agriculture news in marathi, fertilizer stock planning for kharip season, jalgaon, maharashtra | Page 2 ||| Agrowon

जळगाव जिल्ह्यात उपलब्ध होणार साडेतीन लाख टन खते

टीम अॅग्रोवन
बुधवार, 15 मे 2019

जिल्ह्यात बियाणे व खते मुबलक प्रमाणात उपलब्ध होतील. खते शिल्लक आहेत. यामुळे टंचाई भासणार नाही. कापूस बियाणे जूनमध्ये उपलब्ध होईल. 
- मधुकर चौधरी, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव.

जळगाव  ः आगामी खरिपासाठी जिल्हास्तरावरील कृषीयंत्रणांनी नियोजन पूर्ण केले असून, कापूस व रासायनिक खतांच्या पुरवठ्यासंबंधीचे लक्ष्यांक वरिष्ठ कार्यालयाने मंजूर केले आहे. जळगाव जिल्ह्याला तीन लाख ४० हजार टन खते मिळणार आहेत; तर धुळे-नंदुरबार मिळून सुमारे अडीच लाख मेट्रिक टन खते सप्टेंबर अखेरपर्यंत उपलब्ध होतील. 

जून महिन्याच्या मध्यापासून खतपुरवठा सुरू होईल. जळगावात खरिपासाठीचा खतपुरवठा संबंधित कंपन्यांनी सुरू केला आहे; परंतु सुमारे ४० हजार टन खतसाठा शिल्लक असल्याने हा पुरवठा धीम्या गतीने सुरू आहे. सुमारे नऊ हजार टन युरिया शिल्लक असल्याने त्याचा तुटवडा भासणार नाही, असा दावा जळगाव येथील कृषी विभागाने केला आहे. धुळे-नंदुरबारमध्येही सुमारे ११ हजार मेट्रिक टन खते शिल्लक आहेत. खरिपासाठी जळगाव जिल्ह्यात युरियाचा ९० हजार टनांपर्यंत पुरवठा होणार आहे. धुळे-नंदुरबारातही सुमारे ५० हजार टन युरिया उपलब्ध होईल. 

खानदेशात सुमारे १५ लाख हेक्‍टरवर खरिपाची पेरणी होईल. यात सर्वाधिक आठ ते साडेआठ लाख हेक्‍टरवर कापसाची लागवड होईल. यात सुमारे सव्वा ते दीड लाख हेक्‍टरवर पूर्वहंगामी कापूस लागवड होईल, असा अंदाज आहे. कापसापाठोपाठ तृणधान्ये व गळीत धान्याची पेरणी होईल. जळगाव जिल्ह्यासाठी २५ लाख कापूस बियाण्यांच्या पाकिटांची मागणी करण्यात आली.

धुळे जिल्ह्यासाठी सुमारे नऊ लाख; तर नंदुरबारसाठी सुमारे सहा लाख कापूस बियाणे पाकिटांची मागणी केली असून, त्याचा पुरवठा जूनमध्ये होईल. जूनमध्ये कापूस बियाण्यांची विक्री होईल, असे नियोजन कृषी विभागाने केले आहे. तृणधान्य, गळीत धान्याच्या बियाण्यांचा मुबलक पुरवठा होईल. त्यासाठी केंद्रीय बियाणे महामंडळ, महाबीज यांच्याकडून अधिकाधिक बियाण्यांचा पुरवठा होईल, असा दावा कृषी विभागाने केला आहे.  

शासकीय यंत्रणांनी नियोजन केलेले असतानाच शेतकरीही पूर्वमशागतीच्या कामात व्यग्र आहेत. कापूस व इतर पिकांखाली रिकाम्या झालेल्या क्षेत्रात सध्या नांगरणी, रोटाव्हेटर करण्याचे काम सुरू आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी कापूस लागवडीसाठी शेतात ठिबकच्या नळ्या अंथरून ठेवल्या असून, बियाणे उपलब्ध होताच लागवड जूनमध्ये सुरू होईल, असे चित्र आहे.

मी कापूस लागवडीची तयारी केली आहे; परंतु बियाणे जूनमध्ये येणार असल्याने लागवड उशिराने करावी लागेल, अशी माहिती चोपडा (जि. जळगाव) येथील शेतकरी बापू पाटील यांनी दिली.


इतर ताज्या घडामोडी
अत्यावश्यक वेळीच रासायनिक तणनियंत्रक...हिंगोली : ‘‘शेतकऱ्यांनी तणनियंत्रणासाठी केवळ...
सांगली जिल्ह्यातील प्रकल्पांत गेल्या...सांगली : जिल्ह्यात मध्यम व लघू ८४ प्रकल्पांची...
कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठ्यासाठी...रत्नागिरी  : अनिश्‍चित पावसाचा हंगाम लक्षात...
`म्हैसाळ’ची कामे १५ ऑगस्टपूर्वी पूर्ण...सोलापूर  : म्हैसाळ योजनेतून सांगोला,...
काथ्या उद्योगातून कोकणाच्या विकासाला...नाशिक  : जगात भारत नारळ उत्पादनात आघाडीवर...
बियाणे बदलून देण्याच्या आदेशाची...अकोला  ः या हंगामात लागवड केलेल्या सोयाबीन...
मराठा आरक्षणाबाबत उपसमितीची वरिष्ठ...मुंबई : मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन प्रकरणांच्या...
शेती नियोजनातून साधावा आर्थिक प्रगतीचा...नागपूर  : शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबतच...
भाजपची प्रदेश कार्यकारिणी जाहीरमुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील...
राज्यात चांगल्या पावसाचा अंदाजभारतीय हवामान शास्त्र विभागाच्या कृषी मोसम...
पुणे जिल्हा परिषदेची मागासवर्गीय...पुणे  : पुणे जिल्ह्यातील मागासवर्गीय...
नगरमध्ये १८ हजार हेक्टरवर उडदाची पेरणीनगर  ः नगर जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
औरंगाबादमध्ये बटाटा १००० ते २००० रुपये...औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
आरोग्यदायी हिंगआपल्या रोजच्या स्वयंपाकात पदार्थ करताना फोडणीसाठी...
अकोला जिल्ह्यात जूनमध्ये सरासरीपेक्षा...अकोला  ः यंदाच्या हंगामात मृग नक्षत्रात...
खानदेशात कांदा रोपवाटिकांची संख्या वाढलीजळगाव  ः खानदेशात यंदा रोपवाटिकांची संख्या...
यवतमाळ जिल्ह्यात जोरदार पावसाने पिके,...यवतमाळ : जिल्ह्यात काही दिवसांपासून पावसाने...
नाशिक जिल्ह्यात ६५ टक्के क्षेत्रावर...नाशिक  : मृग नक्षत्रात पावसाचे वेळेवर आगमन...
जेईई, नीट परीक्षा सप्टेंबरपर्यंत स्थगितनवी दिल्ली : अभियांत्रिकी प्रवेशासाठीची...
मराठवाड्यातील पाणीटंचाई उस्मानाबाद...उस्मानाबाद : मराठवाड्यातील पाणीटंचाई आता केवळ...