agriculture news in marathi, fee waiver for students of drought effected area, mumbai, maharashtra | Agrowon

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना लेखी, प्रात्यक्षिक परीक्षेचीही फी माफी : शेलार
टीम अॅग्रोवन
बुधवार, 26 जून 2019

मुंबई ः राज्यातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कमाफीची प्रतिपूर्ती रक्कम एक महिन्याच्या आत संस्थांच्या खात्यावर जमा करण्यात येईल. यापुढे दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांच्या लेखी परीक्षेसोबत प्रात्यक्षिक परीक्षेची फीदेखील माफ करण्यात येईल, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी सोमवारी (ता. २४) विधानसभेत केली. ती रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांत जमा केली जाईल, असे ते म्हणाले.

मुंबई ः राज्यातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कमाफीची प्रतिपूर्ती रक्कम एक महिन्याच्या आत संस्थांच्या खात्यावर जमा करण्यात येईल. यापुढे दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांच्या लेखी परीक्षेसोबत प्रात्यक्षिक परीक्षेची फीदेखील माफ करण्यात येईल, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी सोमवारी (ता. २४) विधानसभेत केली. ती रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांत जमा केली जाईल, असे ते म्हणाले.

दुष्काळग्रस्त भागातील शालेय विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याबाबतच्या निर्णयावर सदस्य भारत भालके यांनी प्रश्नोत्तराच्या तासात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्याबाबत त्यांनी मंगळवेढा आणि पंढरपूर या तालुक्यांतील शाळांचे प्रस्ताव आणि त्याबाबतची परिपूर्ती असा मूळ प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नाला उत्तर देताना श्री. शेलार यांनी ही माहिती दिली.

शुल्क प्रतिपूर्तीसाठी सोलापूर जिल्ह्यातील पात्र असलेल्या ९७२ माध्यमिक शाळांपैकी ५१८ शाळांचे प्रस्ताव प्राप्त झाले असून, पंढरपूर तालुक्यातील ७७ आणि मंगळवेढा तालुक्यातील ३४ शाळांचा त्यामध्ये समावेश आहे, अशी माहिती श्री. शेलार यांनी या वेळी दिली. महसूल आणि वन विभागाच्या ३१ ऑक्टोबर २०१८ व ६ नोव्हेंबर २०१८ च्या शासन निर्णयानुसार दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केलेला तालुक्यांना आणि महसूल मंडळातील उर्वरित शाळांकडून असे प्रस्ताव प्राप्त करून त्यावर कार्यवाही करण्यात येत आहे, असे ते या वेळी म्हणाले. या परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती रक्कम एक महिन्याच्या आत जमा केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी या वेळी दिले.

दुष्काळ जाहीर झालेल्या विभागातील इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना शासनाकडून परीक्षा शुल्कमाफी दिली जात आहे. त्यामुळे  माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या शिक्षण संचालकांकडे लेखी प्रस्ताव दाखल करण्यात आले, मात्र अद्यापही त्याची पूर्तता झाली नाही. शिवाय जितक्या माध्यमिक शाळा विभागात आहेत, त्यापैकी निम्म्याच शाळांचे प्रस्ताव विभागाकडे प्राप्त झाले आहेत, याबाबत श्री. भालके यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केले होते. त्या प्रश्नांना उत्तर देताना शेलार यांनी हे आश्वासन दिले.
 

इतर ताज्या घडामोडी
सांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...
‘शेतकरी सन्मान’साठी रत्नागिरीतील दीड...रत्नागिरी   : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
वृक्ष संवर्धनासाठी नागरिक, कर्मचारी...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
नांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
...तर रासायनिक खते, कीटकनाशकांचे ...पुणे  ः  केंद्र सरकारच्या वतीने झिरो...
पक्षांतरानंतर रिक्त जागांवर तरुणांना...नगर  : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये...
पुणे विभागात खरिपाचा ३६ टक्के...पुणे  ः जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अजूनही...
‘जलयुक्त’च्या पुरस्काराची गावांना...नगर  ः लोकसहभागातून जलयुक्त शिवार अभियान...
जनजागृतीसाठी अन्नसुरक्षा पंधरवडा...मुंबई  : राज्यात काही ठिकाणी होणारी दूध व...
भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील दूध...भंडारा   ः रेल्वेच्या माध्यमातून नागपूर...
अमरावती जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअमरावती   ः जिल्ह्यातील चौदाही...
समृद्धी महामार्गामुळे राज्याच्या आर्थिक...अमरावती  : समृद्धी महामार्गामुळे राज्याच्या...
वनशेतीसाठी मोह लागवड उपयुक्तजंगलामध्ये पानझडी वृक्षवर्गातील मोह हे एक...
गुलटेकडीत टोमॅटो, शेवगा, फ्लॉवरच्या...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
लाल कांद्याची लागवड वाढण्याची शक्‍यताजळगाव ः खानदेशात आगाप कांदा लागवडीसंबंधी...
पाटण तालुक्यात भातलागणीस वेगपाटण, जि. सातारा ः तालुक्‍यात मॉन्सूनने २७...
नगर झेडपी घेणार साडेसात हजार हेक्‍टरवर...नगर ः चाराटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा...
मराठवाड्यात ‘महारेशीम’साठी १० हजारांवर...औरंगाबाद :  शेतकऱ्यांना शाश्‍वत उत्पन्नाचा...
नाशिक जिल्ह्यात पाण्यासह चाऱ्याचा प्रश्...नाशिक  : जिल्ह्याच्या बहुतांश भागात पावसाचे...
सांगली जिल्ह्यातील ५२ प्रकल्प कोरडेसांगली : पावसाळा सुरू होऊन दीड महिना झाला तरीही...