agriculture news in Marathi, fertilizer stock on E-poss due to offline selling, Maharashtra | Agrowon

आॅफलाइन विक्रीमुळे ई-पॉसवर खत साठा
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

जळगाव ः खतांची विक्री ई-पॉस (पॉइंट ऑफ सेल) मशिनचा वापर करून करणे गरजेचे आहे, परंतु जिल्ह्यात खतांची ऑफलाइन (ई-पॉसचा वापर न करता) विक्री अधिक झाली आहे. असाच प्रकार रब्बी हंगामात घडला. आता खरिपातही विक्रेते हे मशिन वापरत नसल्याने केंद्राच्या अखत्यारीमधील खते विभाग खत पुरवठा करायला तयार नाही. कारण ई-पॉसमध्ये खते शिल्लक दिसत आहेत. परिणामी खतपुरवठा रखडत सुरू आहे. जो पुरवठा होत आहे, तो राज्यातील कृषी विभागातील खते विभागाशी संबंधित मंडळी आपला विशेष अधिकार वापरून करून घेत असल्याची माहिती समोर आली आहे. 

जळगाव ः खतांची विक्री ई-पॉस (पॉइंट ऑफ सेल) मशिनचा वापर करून करणे गरजेचे आहे, परंतु जिल्ह्यात खतांची ऑफलाइन (ई-पॉसचा वापर न करता) विक्री अधिक झाली आहे. असाच प्रकार रब्बी हंगामात घडला. आता खरिपातही विक्रेते हे मशिन वापरत नसल्याने केंद्राच्या अखत्यारीमधील खते विभाग खत पुरवठा करायला तयार नाही. कारण ई-पॉसमध्ये खते शिल्लक दिसत आहेत. परिणामी खतपुरवठा रखडत सुरू आहे. जो पुरवठा होत आहे, तो राज्यातील कृषी विभागातील खते विभागाशी संबंधित मंडळी आपला विशेष अधिकार वापरून करून घेत असल्याची माहिती समोर आली आहे. 

परंतु ऑफलाइन विक्रीमुळे खतसाठा कायम दिसतो. ई-पॉसमधून खत विक्री केली तरच वास्तविक खतसाठा केंद्रीय खते विभागाला दिसू शकतो. ऑफलाइन विक्री केली तर याची जबाबदारी कृषी यंत्रणा व संबंधित खत कंपन्यांचीदेखील आहे. कारण कंपन्या खत उत्पादन व त्याचा शेतकऱ्यांपर्यंत पुरवठा झाल्यानंतर शासनाकडून अनुदान घेतात. वास्तविक खतसाठा दिसत असल्याने खते विभाग खतपुरवठ्यासाठी तयार नाही. अशा स्थितीत कृषी विभागातील वरिष्ठ अधिकारी आपल्या विशेष अधिकाराचा वापर करून खतपुरवठा करून घेत आहेत. तरी युरिया व इतर काही खतांची समस्या निर्माण झाल्याचे सांगण्यात आले.

जिल्ह्यात ऑफलाईन खत विक्रीमुळे खतपुरवठा सुरळीत नाही. वारंवार सांगूनही मोठे वितरक, किरकोळ विक्रेते ऐकत नाहीत. खते कंपन्यांना अनुदान मिळून गेले आहे. पण पुढे खतांची ई-पॉसमध्ये विक्रीच्या नोंदी करून घेणे (ऍक्‍नॉलेजमेंट) व त्यासंबंधीची सर्व कार्यवाही पार पाडणे खत कंपन्यांची जबाबदारी आहे. अन्यथा पुढे खतपुरवठ्याची अडचण आली, काही समस्या त्यातून पुढे निर्माण झाल्या तर खतकंपन्या जबाबदार राहतील, अशा नोटिसा येथील जिल्हा परिषदेचा कृषी विभाग सर्वच खत पुरवठादार कंपन्यांना बजावणार आहे. या नोटिसा आरसीएफसह जीएनएफसी, इफको, रामा व इतर कंपन्यांना दिल्या जातील, अशी माहिती कृषी अधिकारी डी. एम. शिंपी यांनी दिली. 

