जळगावात मेथी २००० ते ३५०० रुपये

जळगावः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता.२२) मेथीची चार क्विंटल आवक झाली. मेथीला प्रतिक्विंटल २००० ते ३५०० रुपये दर मिळाला.
Fenugreek in Jalgaon 2000 to 3500 rupees
Fenugreek in Jalgaon 2000 to 3500 rupees

जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता.२२) मेथीची चार क्विंटल आवक झाली. मेथीला प्रतिक्विंटल २००० ते ३५०० रुपये दर मिळाला. आवक जामनेर, एरंडोल, धरणगाव, जळगाव आदी भागातून होत आहे. 

बाजारात मंगळवारी गवारीची दोन क्विंटल आवक झाली. गवारीला प्रतिक्विंटल १८०० ते ४००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. आल्याची १७ क्विंटल आवक झाली. दर ३२०० ते ५२०० रुपये प्रतिक्विंटल मिळाला. भेंडीची २३ क्विंटल आवक झाली. भेंडीला प्रतिक्विंटल १००० ते १२०० रुपये दर होता.

हिरव्या मिरचीची १७ क्विंटल आवक झाली. हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटल १९०० ते ३७०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. पालकीची दीड क्विंटल आवक झाली. पालकाला प्रतिक्विंटल १४०० रुपये दर मिळाला. दोडक्‍यांची नऊ क्विंटल आवक झाली. दोडक्‍याला प्रतिक्विंटल १४५० ते २४५० रुपये दर होता. 

गिलक्‍यांची नऊ क्विंटल आवक झाली. गिलक्‍यास प्रतिक्विंटल १६०० ते २८०० रुपये दर मिळाला.  टोमॅटोची सात क्विंटल आवक झाली. टोमॅटोला प्रतिक्विंटल २१०० ते ३९०० रुपये दर मिळाला. बीटची आठ क्विंटल आवक झाली. बीटला प्रतिक्विंटल १५०० ते २५०० रुपये दर होता.

काशीफळांना ६५० ते ९५० रूपये 

 काशीफळांची २७ क्विंटल आवक झाली. काशीफळांना प्रतिक्विंटल ६५० ते ९५० रुपये दर मिळाला. लहान काटेरी वांग्यांची १७ क्विंटल आवक झाली. वांग्यांना प्रतिक्विंटल १५०० ते २५०० रुपये दर होता. शेवगा शेंगांची दीड क्विंटल आवक झाली. शेवगा शेंगांना प्रतिक्विंटल १००० ते १६०० रुपये दर मिळाला. कोबीची १७ क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल १६५० ते २६५० रुपये, असा होता. भोपळ्याची १५ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपये दर मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com