आज महाराष्ट्रातील कोरडवाहू शेतीतील समस्या वाढत आहेत.
ताज्या घडामोडी
जळगाव जिल्ह्यात उपलब्ध होणार साडेतीन लाख टन खते
जिल्ह्यात बियाणे व खते मुबलक प्रमाणात उपलब्ध होतील. खते शिल्लक आहेत. यामुळे टंचाई भासणार नाही. कापूस बियाणे जूनमध्ये उपलब्ध होईल.
- मधुकर चौधरी, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव.
जळगाव ः आगामी खरिपासाठी जिल्हास्तरावरील कृषीयंत्रणांनी नियोजन पूर्ण केले असून, कापूस व रासायनिक खतांच्या पुरवठ्यासंबंधीचे लक्ष्यांक वरिष्ठ कार्यालयाने मंजूर केले आहे. जळगाव जिल्ह्याला तीन लाख ४० हजार टन खते मिळणार आहेत; तर धुळे-नंदुरबार मिळून सुमारे अडीच लाख मेट्रिक टन खते सप्टेंबर अखेरपर्यंत उपलब्ध होतील.
जून महिन्याच्या मध्यापासून खतपुरवठा सुरू होईल. जळगावात खरिपासाठीचा खतपुरवठा संबंधित कंपन्यांनी सुरू केला आहे; परंतु सुमारे ४० हजार टन खतसाठा शिल्लक असल्याने हा पुरवठा धीम्या गतीने सुरू आहे. सुमारे नऊ हजार टन युरिया शिल्लक असल्याने त्याचा तुटवडा भासणार नाही, असा दावा जळगाव येथील कृषी विभागाने केला आहे. धुळे-नंदुरबारमध्येही सुमारे ११ हजार मेट्रिक टन खते शिल्लक आहेत. खरिपासाठी जळगाव जिल्ह्यात युरियाचा ९० हजार टनांपर्यंत पुरवठा होणार आहे. धुळे-नंदुरबारातही सुमारे ५० हजार टन युरिया उपलब्ध होईल.
खानदेशात सुमारे १५ लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी होईल. यात सर्वाधिक आठ ते साडेआठ लाख हेक्टरवर कापसाची लागवड होईल. यात सुमारे सव्वा ते दीड लाख हेक्टरवर पूर्वहंगामी कापूस लागवड होईल, असा अंदाज आहे. कापसापाठोपाठ तृणधान्ये व गळीत धान्याची पेरणी होईल. जळगाव जिल्ह्यासाठी २५ लाख कापूस बियाण्यांच्या पाकिटांची मागणी करण्यात आली.
धुळे जिल्ह्यासाठी सुमारे नऊ लाख; तर नंदुरबारसाठी सुमारे सहा लाख कापूस बियाणे पाकिटांची मागणी केली असून, त्याचा पुरवठा जूनमध्ये होईल. जूनमध्ये कापूस बियाण्यांची विक्री होईल, असे नियोजन कृषी विभागाने केले आहे. तृणधान्य, गळीत धान्याच्या बियाण्यांचा मुबलक पुरवठा होईल. त्यासाठी केंद्रीय बियाणे महामंडळ, महाबीज यांच्याकडून अधिकाधिक बियाण्यांचा पुरवठा होईल, असा दावा कृषी विभागाने केला आहे.
शासकीय यंत्रणांनी नियोजन केलेले असतानाच शेतकरीही पूर्वमशागतीच्या कामात व्यग्र आहेत. कापूस व इतर पिकांखाली रिकाम्या झालेल्या क्षेत्रात सध्या नांगरणी, रोटाव्हेटर करण्याचे काम सुरू आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी कापूस लागवडीसाठी शेतात ठिबकच्या नळ्या अंथरून ठेवल्या असून, बियाणे उपलब्ध होताच लागवड जूनमध्ये सुरू होईल, असे चित्र आहे.
मी कापूस लागवडीची तयारी केली आहे; परंतु बियाणे जूनमध्ये येणार असल्याने लागवड उशिराने करावी लागेल, अशी माहिती चोपडा (जि. जळगाव) येथील शेतकरी बापू पाटील यांनी दिली.
- 1 of 1061
- ››