Agriculture news in marathi Fertilizer prices lower The center should be relieved | Agrowon

खतांच्या किमती कमी करून केंद्राने दिलासा द्यावा

टीम अॅग्रोवन
रविवार, 16 मे 2021

केंद्र सरकारने खताच्या वाढलेल्या किमती कमी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. बारामतीत झालेल्या आढावा बैठकीनंतर माध्यमांशी पवार बोलत होते.  

बारामती, जि. पुणे : केंद्र सरकारने खताच्या वाढलेल्या किमती कमी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. बारामतीत झालेल्या आढावा बैठकीनंतर माध्यमांशी पवार बोलत होते.  

खतांच्या वाढलेल्या किमतीना सर्वस्वी केंद्र सरकारच जबाबदार असल्याने त्यांनी या किमती कमी करण्यासाठी पावले उचलावीत, केंद्राने किमती वाढविलेल्या असल्याने शेतक-यांना त्यांनी खते पुरवावीत, स्फुरद व पालाशच्या किमती वाढलेल्या असल्या तरीही शेतकऱ्यांनी युरियाकडे वळू नये, असे आवाहन खरीप आढावा बैठकीत केलेले आहे, असे ते म्हणाले. 

पवार यांनी सांगितले, ‘‘राज्याच्या काही भागात चक्रीवादळासह अतिवृष्टीचा इशारा मिळालेला असल्याने प्रशासन स्तरावर जी खबरदारी घ्यायची आहे, त्या संदर्भातील सर्व सूचना संबंधित विभागांना दिल्या आहेत. नुकसान होऊ नये तसेच प्राणहानी होऊ नये या साठी सर्वतोपरी काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.’’  

देशाला जितकी लस गरजेची आहे तितकी मिळत नाही, त्यामुळे भारत बायोटेक कंपनीला पुण्यात जागा उपलब्ध करून दिली असून, लवकरच तिथे लसनिर्मिती सुरू होईल, लस कमी असल्याने १८ ते ४४ वयोगटाच्या लसीकरणाचा कार्यक्रम थांबवावा लागला आहे. पुरेशी लस उपलब्ध झाल्यानंतर गर्दी होणार नाही, अशा पद्धतीने लसीकरण केंद्र वाढवली जातील, १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांनाही लस उपलब्ध करून दिली जाईल, अशी ग्वाही पवार यांनी दिली.

म्युकर मायसिस बाबत राज्य शासनाने वैद्यकीय तज्ज्ञांना माहिती दिली असून, हा आजार का होतो याचीही माहिती मिळाली आहे, बारामतीतही प्रांताधिकारी व डॉक्टरांना या बाबतच्या सूचना दिलेल्या आहेत, खासगी डॉक्टरांनाही माहिती देण्यास सांगितले आहे.


इतर बातम्या
तुरळक ठिकाणी मुसळधार शक्य पुणे : कोकणसह राज्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस...
कोकण, मराठवाड्यात जोरदार पावसाची हजेरी पुणे : राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर कमी झाला...
पेरणीची घाई नको : कृषी आयुक्तालयपुणेः राज्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर...
मॉन्सूनला पोषक वातावरण पुणे : नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) वेगाने प्रवास...
दूध दरातील कापतीने शेतकऱ्यांची परवड औरंगाबाद: महिनाभरातच दुधाच्या दरात तब्बल ११...
सातव्या वेतन आयोगासाठी महामंडळांमधील...नगर : राज्यातील विविध महामंडळांमधील अधिकारी-...
पीककर्ज व्याज सवलत योजनेचे पालकत्व...पुणेः शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने तीन...
राज्यातील प्रकल्पांमध्ये केवळ २१ टक्के...पुणे ः मे आणि जून महिन्यात पाण्याची मागणी...
कमी दराने कांदा खरेदी सुरूच नाशिक : सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
रत्नागिरी, संगमेश्‍वर, राजापूरला ...रत्नागिरी : सलग दुसऱ्या दिवशी रत्नागिरी...
दूध दरासाठी गुरुवारी आंदोलन नगर : लॉकडाउनचा गैरफायदा घेत दूध उत्पादक...
चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्यांना...वडाळी जि. अकोला : या हंगामाला सुरुवात होताच...
पशुचिकित्सा व्यावसायिक संघटना करणार...नागपूर : पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेच्या...
जागोजागी होणारी लुट थांबवा, ...नगर : ‘‘राज्यात जागोजागी प्रत्येक क्षेत्रात...
‘घटनादुरुस्ती करून आरक्षण देणे  हाच...कोल्हापूर : घटनादुरुस्ती करून मराठा आरक्षण देणे...
कोकणातील डच, पोर्तुगाल वखारींचे होणार...पुणे : भारतातील आंतरराष्ट्रीय सागरी व्यापारासाठी...
गोसीखुर्द प्रकल्प पूरनियंत्रणासाठी ...मुंबई ः गोसीखुर्द प्रकल्प पूरनियंत्रणाबाबत...
प्रकल्पग्रस्तांच्या जमिनींना पाच पट...नाशिक : देशातील पहिला सेमी हायस्पीड रेल्वेमार्ग...
आरक्षण देण्याची राज्यकर्त्यांची इच्छाच...पुणे : मराठा समाजाला आरक्षण देण्याची राजकीय...
नांदेडमध्ये थकीत ‘एफआरपी’साठी धरणेनांदेड : ऊस गाळप होऊनही पैसे न दिल्याने...