बुलडाणा जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणार्थ विंधन विहिरी

बुलडाणा जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणार्थ विंधन विहिरी
बुलडाणा जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणार्थ विंधन विहिरी

बुलडाणा :  जि‍ल्हा परिषदेतर्फे तयार करण्यात आलेल्या पाणीटंचाई कृती आराखड्यानुसार जिल्ह्यातील ८६ गावांमध्ये ११३ विंधन विहिरींना मंजुरी देण्यात आली आहे. जिल्ह्यातील लोणार, चिखली, बुलडाणा, खामागव, देऊळगावराजा, मोताळा या तालुक्यांतील ही गावे आहेत.

पाणीटंचाई दर दिवसाला वाढत असल्याने उपाययोजनांची गती वाढविण्यात येत आहे. प्रशासनाने लोणार, चिखली, बुलडाणा, खामगाव, देऊळगावराजा, मोताळा तालुक्यांतील ८६ गावांमध्ये एकूण ११३ विंधन विहिरींना मंजुरी दिली आहे.  

दानपत्राशिवाय काम करू नका

दुष्काळी गावांमध्ये विंधन विहिरी खोदण्याचे खासगी जागेत भूवैज्ञानिकांनी सुचविले असल्यास, त्या खासगी जागेचे दानपत्र नियमानुसार संबंधित मालकाकडून घेतल्यानंतरच मंजूर कामास सुरवात करावी. दानपत्र न घेता कामावर खर्च करण्यात येऊ नये, असे जिल्हाधिकाऱ्यांनी यंत्रणांना स्पष्ट निर्देश दिले आहेत.

तालुकानिहाय मंजूर गावे

लोणार हिरडव, वढव, चिंचोली सांगळे, गायखेड, जांबुळ, देवानगर, कासारी, खळेगाव, भुमराळा, खापरखेड लाड
देऊळगावराजा सिनगाव जहाँगीर, वाडेगाव, वाकी बुद्रुक, वाकी खुर्द पांगरी, चिंचखेड व टाकरखेड भागीले 
मोताळा निपाणा, सारोळापीर, दाभाडी, ब्राम्हंदा, तालखेड
बुलडाणा अंभोडा, धाड, माळविहीर, गिरडा, पांगरी, चिखला, केसापूर, देवपूर व रायपूर
खामगाव बोथा फॉरेस्ट, वडजी भेंडी, उमरा अटाळी, निमखेड, बोरी, बोथाकाजी, सारोळा, रोहणा, मांडणी, श्रीधर नगर, चिखली बुद्रुक, गारडगांव, घाटपुरी, लांजूड, कुऱ्हा, सुटाळा बुद्रुक, शिरजगाव देशमुख, पारखेड, खुटपुरी, इवरा, उमरा, जनुना, नागझरी बुद्रुक, घाणेगांव, कोलोरी, वाडी, सुटाळा खुर्द, जळका भडंग, गावंढळा, भंडारी, कदमापूर, टाकळी तलाव, शेलोडी, निमकवडा, कासारखेड, जनता नगर, टेंभूर्णा, पिंप्राळा, नागझरी खुर्द   
चिखली सोनेवाडी, देवदरी, पांढरदेव, चांधई, मलगी, नायगाव बुद्रुक, खामखेड, करवंड, आंधई, केळवद, बोरगाव वसू, टाकरखेड हेलगा, ढासाळा, वैरागड, सावंगी गवळी, श्रीकृष्ण नगर.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com