जत तालुक्याच्या पूर्व भागात जादा दराने खत विक्री

सांगली ः जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर खतांची उपलब्ध कमी नाही. मात्र, जत तालुक्‍याच्या पूर्व भागात शेतकऱ्यांना खताच्या मूळ किमतीच्या पन्नास ते शंभर रुपये जादा दराने खरेदी करावी लागत असून पक्‍क्‍या बिलाऐवजी कच्ची बिले देत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे.
Fertilizer sale at extra rate in the eastern part of Jat taluka
Fertilizer sale at extra rate in the eastern part of Jat taluka

सांगली ः जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर खतांची उपलब्ध कमी नाही. मात्र, जत तालुक्‍याच्या पूर्व भागात शेतकऱ्यांना खताच्या मूळ किमतीच्या पन्नास ते शंभर रुपये जादा दराने खरेदी करावी लागत असून पक्‍क्‍या बिलाऐवजी कच्ची बिले देत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे.

यंदाच्या खरीप हंगामात १ लाख २९० हजार १० टन खताचे आवंटन केले असून त्यापैकी ७४ हजार ६७६ टन खते उपलब्ध झाले आहेत. गतवर्षी २० हजार ८५३ टन खत शिल्लक होते. आज अखेर ४९२०२ टन खते शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोच केली आहेत. २५ हजार ४१४ टन खते वितरकांकडे आहेत.

सांगली जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांना खते उपलब्ध करण्याच्या सूचना कृषी विभागाने दिल्या आहेत. त्यानुसार वाळवा, पलूस मिरज, तालुक्‍यासह अन्य भागांत कृषी सेवा केंद्र खताची विक्री करत आहेत. शेतकऱ्यांना खत खरेदी करताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत नाहीत.

वास्तविक पाहता जत तालुक्‍याच्या पूर्व भागातील अनेक भागांत खतांची उपलब्धता आहे. परंतु, कृषी सेवा केंद्राकडून खताच्या मूळ किमतीच्या ५० ते १०० रुपये जादा दर घेतले जात आहेत. त्यातही खत खरेदी करतेवेळी पक्के बिल अदा केले जात नाहीत. शेतकऱ्यांना कच्चे बिल दिले जाते. यामुळे खत खराब लागण्यास अडचणींना सामोरे जावे लागण्याची शक्‍यता आहे.

दरम्यान, खत खरेदी करताना लिंकिंग देखील केले जात नाही. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी कृषी विभागाने १२ खत दुकानदारांवर कारवाई केली आहे. परंतु, ही कारवाई दाखविण्यासाठी केली असल्याची चर्चा जत तालुक्‍यातील पूर्व भागातील शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे.

आमच्या परिसरात खतांची उपलब्धता आहे. वेळेत खते मिळत आहेत. कोणतीही अडचणी नाही. - दिलीप साळुंखे, बोरगाव, ता. तासगाव

जत तालुक्‍याच्या पूर्व भागात खतांची उपलब्धता आहे. परंतु, मूळ किमतीच्या जादा दराने विक्री होत आहे. त्यातही लिंकिंग केले जात नाही. तसेच पक्‍क्‍या पावत्या दिल्या जात नाहीत. - एक शेतकरी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com