Agriculture news in marathi Fenugreek, spinach, kothimbir have been missing for weeks in Aurangabad | Agrowon

औरंगाबादमध्ये आठवड्यापासून मेथी, पालक, कोथिंबिर गायब

टीम अॅग्रोवन
रविवार, 19 एप्रिल 2020

औरंगाबाद : येथील बाजार समितीमध्ये जवळपास आठवडाभरापासून मेथी, कोथिंबीर व पालक या पालेभाज्यांची आवक झाली नसल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

औरंगाबाद : येथील बाजार समितीमध्ये जवळपास आठवडाभरापासून मेथी, कोथिंबीर व पालक या पालेभाज्यांची आवक झाली नसल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

औरंगाबाद बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. १८) हिरव्या मिरचीची १४५ क्विंटल आवक झाली. तिला किमान ८०० ते कमाल १६०० रुपये प्रति क्‍विंटल असा दर मिळाला. ६१३ क्विंटल आवक झालेल्या कांद्याचे दर ५०० ते ९०० रुपये प्रति क्विंटल राहिले. ५२ क्विंटल आवक झालेल्या फ्लॉवरला ४०० ते ६०० रुपये प्रति क्‍विंटल असा दर मिळाला. १३५ क्विंटल आवक झालेल्या टोमॅटोचे दर २०० ते ३०० रुपये राहिले. १२ क्विंटल आवक झालेल्या वांग्यांना ५०० ते ८०० रुपये दर मिळाला. १५ क्विंटल आवक झालेल्या गवारीचे दर १००० ते १५०० रुपये, ६८ क्विंटल आवक झालेल्या काकडीचे दर ५०० ते ६०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. 

भेंडीची १३ क्विंटल आवक झाली. तिला किमान १००० ते कमाल १४०० रुपये प्रतिक्‍विंटल दर मिळाला. कोबीची आवक ७८ क्विंटल, तर दर ३०० ते ४०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. ९३ क्विंटल आवक झालेल्या लिंबांना २००० ते २८०० रुपये प्रति क्‍विंटल असा दर मिळाला. ४५ क्विंटल आवक झालेल्या शेवग्याचे दर ६०० ते १००० रुपये प्रतिक्विंटल राहिले. १५ क्विंटल आवक झालेल्या पपईला ६०० ते १२०० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. ५ क्विंटल आवक झालेल्या दुधी भोपळ्याचे दर ३०० ते ७०० रुपये राहिले. 

ढोबळ्या मिरचीची आवक ३४ क्विंटल, तर दर किमान ६०० ते कमाल ७०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. ११४ क्विंटल आवक झालेल्या कैरीला ६०० ते १४०० रुपये प्रति क्‍विंटलचा दर मिळाला. ५३ क्विंटल आवक झालेल्या मोसंबीला ५०० ते १३०० रुपये दर मिळाला. १५ क्विंटल आवक झालेल्या डाळिंबांचे दर ७०० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ४ क्‍विंटल आवक झालेल्या पेरूचे दर ५०० ते १००० रुपये प्रति क्‍विंटल राहिले. 

संत्र्यांना ५०० ते ४५०० रूपये 

१४ क्विंटल आवक झालेल्या संत्र्यांना ५०० ते ४५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ४१० क्‍विंटल आवक झालेल्या टरबूजांचे दर ४०० ते ५०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. ६४ आवक झालेल्या खरबुजांना ८०० ते ११०० रुपये दर मिळाला. ५०० क्विंटल आवक झालेल्या बटाट्याचे दर ४०० ते १८०० रुपये प्रति क्विंटल राहिले. द्राक्षाची आवक ७१ क्विंटल, तर दर १२०० ते २२०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. 
 


इतर बाजारभाव बातम्या
खानदेशात केळीचे दर पुन्हा दबावात जळगाव : खानदेशात केळीचे दर पुन्हा दबावात आले आहेत...
हिंगोली जिल्ह्यात मोठ्या खरेदीदारांकडून...हिंगोली : जिल्ह्यातील बाजार समित्यांतील हळदीच्या...
औरंगाबादमध्ये बटाटा १००० ते १८०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
भेंडीची तोडणी सूरू, पुरवठाही वाढला..(...नाशिक : बागायती भागातून वाढलेला पुरवठा आणि...
कोल्हापुरात फळांची आवक घटलेलीचकोल्हापूर : बाजार समितीचे व्यवहार पूर्ववत सुरू...
खानदेशात मका, गव्हाच्या दरात सुधारणा जळगाव : खानदेशात मका व गव्हाच्या दरात सुधारणा होत...
पुरवठा साखळी प्रभावित झाल्याने...सातारा  ः ‘कोरोना’चा संसर्ग टाळण्यासाठी सुरू...
खानदेशात कडब्याचे दर दबावात जळगाव  ः खानदेशात ज्वारी, मका, बाजरीच्या...
राहुरीत कांदा लिलाव सुरु, पण आवक, दर...राहुरी, जि. नगर : लॉकडाउनमुळे तब्बल दोन...
खानदेशात शिवार खरेदीत मक्याला १३००...जळगाव : खानदेशातील बाजारांत या आठवड्यात मक्‍याची...
अमरावती महापालिका हद्दीत ‘फार्म टू होम...अमरावती ः कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव...
तासगावला बेदाण्याचे सौदे प्रायोगिक...सांगली ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर २२ मार्च पासून...
औरंगाबादमध्ये ज्वारी १८०० ते २०२५ रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
लातूर जिल्ह्यात १२ केंद्रांवर १ लाख २१...लातूर : जिल्ह्यातील १२ खरेदी केंद्रांवरून...
मुंबई बाजार समितीत भाजीपाल्याची आवक...मुंबई : मुंबई बाजार समितीत कोरोनाग्रस्त...
रत्नागिरी बाजार समितीत आंब्याची अडीच...रत्नागिरी ः कोरोनाविषयक संचारबंदीमुळे अडचणीत...
औरंगाबाधमध्ये हिरवी मिरची १००० ते १६००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
औरंगाबादमध्ये मोसंबी ६०० ते १२०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
केळी दरात सुधारणा, परराज्यात पाठवणी...जळगाव ः केळी दरात मागील दोन-तीन दिवसांत चांगली...
नांदेड बाजार समितीत नवीन हळदीची आवक नांदेड : नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...