agriculture news in marathi fertiliser, seed shops to remain open | Agrowon

खते, बियाण्यांची दुकाने उघडी ठेवा : कृषी आयुक्तालयाचे पत्र

टीम अॅग्रोवन
बुधवार, 25 मार्च 2020

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खते, बियाणे विक्री करणारी दुकाने उघडी ठेवावीत, असे आदेश राज्याच्या कृषी आयुक्तालयाने काढले आहेत.

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खते, बियाणे विक्री करणारी दुकाने उघडी ठेवावीत, असे आदेश राज्याच्या कृषी आयुक्तालयाने काढले आहेत.

गुणनियंत्रण संचालक विजयकुमार घावटे यांनी राज्यातील सर्व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना दिलेल्या लेखी सूचनेत ही माहिती दिली आहे. “ कोरोनामुळे १४४ कलम लागू असल्याने संचारबंदी असली तरी खरीप हंगाम तोंडावर आल्यामुळे शेतकऱ्यांना हंगामाच्या तयारीसाठी बियाणे, खते हवी आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी,” असे आयुक्तालयाचे म्हणणे आहे.

खते व बियाणे जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ मध्ये समाविष्ट आहेत. संचारबंदीमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे खते व बियाण्यांची दुकाने काही वेळेपुरती उघडी ठेवणे आवश्यक आहे, असे आयुक्तालयाने स्पष्ट केले.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी खते व बियाण्यांच्या विक्रीबाबत अडचणी असल्यास थेट जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करावी, असे कृषी संचालकांनी सुचविले आहे. दुकाने उघडी ठेवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून आठवड्यातून काही दिवस सुरू ठेवण्याबाबत स्वतंत्र आदेश काढून घ्यावेत, असे गुणनियंत्रण संचालकांनी सुचविले आहे.


इतर अॅग्रो विशेष
‘निसर्ग’चक्रीवादळाची तीव्रता वाढली;...पुणे : अरबी समुद्रात महाराष्ट्र, कर्नाटकच्या...
अल्पमुदतीच्या कृषिकर्ज फेडीस...नवी दिल्ली : तीन लाखांपर्यंतच्या अल्पमुदतीच्या...
हमीभाव जाहीर : कपाशीत २६०, सोयाबीनमध्ये...नवी दिल्ली : केंद्र सरकारने खरीप २०२०-२१करिताचे...
महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत ‘निसर्ग’...पुणे  : अरबी समुद्रात महाराष्ट्र,...
देशात यंदा १०२ टक्के पावसाची शक्यता :...पुणे  : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून...
पूर्वमोसमी पावसाच्या हजेरीने मॉन्सूनची...पुणे  : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
केरळचा बहुतांश भाग मॉन्सूनने व्यापलापुणे  : महाराष्ट्रासह देशभरातील शेतकऱ्यांना...
टोळधाड नियंत्रणासाठी हेलिकॉप्टर अन्...नागपूर ः विदर्भात अग्निशमन यंत्राच्या माध्यमातून...
निर्यातक्षम उत्पादन, बाजारपेठांचा शोध...नाशिक जिल्ह्यातील नैताळे (ता.निफाड) येथील...
राईसमिल, पोहे निर्मितीतून व्यवसायवृद्धीवेहेळे (ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) येथे शंकर जाधव...
देशात यंदा सर्वसाधारण मॉन्सून; १०२...नवी दिल्ली : देशात यंदा सर्वसामान्य मॉन्सून आणि...
Breaking : मॉन्सून एक्सप्रेस केरळात...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) सोमवारी (ता....
राज्य सरकारचे ‘पुनश्‍च हरीओम्’ :...मुंबई : कोरोनाच्या साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
अंतिम वर्षाची परीक्षा नाही :...मुंबई : सध्याच्या परिस्थितीत विद्यापीठाच्या...
पीकविम्याचे कामकाज या महिन्यातपुणे: राज्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीकविमा...
टोळधाडबाधितांना मदत देणार : पंतप्रधान...नवी दिल्ली : देशातील अनेक भागांत टोळधाडीचे संकट...
मॉन्सून आज केरळात येण्याचे संकेतपुणे  : अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटांलगत...
कोकणात मुसळधार पावसाचा इशारापुणे  : अरबी समुद्रातील कमी दाब क्षेत्रामुळे...