जिल्ह्यात ई-पॉसचा वापर करून खत विक्री करण्याचे हे पहिलेच खरिपाचे वर्ष आहे. मध्यंतरी त्यासंबंधी खत विक्रेत्यांचे प्रशिक्षण घेतले. पण खत विक्रेते त्याचा वापर करीत नाही. सकाळी सात ते १९ दरम्यान सर्व्हर बंद असते. शेतकरी किंवा खते घेऊन जाणाऱ्या व्यक्ती आपला आधार क्रमांक देत नाहीत, अशा तक्रारी खत विक्रेते सतत करीत आहेत. त्यावर संबंधित शेतकरी, खते घेऊन जाणाऱ्या व्यक्तीने आधार क्रमांक दिला नाही तर विक्रेता आपला किंवा आपल्याशी संबंधित कुणाचाही आधार क्रमांक नमूद करून इ-पॉसमध्ये खत विक्रीची नोंद करू शकतो. परंतु खत विक्रेते आपल्याच आधार क्रमांकाचा वापर करायला घाबरत आहेत. पुढे कुण्या केंद्रीय विभागाची नोटिस आली तर कसे करायचे, याची भिती त्यांना आहे. ऑफलाइन विक्री करावी लागते. कारण शेतकरी थांबायला तयार नसतो. त्याला परत पाठविता येत नाही, असेही खते विक्रेत्यांनी म्हटले आहे. 

इतर अॅग्रो विशेष
व्यापाऱ्यांनी शेतमाल बाजारातील बदल...पुणे ः बाजार समित्या बरखास्त केल्यास सक्षम...
नांदेड : सोयाबीनचा पेरणीपेक्षा अधिक...नांदेड  ः यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात...
पंचनाम्यांची ‘अतिवृष्टी’; रातोरात ९३...पुणे ः राज्य शासनाची यंत्रणा पिकाचे पंचनामे...
पीकविम्यापासून वंचित राहिल्यास कंपनी...अकोला ः जिल्ह्यात गेल्या महिन्यातील पावसाने...
उसावर आता तांबेरा, तपकिरी ठिबकेकोल्हापूर: सातत्याने पडणारे धुके व जमिनीतील...
राजू शेट्टीं थेट काश्‍मीरात;...कोल्हापूर : काश्मीरमधील सफरचंद, अक्रोड, केशर...
खरीप पिकांसाठी आठ हजार तर, फळबागांसाठी...मुंबई: राज्यात अवकाळी पावसाने नुकसान...
विदर्भ, मराठवाड्यात गारठा कायमपुणे : कोकण, मध्य महाराष्ट्राच्या विविध भागात...
बांबू कलाकारीतून तयार केली ओळखकला पदवीधर असलेल्या सौ. संगीता दिलीप वडे यांनी...
पर्यावरण संवर्धन, लोक शिक्षणामध्ये ‘...अकोला, वाशीम जिल्ह्यांतील सुमारे तीस...
सत्ता अन् जीवन संघर्षराज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून २२ दिवस...
नुकसानीचा बोजा केंद्रप्रमुख, जिनिंग...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) कापूस...
गडचिरोलीत रब्बी मक्‍यावर लष्करी अळीचा...गडचिरोली  ः धानकाढणीनंतर मका लागवड होणाऱ्या...
काटेकोर शेतीत द्राक्ष उत्पादक अग्रेसर:...पुणे : कष्ट व कौशल्याच्या बळावर कोणताही आकार आणि...
चीनमधील संत्रा खरेदीदारांचे शिष्टमंडळ...नागपूर ः चीनची बाजारपेठ मोठी असल्याने संत्रा...
रसायने, कीडनाशकांचा विवेकपूर्ण वापर...नवी दिल्ली: रसायने आणि कीडनाशकांचा अतिरेकी...
पीकविमा सुधारणेसाठी अखेर समिती स्थापनपुणे: ‘‘राज्यात सध्या राबविल्या जात असलेल्या...
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मदत रखडण्याची...मुंबई: फडणवीस सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना...
काजू, आंबा, कोकम प्रक्रिया उद्योगाची...नाधवडे (जि. सिंधुदुर्ग) येथील भालचंद्र भिकाजी...
पुणे बाजार समितीत आवळा खातोय भाव,...‘क’ जीवनसत्वासाठी प्रसिद्ध असलेल्या आणि...