लॉकडाउनच्या भीतीने खानदेशात कलिंगड काढणीला वेग

खानदेशात लॉकडाउनच्या भीतीने पक्व किंवा काढणीवर आलेले कलिंगड काढणीला वेग आला आहे. दर स्थिर असून, जागेवरच पाच रुपये प्रतिकिलोचा दर मिळत आहे.
लॉकडाउनच्या भीतीने  कलिंगड काढणीला वेग Fear of lockdown Speed up watering
लॉकडाउनच्या भीतीने  कलिंगड काढणीला वेग Fear of lockdown Speed up watering

जळगाव : खानदेशात लॉकडाउनच्या भीतीने पक्व किंवा काढणीवर आलेले कलिंगड काढणीला वेग आला आहे. दर स्थिर असून, जागेवरच पाच रुपये प्रतिकिलोचा दर मिळत आहे. 

कलिंगडाच्या दरात मागील पंधरवड्यात किलोमागे एक ते दीड रुपये घसरण झाली आहे. परंतु गेले चार दिवस दर स्थिर आहेत. सध्या कलिंगडाची काढणी धुळ्यातील शिरपूर, धुळे, जळगावमधील चोपडा, यावल, रावेर, जळगाव, जामनेर, मुक्ताईनगर आदी भागात अधिक होत आहे. याच भागात तापी, गिरणा, पांझरा, अनेर नदीकाठच्या भागात लागवड झाली होती. यंदा लागवड सुमारे पाच हजार हेक्टरवर झाली होती. 

चोपडा, जळगाव, शिरपूर तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी लहान किंवा कांदेबाग केळी पिकात आंतरपीक म्हणून कलिंगड घेतले आहे. आगाप लागवडीच्या पिकाची काढणी मार्चच्या सुरवातीला सुरू झाली. तर हंगामातील लागवडीच्या कलिंगडाची काढणी गेल्या आठवड्यात सुरू झाली आहे. 

...यामुळे दर नरम सध्या खानदेशात प्रतिदिन सरासरी १३ ट्रक (एक ट्रक १५ टन क्षमता) कलिंगडाची आवक होत आहे. खरेदी धुळे, शिरपूर, चोपडा, जळगाव, जामनेर, रावेर आदी भागातील एजंट करीत आहेत. राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशात कलिंगडाची पाठवणूक सुरू आहे. आवक वाढली आहे. यामुळे दरात किंचित घसरण झाली आहे. परंतु लॉकडाऊनच्या भीतीतही मागणी टिकून असल्याने दरात मोठी घसरण झालेली नाही. काढणी आणखी १० ते १२ दिवस सुरू राहणार आहे. यानंतर फारसे कलिंगड जळगाव, धुळ्यात काढणीसाठी उपलब्ध नसणार अशी स्थिती आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com