सोलापुरात मेथी, शेपूचे दर पुन्हा वधारलेलेच

सोलापुरात मेथी, शेपूचे दर पुन्हा वधारलेलेच
सोलापुरात मेथी, शेपूचे दर पुन्हा वधारलेलेच

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भाज्यांच्या दरातील तेजी या सप्ताहात पुन्हा टिकून राहिली. त्यातही मेथी आणि शेपूला चांगला उठाव मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. त्याशिवाय हिरवी मिरची आणि टोमॅटोलाही या सप्ताहात मागणी राहिली.

बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात मेथीची रोज चार हजार पेंढ्या, शेपूची तीन हजार पेंढ्या आणि कोथिंबिरीची सर्वाधिक ८ ते १० हजार पेंढ्यांपर्यंत आवक राहिली. पण गेल्या सप्ताहात आवकेत काहीसा चढ-उतार राहिला. पण मागणी असल्याने दरातील तेजी या सप्ताहात पुन्हा टिकून राहिली. मेथीला शंभर पेंढ्यांसाठी ८०० ते १००० रुपये, शेपूला ९०० ते १३०० रुपये आणि कोथिंबिरीला ५०० ते ८०० रुपये असा दर मिळाला. त्याशिवाय चुका आणि पालकालाही उठाव मिळाला. पण त्यांची आवक ही तुलनेने कमीच राहिली. 

पालकाला प्रतिशंभर पेंढ्यांसाठी २०० ते ४०० रुपये आणि चुक्‍याला २०० ते ५०० रुपये असा दर मिळाला. त्याशिवाय हिरवी मिरची, टोमॅटो यांच्या मागणीत आणि आवकेतही बऱ्यापैकी वाढ राहिली. पण मागणीत सातत्य असल्याने दर पुन्हा तेजीत राहिले. हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटलला किमान २५०० रुपये, सरासरी ३००० रुपये आणि सर्वाधिक ३५०० रुपये असा दर राहिला. 

टोमॅटोला किमान ५०० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक ३००० रुपये इतका दर मिळाला.गवार, भेंडीला पुन्हा उठाव मिळाला. त्यांची आवक ही रोज ५ ते १० क्विंटल अशीच राहिली. गवारला प्रतिक्विंटलला किमान ७०० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक ३००० रुपये तर भेंडीला किमान ५०० रुपये, सरासरी १८०० रुपये आणि सर्वाधिक ३२०० रुपये इतका दर मिळाला. 

कांदा दरात सुधारणा कांद्याच्या दरात या सप्ताहात चांगलीच सुधारणा झाली. कांद्याची आवक स्थानिक भागापेक्षा बाहेरून जास्त झाली. रोज १० ते २० गाड्या अशी जेमतेम आवक होती. पण कांद्याला मागणीही चांगली राहिली. या सप्ताहात त्यामुळे दरात सुधारणा झाली. कांद्याला प्रतिक्विंटलला किमान २०० रुपये, सरासरी ८०० रुपये आणि सर्वाधिक १७०० रुपयांपर्यंत दर पोचला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com