चर्चेमुळे सोलापूर बाजारा कांद्याचा महापूर आला आहे. सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी तब्बल ३५० ट्रक कांद्याची विक्रमी आवक झाली आहे. 

सोलापूर : राज्यात आणि सोलापूर शहर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे सुरू असलेल्या लॉकडाउनच्या चर्चेमुळे सोलापूर बाजारा कांद्याचा महापूर आला आहे. सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी तब्बल ३५० ट्रक कांद्याची विक्रमी आवक झाली आहे. 

शुक्रवार गुडफ्रायडे आणि रंगपंचमी यामुळे सोलापूर बाजार समितीस सुटी असल्याने तसेच कोरोनाचे संकट वाढत असल्याने राज्यात पुन्हा लॉकडाउन होण्याची चर्चा जोर धरु लागली आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील तसेच इतर जिल्ह्यातील देखील शेतकरी कांदा विक्रीसाठी सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आणल्याने शनिवारी बाजार समितीत कांद्याचा महापूर आल्याचे दिसून आले. तरी देखील दर मात्र स्थिर राहिले आहेत असे सूत्रांनी सांगितले. उत्तम प्रतिचा कांदा प्रतिक्‍विंटल ५०० ते १४०० रुपये पर्यंत भाव मिळाला आहे. त्यामुळे मार्केटमध्ये खरेदी विक्रीसाठी मोठी गर्दी झाल्याचे पहायला मिळाले.

कांद्याला प्रतिकिक्‍वंटलला सर्वाधिक १४०० रुपये इतका दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. बाजार समितीच्या आवारात रविवारी सुट्टी असल्याने शनिवारी कांद्याची आवक झाल्याचे सूत्रांनी सांगितले. 
शनिवारी ३५० गाड्यांपर्यंत अवक झाली आहे. कांद्याची आवक जिल्ह्यातूनच सर्वाधिक झाली आहे. त्याचबरोबर पुणे, नगर, कर्नाटकमधील विजापूर, येथून कांद्याची आवक होत आहे. मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत असली तरी देखील दर मात्र स्थिर राहिले आहेत. कांद्याला किमान ३०० रुपये, सरासरी ५०० रुपये, सर्वाधिक १४०० रुपये इतका दर मिळाल्याचे सांगण्यात आले.

पुढील आठवडाभर असणार आवक
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी ३५० गाड्यांची आवक झाली. राज्यात लॉकडाउन आणि सलग सुट्ट्यांमुळे पुढील आठवडाभर कांद्याची आवक मोठी असणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. कांदा हा नाशिवंत माल असल्याने लॉकडाउन झाले तर नुकसान होईल या भीतीने काढणीनंतर त्वरीत कांदा बाजारापेठेत आणला जात आहे.


इतर ताज्या घडामोडी
शेततळ्याच्या अनुदानासाठी नगरला सर्वाधिक...नगर ः नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केलेल्या...
कृषिपंपांची वीजतोडणी मोहीम तत्काळ...हिंगणा, जि. नागपूर : महावितरण कंपनीने कृषिपंपाचे...
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत...जलालखेडा, जि. नागपूर : खरीप हंगाम सन २०२१-२२ ला...
अर्धापूर भागात केळीवर रोटावेटर; रोग,...नांदेड : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे...
लाच घेताना पेठ तालुका कृषी अधिकाऱ्यास...नाशिक : कृषी सेवा केंद्राच्या परवान्याचे नूतनीकरण...
कृषिमंत्र्यांच्या तालुक्याची अतिवृष्टी...नाशिक: जिल्ह्यात ऑगस्ट-सप्टेंबर २०२१ दरम्यान...
यवतमाळ : पाणंद रस्त्यांची मोहीम अर्धवटयवतमाळ : शेतकऱ्यांच्या दृष्टीने पाणंद रस्ते अतिशय...
सोलापूर जिल्ह्यात जलजीवन मिशनच्या...सोलापूर ः जिल्ह्याच्या विविध भागांतील...
सोलापूर जिल्ह्यात फळपीक विम्याचा लाभ...सोलापूर : प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत...
खानदेशात रब्बी पिकांची पेरणी २०...जळगाव  ः खानदेशात रब्बी हंगामातील पिकांची...
सोंडलेचा १७० कोटींचा निवाडा मंजूरचिमठाणे, जि. धुळे : शिंदखेडा व धुळे तालुक्यांना...
जळगाव जिल्ह्यात भरडधान्य खरेदी योजनेचा...जळगाव ः जिल्ह्यात भरडधान्य खरेदीसाठी शेतकऱ्यांना...
लासलगांव बाजार समितीत शेतमाल तारण कर्ज...नाशिक : निफाड तालुक्यात मका व सोयाबीन काढणीचे काम...
मेशी येथे आधारभूत खरेदी किंमतकडे...मेशी, ता. देवळा : आधारभूत किंमत खरेदी योजनेतर्गत...
गावकऱ्यांच्या श्रमामुळे ‘पद्मश्री’ :...नगर : ‘‘राजकारणापासून दूर राहून गावाच्या विकासावर...
‘स्वाभिमानी’च्या आंदोलनाची १७ ला...बुलडाणा : कापूस-सोयाबीन उत्पादकांचे प्रश्‍न,...
बारावीच्या परीक्षेसाठी आजपासून अर्ज...मुंबई : राज्य शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च...
जर्मनीत कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढले बर्लिन: जगभरात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत...
मुंबईत गुरुवारी २८३ नवे कोरोना रुग्ण; २...मुंबई : बुधवारच्या तुलनेत मुंबईत कोविड बाधित...
चेन्नई पुन्हा जलमय; अतिवृष्टीचा जबर...चेन्नई ः तमिळनाडूवर अतिवृष्टीचे संकट घोंघावू...