अन्नद्रव्यांवरून खतांचे व्यवस्थापन करावे ः डॉ. गौरखेडे

जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्यांच्या प्रमाणावरून खतांचे व्यवस्थापन करणे गरजेचे असल्याचे मत मृदा विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभागाच्या सहायक प्रा. डॉ. पी. एच. गौरखेडे यांनी व्यक्त केले.
Fertilizer management should be done from nutrients: Dr. Gaurkhede
Fertilizer management should be done from nutrients: Dr. Gaurkhede

गेवराई, जि. बीड : जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्यांच्या प्रमाणावरून खतांचे व्यवस्थापन करणे गरजेचे असल्याचे मत मृदा विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभागाच्या सहायक प्रा. डॉ. पी. एच. गौरखेडे यांनी व्यक्त केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीअंतर्गत कृषी विज्ञान केंद्र खामगाव (ता. गेवराई) व किसान ॲपच्या माध्यमातून दि. १८ जून रोजी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त खत वापर जाणीव जागृती कार्यक्रमांतर्गत ‘खतांचा संतुलित वापर’ या विषयावर एकदिवसीय ऑनलाइन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. 

या कार्यक्रमात मुख्य मार्गदर्शक म्हणून मृदा विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभागाचे सहायक प्रा. डॉ. गौरखेडे लाभल्या होत्या. त्याचप्रमाणे प्रमुख अतिथी म्हणून विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉ. वसंत सूर्यवंशी हे होते. सुरुवातीला कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात विषय विशेषज्ञ कृषिविद्या डॉ. हनुमान गरुड यांनी कार्यक्रमाची रूपरेषा, त्याचा उद्देश सांगितला. 

तद्‍नंतर डॉ. वसंत सूर्यवंशी यांनी आपल्या मनोगतात सेंद्रिय कर्बाच महत्त्व सांगून त्यासाठी सेंद्रिय पदार्थांचा वापर करणे अत्यंत आवश्यक बाब आहे. जेणेकरून सूक्ष्मजीवांचे प्रमाण अबाधित राहील आणि रासायनिक खतांचाही अवलंब होण्यात वाढ होईल, असा सल्ला दिला. आपल्या मुख्य मार्गदर्शनात उत्कृष्ट सादरीकरणासह डॉ. गौरखेडे यांनी माती परीक्षणाचे महत्त्व, मातीचा नमुना कसा घ्यावा, त्या आधारित खतांचा संतुलित वापर, पीकनिहाय शिफारशीत खतांची मात्रा कशी काढावी, एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन कसे करावे, वाढीच्या अवस्थेनुसार जमिनीतून अन्नद्रव्यांची गरज, सेंद्रिय कर्ब वृद्धीसाठी उपाययोजना, जमिनीतील अन्नद्रव्ये कमतरता होण्याची कारणे, जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी उपाययोजना, रासायनिक खते देताना घ्यावयाची काळजी, त्याचे प्रमाण या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. यानंतर परीक्षण प्रयोगशाळांची माहिती दिली. त्याचप्रमाणे मृदा आरोग्य पत्रिकेबद्दल मार्गदर्शन केले. त्यानंतर उपस्थित शेतकऱ्यांनी आपल्या शंका उपस्थित केल्या. त्याचे निरसन करण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com