agriculture news in Marathi, Fenugreek in Sholapur, Sheppu's rate rose increase | Agrowon

सोलापुरात मेथी, शेपूचे दर पुन्हा वधारलेलेच
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 4 जून 2019

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भाज्यांच्या दरातील तेजी या सप्ताहात पुन्हा टिकून राहिली. त्यातही मेथी आणि शेपूला चांगला उठाव मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. त्याशिवाय हिरवी मिरची आणि टोमॅटोलाही या सप्ताहात मागणी राहिली.

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भाज्यांच्या दरातील तेजी या सप्ताहात पुन्हा टिकून राहिली. त्यातही मेथी आणि शेपूला चांगला उठाव मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. त्याशिवाय हिरवी मिरची आणि टोमॅटोलाही या सप्ताहात मागणी राहिली.

बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात मेथीची रोज चार हजार पेंढ्या, शेपूची तीन हजार पेंढ्या आणि कोथिंबिरीची सर्वाधिक ८ ते १० हजार पेंढ्यांपर्यंत आवक राहिली. पण गेल्या सप्ताहात आवकेत काहीसा चढ-उतार राहिला. पण मागणी असल्याने दरातील तेजी या सप्ताहात पुन्हा टिकून राहिली. मेथीला शंभर पेंढ्यांसाठी ८०० ते १००० रुपये, शेपूला ९०० ते १३०० रुपये आणि कोथिंबिरीला ५०० ते ८०० रुपये असा दर मिळाला. त्याशिवाय चुका आणि पालकालाही उठाव मिळाला. पण त्यांची आवक ही तुलनेने कमीच राहिली. 

पालकाला प्रतिशंभर पेंढ्यांसाठी २०० ते ४०० रुपये आणि चुक्‍याला २०० ते ५०० रुपये असा दर मिळाला. त्याशिवाय हिरवी मिरची, टोमॅटो यांच्या मागणीत आणि आवकेतही बऱ्यापैकी वाढ राहिली. पण मागणीत सातत्य असल्याने दर पुन्हा तेजीत राहिले. हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटलला किमान २५०० रुपये, सरासरी ३००० रुपये आणि सर्वाधिक ३५०० रुपये असा दर राहिला. 

टोमॅटोला किमान ५०० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक ३००० रुपये इतका दर मिळाला.गवार, भेंडीला पुन्हा उठाव मिळाला. त्यांची आवक ही रोज ५ ते १० क्विंटल अशीच राहिली. गवारला प्रतिक्विंटलला किमान ७०० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक ३००० रुपये तर भेंडीला किमान ५०० रुपये, सरासरी १८०० रुपये आणि सर्वाधिक ३२०० रुपये इतका दर मिळाला. 

कांदा दरात सुधारणा
कांद्याच्या दरात या सप्ताहात चांगलीच सुधारणा झाली. कांद्याची आवक स्थानिक भागापेक्षा बाहेरून जास्त झाली. रोज १० ते २० गाड्या अशी जेमतेम आवक होती. पण कांद्याला मागणीही चांगली राहिली. या सप्ताहात त्यामुळे दरात सुधारणा झाली. कांद्याला प्रतिक्विंटलला किमान २०० रुपये, सरासरी ८०० रुपये आणि सर्वाधिक १७०० रुपयांपर्यंत दर पोचला.

इतर बाजारभाव बातम्या
खानदेशात मुगाचे दर स्थिर, उडदाच्या...जळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
औरंगाबादेत कोबी १००० ते १२०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नाशिकमध्ये कांद्याची आवक घटली; दरात वाढनाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
पितृपंधरवाड्यामुळे पुण्यात भाज्यांना...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगली येथे गूळ ३२०० ते ३८७५ रुपये...सांगली  : येथील बाजार समितीत शनिवारी (ता. १४...
परभणीत काकडी प्रतिक्विंटल ३०० ते ६००...परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
नाशिकमध्ये गवार २५०० ते ४५०० रूपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जळगावात डाळिंब २१०० ते ४८०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता....
केळीच्या मध्य प्रदेशातील आवकेत घट;...जळगाव : मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथील बाजारातील...
सोलापुरात वांगी, गवार, भेंडीच्या दरांत...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादमध्ये लिंबू २५०० ते ४५०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
कोल्हापुरात नवीन गुळाला साडेतीन ते सहा...कोल्हापूर : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शाहू...
राज्यात घेवडा प्रतिक्विंटल ८०० ते ५५००...सोलापुरात प्रतिक्विंटलला सर्वाधिक ४५०० रुपये...
नाशिकमध्ये वांगी १३०० ते ३००० रुपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सोलापुरात वांगी, घेवडा, गवारीच्या दरात...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
उत्तम दर्जाच्या मुगाला ६२५० पर्यंत दरजळगाव  ः खानदेशातील धुळे, जळगाव, साक्री,...
कळमणा बाजारात कांद्याच्या दरात सुधारणानागपूर ः मागणी वाढल्याने कळमणा बाजार समितीत कांदा...
गुलटेकडीत कांदा, लसूण, कोबीच्या दरात...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादमध्ये शेवगा ३००० ते ४५०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
राज्यात ढोबळी मिरचीला १००० ते ३००० रूपयेपुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...