agriculture news in Marathi Fee recovery from farmer in Amalner vegetable market Maharashtra | Page 2 ||| Agrowon

अमळनेरच्या भाजी बाजारात शेतकऱ्यांकडून शुल्क वसुली 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2020

येथील मासळी बाजारानजीकच्या भाजी मार्केटमध्ये सकाळी लिलाव करताना शेतकऱ्यांकडून तब्बल शेकडा आठ रुपये शुल्क वसुली केली जात असल्याचा प्रकार गेले अनेक वर्षे सुरू आहे.

अमळनेर, जि.जळगाव ः येथील मासळी बाजारानजीकच्या भाजी मार्केटमध्ये सकाळी लिलाव करताना शेतकऱ्यांकडून तब्बल शेकडा आठ रुपये शुल्क वसुली केली जात असल्याचा प्रकार गेले अनेक वर्षे सुरू आहे. अमळनेर बाजार समितीने आपला वसुलीशी संबंध नाही, हे भाजी मार्केट पालिकेच्या अंतर्गत कार्यरत आहे, असे सांगितले आहे. केंद्र व राज्य सरकार शेतमाल, भाजीपाला, फळे नियमनमुक्त करीत आहेत. परंतु हे कायदे, सरकारची भूमिका याला धाब्यावर बसवून ही करवसुली अमळनेरात बिनबोभाट सुरू असल्याने शेतकऱ्यांची लूट सुरू असल्याचा मुद्दा ऐेरणीवर आला आहे. 

काही वर्षांपूर्वी या भाजीबाजारात बाजार समितीतर्फे शुल्क वसुली केली जात होती. परंतु अलीकडे या बाजाराचा कारभार पालिकेच्या अंतर्गत आला आहे. येथे अडतदार, व्यापारी यांची स्वतंत्र असोसिएशन आहे. स्वतंत्र कारभार या असोसिएशनचा सुरू आहे. फळे व लिंबू विक्रेत्यांकडून किंवा शेतकऱ्यांकडून रोज सकाळी शेकडा आठ रुपये कर किंवा शुल्क वसुली केली जाते. लिंबू, सीताफळ, पेरू, पपई, कलिंगड, चिकू आदी फळांची चांगली आवक बाजारात हंगामात सुरू असते. उत्पादकांकडून सर्रास सेस वसुली केली जाते. 

यासंदर्भात एका शेतकऱ्याने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर या प्रकाराची माहिती दिली. या शेतकऱ्यानुसार रोज सकाळी आठला फळांचे लिलाव केले जातात. फळे खरेदीदारांमध्ये काही मंडळी आपले कायदे राबवितात. त्यांचे कर्मचारी लिलावानंतर शेकडा आठ रुपये फळ उत्पादक शेतकऱ्यांकडून वसुली करतात. मी याबाबत अमळनेर येथील बाजार समितीकडे तक्रार केली होती, परंतु यासंदर्भात तोडगा किंवा ठोस कार्यवाही झाली नाही. ही वसुली सुरूच आहे. खरेदीदारांची ‘मोनोपॉली’ तयार झाली आहे. बाजार समितीचे प्रशासन किंवा उपनिबंधक कार्यालयाने याबाबत कारवाई करावी. शेतमाल नियमनमुक्त आहे. शेतकऱ्यांकडून तर बाजार समितीतही वसुली केली जात नाही. सरकारच्या कायद्यांविरोधात जाऊन अमळनेरच्या भाजी मार्केटमध्ये वसुली केली जाते. वर्षाला लाखो रुपये वसुल केले जातात, असेही शेतकरी म्हणाले. 

प्रतिक्रिया
अमळनेरच्या भाजी मार्केटमध्ये जी वसुली फळ उत्पादकांकडून केली जाते. त्याच्याशी बाजार समिताचा संबंध नाही. भाजी मार्केटचा कारभार नगरपालिकेच्या अंतर्गत सुरू आहे. परंतु याबाबत आमच्याकडे तक्रार आल्यास आम्ही योग्य ती कायदेशीर मदत शेतकऱ्यांना करू. तसेच पालिकेकडे याची माहिती देवू. 
- जी.एच.पाटील, प्रशासक, अमळनेर बाजार समिती 
 


इतर अॅग्रो विशेष
पानांचे दर दबावात; उत्पादकांना फटकासांगली : गेल्या आठ महिन्यांपासून बाजारपेठेत...
खानदेशात ‘सीसीआय’कडून २५ हजार क्विंटल...जळगाव ः खानदेशात कापूस महामंडळाकडून (सीसीआय)...
‘कार्तिकी’च्या काळात पंढरपूरसह ...सोलापूर : यंदा कार्तिकी यात्रेच्या पार्श्‍वभूमीवर...
‘महाबीज’चे कर्मचारी जाणार सात...अकोला ः सातवा वेतन आयोग, पाच दिवसांचा आठवडा यांसह...
खाद्यतेल आयातीत १२ टक्के घटपुणे ः देशात २०१९-२० (नोव्हेंबर ते ऑक्टोबर) मध्ये...
कृषी सचिवांच्या गावातील शेतकऱ्यांचा कल...अकोला ः राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांच्या...
पूर्वहंगामी द्राक्षाला २०० कोटींचा फटकानाशिक : यंदा पूर्वहंगामी द्राक्ष हंगामाच्या...
शासकीय योजनांच्या विहिरींमुळे वाढतोय...मालेगाव, जि. वाशीम ः  जिल्हा परिषद, कृषी...
दहिगावात दोन एकरांतील कापूस नेला चोरूनअकोला ः यंदा शेतशिवारात सर्वच पिकांची उत्पादकता...
मध्य महाराष्ट्र, विदर्भात पावसाची...पुणे ः राज्यातील काही भागांत अंशतः ढगाळ वातावरण...
चटणी, मसाल्याचा बनविला ब्रॅण्डकोल्हापूरची खाद्य संस्कृती म्हटलं की, तिखटाबरोबर...
शेती, आरोग्य अन् महिला विकासाची शक्तीगोमेवाडी (ता. आटपाडी, जि. सांगली) येथील ग्रामीण...
भार व्यवस्थापनाचे बळीजालना जिल्ह्यातील पळसखेडा पिंपळे येथील तिघे...
ढगाळ वातावरणामुळे तूर पीक संकटातऔरंगाबाद : गत तीन-चार दिवसांपासून सतत ढगाळ...
मराठवाड्यात नुकसानग्रस्तांना ९३६ कोटी...औरंगाबाद : मराठवाड्यात यंदा जून ते ऑक्टोबर या...
शेतीला तीन वर्षांत टप्प्याटप्प्याने ...मुंबई :  सर्व कृषी ग्राहकांना तीन वर्षांत...
काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यतापुणे ः पश्‍चिम मध्य प्रदेश, उत्तर मध्य महाराष्ट्र...
नीलक्रांतीसाठी राज्यात २० हजार कोटी...पुणे ः मत्स्योत्पादनात वाढ, मूल्यवर्धन, निर्यात,...
ढगाळ वातावरणाने वाढविली चिंतापुणे : राज्यात ढगाळ हवामान आणि पडणारा हलका ते...
चांगल्या बाजारभावासाठी ‘एनसीडीईएक्स’चा...शेतकऱ्यांसाठी दराचे संरक्षण (प्राइज इन्शुरन्स)...