agriculture news in Marathi Fee recovery from farmer in Amalner vegetable market Maharashtra | Agrowon

अमळनेरच्या भाजी बाजारात शेतकऱ्यांकडून शुल्क वसुली 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2020

येथील मासळी बाजारानजीकच्या भाजी मार्केटमध्ये सकाळी लिलाव करताना शेतकऱ्यांकडून तब्बल शेकडा आठ रुपये शुल्क वसुली केली जात असल्याचा प्रकार गेले अनेक वर्षे सुरू आहे.

अमळनेर, जि.जळगाव ः येथील मासळी बाजारानजीकच्या भाजी मार्केटमध्ये सकाळी लिलाव करताना शेतकऱ्यांकडून तब्बल शेकडा आठ रुपये शुल्क वसुली केली जात असल्याचा प्रकार गेले अनेक वर्षे सुरू आहे. अमळनेर बाजार समितीने आपला वसुलीशी संबंध नाही, हे भाजी मार्केट पालिकेच्या अंतर्गत कार्यरत आहे, असे सांगितले आहे. केंद्र व राज्य सरकार शेतमाल, भाजीपाला, फळे नियमनमुक्त करीत आहेत. परंतु हे कायदे, सरकारची भूमिका याला धाब्यावर बसवून ही करवसुली अमळनेरात बिनबोभाट सुरू असल्याने शेतकऱ्यांची लूट सुरू असल्याचा मुद्दा ऐेरणीवर आला आहे. 

काही वर्षांपूर्वी या भाजीबाजारात बाजार समितीतर्फे शुल्क वसुली केली जात होती. परंतु अलीकडे या बाजाराचा कारभार पालिकेच्या अंतर्गत आला आहे. येथे अडतदार, व्यापारी यांची स्वतंत्र असोसिएशन आहे. स्वतंत्र कारभार या असोसिएशनचा सुरू आहे. फळे व लिंबू विक्रेत्यांकडून किंवा शेतकऱ्यांकडून रोज सकाळी शेकडा आठ रुपये कर किंवा शुल्क वसुली केली जाते. लिंबू, सीताफळ, पेरू, पपई, कलिंगड, चिकू आदी फळांची चांगली आवक बाजारात हंगामात सुरू असते. उत्पादकांकडून सर्रास सेस वसुली केली जाते. 

यासंदर्भात एका शेतकऱ्याने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर या प्रकाराची माहिती दिली. या शेतकऱ्यानुसार रोज सकाळी आठला फळांचे लिलाव केले जातात. फळे खरेदीदारांमध्ये काही मंडळी आपले कायदे राबवितात. त्यांचे कर्मचारी लिलावानंतर शेकडा आठ रुपये फळ उत्पादक शेतकऱ्यांकडून वसुली करतात. मी याबाबत अमळनेर येथील बाजार समितीकडे तक्रार केली होती, परंतु यासंदर्भात तोडगा किंवा ठोस कार्यवाही झाली नाही. ही वसुली सुरूच आहे. खरेदीदारांची ‘मोनोपॉली’ तयार झाली आहे. बाजार समितीचे प्रशासन किंवा उपनिबंधक कार्यालयाने याबाबत कारवाई करावी. शेतमाल नियमनमुक्त आहे. शेतकऱ्यांकडून तर बाजार समितीतही वसुली केली जात नाही. सरकारच्या कायद्यांविरोधात जाऊन अमळनेरच्या भाजी मार्केटमध्ये वसुली केली जाते. वर्षाला लाखो रुपये वसुल केले जातात, असेही शेतकरी म्हणाले. 

प्रतिक्रिया
अमळनेरच्या भाजी मार्केटमध्ये जी वसुली फळ उत्पादकांकडून केली जाते. त्याच्याशी बाजार समिताचा संबंध नाही. भाजी मार्केटचा कारभार नगरपालिकेच्या अंतर्गत सुरू आहे. परंतु याबाबत आमच्याकडे तक्रार आल्यास आम्ही योग्य ती कायदेशीर मदत शेतकऱ्यांना करू. तसेच पालिकेकडे याची माहिती देवू. 
- जी.एच.पाटील, प्रशासक, अमळनेर बाजार समिती 
 


इतर अॅग्रो विशेष
‘सूक्ष्म सिंचन’प्रकरणी चौकशी...औरंगाबाद/जालना : जालना जिल्ह्यात सूक्ष्म सिंचन...
बीजोत्पादन क्षेत्र नोंदणीला मुदतवाढपुणे : राज्यात रब्बी हंगामासाठी घेतल्या जाणाऱ्या...
कमी कालावधीत पक्व होणारे मधुर कलिंगड...नाशिक : बंगळूर येथील भारतीय फलोत्पादन संशोधन...
किमान तापमानात घट होणार पुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेले निवार...
डाळिंब दरात मोठी सुधारणासांगली ः राज्यातील डाळिंब पीक यंदा सततचा पाऊस आणि...
पामतेल आयात शुल्कात कपात; केंद्र...नवी दिल्ली ः केंद्र सरकारने कच्च्या...
टंचाईग्रस्त दहीगाव झाले लोकसहभागातून...सातारा जिल्ह्यातील दहीगाव गावातील ग्रामस्थांनी...
'निवार’ चक्रीवादळाचा प्रभाव; राज्यात...पुणे ः बंगालच्या उपसागरात पूर्व किनाऱ्याकडे...
केळीची मागणी कायम, दर टिकून जळगाव : दाक्षिणात्य व गुजरातमधील केळीची उत्तर...
तमिळनाडू, पुद्दुचेरीत धुमाकूळचेन्नई  ः निवार चक्रीवादळामुळे वेगवान...
गहू, हरभरा पेरणीला वेगपुणे : यंदा चांगल्या पाणीसाठ्यामुळे गहू व...
पहिल्याच टप्प्यात थकवली ३५० कोटींची ‘...पुणे : राज्याचा ऊस गाळप हंगाम सुरू झाल्यानंतर...
आर्थिक चणचण,‘लम्पी’चे पशुधन बाजारावर...सांगली ः लॉकडाउनमुळे पशुधानाचे आठवडे बाजार तब्बल...
ऊसतोडणी मजुरांची संख्या यंदा दोन...नगर : राज्यातील साखर कारखान्यांवर ऊसतोडणी...
पणन महासंघाची खरेदी उद्यापासूननागपूर : महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक...
मराठवाड्यातील बहुतांश धरणे तुडुंबऔरंगाबाद : यंदा जोरदार पावसामुळे मराठवाड्यातील...
संकटकाळात श्री ब्रॅण्डद्वारे दर्जेदार...नाशिक जिल्ह्यातील वनसगाव येथील शैलेश व संदीप या...
सणांच्या हंगामात भाव खाणारी गाडे यांची...कांजळे (ता. भोर, जि. पुणे) येथील विलास गाडे यांनी...
महाटीत उपसरपंचपदासाठी साडेदहा लाखांची...नांदेड ः ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी उपसरपंचपदाचा...
राज्यात शनिवारपासून ‘जनप्रबोधन यात्रा’नगर/पुणे ः शेतकरी आत्महत्येला कारणीभूत असलेल्या...