Agriculture news in marathi A female leopard was seen in the seal with two cubs | Agrowon

मोहरीत मादी बिबट्या दोन बछड्यांसह दिसल्याने घबराट 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 21 नोव्हेंबर 2020

तीन बालकांचे बळी घेतल्यानंतर व दोन मादी बिबटे पकडल्यानंतरही पाथर्डी तालुक्यातील मोहरी शिवारात पुन्हा एका मादी बिबट्या दोन बछड्यांसह दिसल्याने खळबळ उडाली आहे.

नगर : तीन बालकांचे बळी घेतल्यानंतर व दोन मादी बिबटे पकडल्यानंतरही पाथर्डी तालुक्यातील मोहरी शिवारात पुन्हा एका मादी बिबट्या दोन बछड्यांसह दिसल्याने खळबळ उडाली आहे. पाथर्डी तालुक्याला लागून असलेल्या मानुर (ता. शिरूर कासार) येथे गुरुवारी (ता. १९) दोन गायींवर हल्ला केल्याने शेतकऱ्यांनी धास्ती घेतली आहे.

पाथर्डी तालुक्‍यातील वृद्धेश्वर, शिरापूर, मढीसह मोहटादेवी परिसरातील मोहरी, भागात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याची दहशत सुरू आहे. या भागात तीन बालकांसह अनेक जनावरांचा बिबट्याने बळी घेतला आहे. आतापर्यंत दोन मादी बिबट्याला वनविभागाच्या पथकाने पकडले आहे. अजूनही या भागात वीस पेक्षा अधिक पिंजरे लावलेले आहेत. असे असताना काल पुन्हा मोहरी परिसरातील गोसावी वस्तीवर बुधवारी रात्री बिबट्याची मादी व दोन बछडे सायंकाळी सुनील बन यांच्या

घरामागच्या नाल्याच्या भिंतीलगत दिसले. येथील नरोटे वस्तीवरील पोपट पालवे यांच्या म्हशीला बिबट्याने जखमी केले. यामुळे या भागात अजून काही बिबटे असल्याची शक्यता ग्रहीत धरत शेतकरी धस्तावले आहेत. दरम्यान, पाथर्डी तालुक्याला लागून असलेल्या मानुर (ता. शिरूर कासार) येथे गुरुवारी (ता. १९) दोन गायींवर हल्ला करून जखमी केले. या भागात कापसाचे क्षेत्र अधिक असून, कापूस वेचणीचे काम सुरू आहे. तुरीचे पीकही मोठे झालेले आहे. त्यामुळे बिबट्याला दडण असल्याने धास्ती अधिक वाढली आहे. वनविभागाने तातडीने पिंजरे लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे.
 


इतर ताज्या घडामोडी
सोयाबीन पेंडची आयात शुल्काविना करावीनागपूर : भारतात सोयाबीन पेंडचे दर गगनाला...
दूधदरात पुन्हा दोन रुपयांची कपातनगर ः कोरोना संसर्ग वरचेवर वाढत असल्याने लॉकडाउन...
देशातील पहिले कृषी निर्यात मार्गदर्शन...पुणे ः राज्यातील शेतकरी व उदयोन्मुख...
उत्तर भारतातील कापूस लागवड पूर्णत्वाकडेजळगाव ः देशात उत्तर भारतातील कापूस लागवडीने वेग...
कृषी खात्यातील बदल्या लांबणीवरपुणे ः ऐन कोरोना कालावधीत बदल्यांचा घाट रचलेल्या...
खाद्यतेल दरात गतवर्षीपेक्षा ८० टक्के वाढनागपूर : शेंगदाण्याची निर्यात तसेच पाम तेलावरील...
पूर्व विदर्भात ४५ लाख क्विंटल धान खराब...गोंदिया : भात उत्पादक पूर्व विदर्भातील पाच...
पशुवैद्यक करणार घरपोच सेवा बंदनागपूर : पशुवैद्यकांना फ्रंटलाइन वर्कर्स व कोरोना...
सोयाबीन बियाणे निर्बंध मध्य प्रदेशकडून...पुणे ः परराज्यांत सोयाबीन बियाणे विक्रीवर निर्बंध...
‘महाबीज’चे सोयाबीन बियाणे दर ‘जैसे थे’अकोला : खरीप हंगामासाठी ‘महाबीज’ने सोयाबीन...
देशाच्या तुलनेत निम्मी साखर एकट्या...कोल्हापूर : देशाच्या साखरनिर्यात कोट्यापैकी जवळ...
‘गोकुळ’चा कल सत्तांतराकडेकोल्हापूर : अत्यंत चुरशीने झालेल्या कोल्हापूर...
‘सह्याद्री’च्या पर्वतरांगेमधून...नाशिक : सह्याद्रीच्या पर्वतरांगेत पश्‍चिम घाट...
राज्यात आंब्याचा हंगाम ऐन बहरातअकोल्यात बदाम आंबा ४००० ते ४५०० रुपये क्विंटल...
सोशल मीडियाद्वारे ६५ टन कलिंगड विक्रीपुणे : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी एप्रिल...
मध्य प्रदेश सरकारकडून बियाणे विक्रीवर...पुणे ः सोयाबीन बीजोत्पादनात देशात सर्वात मोठा...
पशुखाद्य निर्मितीचा कच्चा माल दुपटीने...सांगली : पशुखाद्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या...
दक्षिण भागात गारपिटीची शक्यतापुणे :  गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका...
परभणी जिल्ह्यात कडक निर्बंध लागूपरभणी ः  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी...
परभणी जिल्ह्यात लघु तलावांत सरासरी १९...परभणी ः वाढते तापमान, बाष्पीभवनाचा वाढलेला वेग,...