खानदेशात पावसाच्या भीतीने कलिंगड काढणीला वेग

जळगाव ः खानदेशात गेले २० दिवस ढगाळ वातावरण होते. त्यात या आठवड्याच्या सुरवातीला अनेक भागात गारपीट, वादळी पाऊस झाला. यामुळे पिकांची हानी झाली आहे.
Fear of rains in Khandesh accelerates harvesting of Kalingad
Fear of rains in Khandesh accelerates harvesting of Kalingad

जळगाव  ः  खानदेशात गेले २० दिवस ढगाळ वातावरण होते. त्यात या आठवड्याच्या सुरवातीला अनेक भागात गारपीट, वादळी पाऊस झाला. यामुळे पिकांची हानी झाली आहे. कलिंगडालाही फटका अनेक भागात बसला. या भीतीने फटका न बसलेल्या भागातील शेतकऱ्यांनी किंलगड काढणीला वेग दिला आहे. परिणामी बाजारातील आवक वाढली आहे. दरावर परिणाम झाला असून, किलोमागे एक रुपयांची घसरण झाली आहे. किमान दर चार व कमाल दर सहा रुपये प्रतिकिलो, असा मिळत आहे. 

कलिंगडाची काढणी वेगात सुरू आहे. दर गेल्या पंधरवड्यात दर स्थिर होते. कोरोनाचे संकट दरावर दबाव आणू शकलेले नव्हते. कमाल दर आठ रुपये व किमान दर पाच रुपये प्रतिकिलो, असा होता. जागेवरच प्रतिकिलो सात ते आठ रुपये दर शेतकऱ्यांना मिळत होता. याच कालावधीत ढगाळ वातावरण तयार झाले. यामुळे कलिंगडाची काढणी ढगाळ, पावसाळी वातावरणामुळे रखडत सुरू होती. पण दर स्थिर होते. 

दरम्यान, शनिवारी (ता.२०) वादळी पाऊस, गारपिटीला सुरवात झाली. गारपीट धुळे, साक्री, जळगावमधील पाचोरा, चाळीसगाव, जामनेर, भडगाव भागात झाली. इतर भागात वादळी पाऊस, सुसाट वारा अशी स्थिती होती. परंतु आपल्या भागातही पाऊस येईल, अशी भीती कलिंगड उत्पादकांमध्ये तयार झाली.

जामनेर, पाचोरा, चाळीसगाव भागात कलिंगडाचे मोठे नुकसान गारपिटीत झाले आहे. या स्थितीत अनेक भागात कलिंगड काढणीवर आले. त्याची काढणी शेतकऱ्यांनी सुरू केली. यामुळे दरावर परिणाम झाला आहे. 

दहा दिवसांत २६ ट्रकची आवक

खरेदीदारदेखील उत्तर भारतासह राजस्थान, गुजरातेत कलिंगडाची साठवणूक करीत आहेत. कलिंगडाची गेल्या आठ-१० दिवसांत जळगाव, धुळे जिल्ह्यात प्रतिदिन सरासरी २६ ट्रक (एक ट्रक १५ टन क्षमता) आवक झाली आहे.  यंदा उत्पादनही वाढले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com