सिंधुदुर्गात खते मिळाली; पण वेळेत नाहीत

सिंधुदुर्ग ः खरीप हंगामाच्या सुरुवातीला जिल्ह्यात युरियाचा तुटवडा भासला. याशिवाय शेतकऱ्यांना हवी असलेली मिश्रखते मिळाली नाहीत. त्यामुळे उपलब्ध असलेल्या खतांवरच शेतकऱ्यांना समाधान मानावे लागले.जिल्ह्याला आवश्‍यक पुरवठ्यापैकी चारशे टन युरिया अजून ही उपलब्ध व्हायचे आहे.
Fertilizer found in Sindhudurg; But not in time
Fertilizer found in Sindhudurg; But not in time

सिंधुदुर्ग ः खरीप हंगामाच्या सुरुवातीला जिल्ह्यात युरियाचा तुटवडा भासला. याशिवाय शेतकऱ्यांना हवी असलेली मिश्रखते मिळाली नाहीत. त्यामुळे उपलब्ध असलेल्या खतांवरच शेतकऱ्यांना समाधान मानावे लागले.जिल्ह्याला आवश्‍यक पुरवठ्यापैकी चारशे टन युरिया अजून ही उपलब्ध व्हायचे आहे.

जिल्ह्यात खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. भातशेती, नागली पिकांचे मोठे क्षेत्र खरिपात लागवडीखाली आणले जाते. निव्वळ भातशेतीखाली सुमारे ५५ हजार हेक्टर क्षेत्र आहे. त्यामुळे याच कालावधीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खताची गरज भासते. परंतु यावर्षी भातपेरणी झाली. रोपांची उगवण देखील झाली. मात्र तरीही जिल्ह्याच्या अनेक गावात युरिया खत उपलब्धच झाले नव्हते.

जिल्ह्यात खरिपाकरिता ७ हजार २० टन युरियाची गरज होती. परंतु हंगाम सुरू झाल्यानंतर निम्मे देखील खत उपलब्ध झाले नव्हते. शेतकऱ्यांकडून हालचाली सुरू झाल्यानंतर त्यांची दखल कृषी विभागाने घेत युरिया पुरवठ्यासंदर्भात सभा घेऊन खत वितरणाचे नियोजन केले. त्यानंतर टप्पाटप्प्याने युरिया खत तालुकानिहाय पाठविण्यात येऊ लागले. १२ जुलैपर्यंत ७ हजार २० टनांपैकी ६ हजार ३०६ टन खत उपलब्ध झाले आहे. परंतु युरियाची गरज १ जुलैपर्यंत अधिक होती. त्याकाळात शेतकऱ्यांना युरिया मिळू शकलेला नाही.

मिश्रखतांची स्थिती मात्र नेमकी उलट होती. खरिपाकरिता ४ हजार ७०० टन मिश्रखताची गरज होती. परंतु प्रत्यक्षात ६ हजार ३८१ टन खत उपलब्ध झाले. त्यामुळे मिश्र खतांचा तुटवडा अजिबात भासला नाही. मात्र, शेतकऱ्यांना हवी असलेली खते उपलब्ध झालेली नाहीत. त्यामुळे मिळेल त्या कंपनीची खते शेतकऱ्यांना वापरावी लागली. जिल्ह्यात एकूण १६ हजार २८० टन खताची मागणी होती. त्यापैकी आत्तापर्यंत १४ हजार ९५२ टन खत उपलब्ध झाले आहे.कोरोनामुळे अलिबाग येथील खतनिर्मिती कारखान्यातील परराज्यातील कामगार मूळगावी गेले. याशिवाय वाहतूक व्यवस्थेत काम करणाऱ्या मजुरांनी देखील गाव गाठले. त्यामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचे कृषी विभागाकडून यापूर्वीचं स्पष्ट करण्यात आले आहे.

खरीप हंगामाची सुरुवात अतिशय वाईट झाली. सुरुवातीला युरियाचा मोठा तुटवडा भासला. याशिवाय आवश्‍यक असलेली खते मिळाली नाहीत. परंतु आता परिस्थितीत सुधारणा झाली आहे. युरियासह हवी असलेली सर्व खते मुबलक प्रमाणात उपलब्ध झाली आहेत. - सुशांत नाईक, शेतकरी, वेतोरे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com