निफाड तालुक्यात कृषी विभागातर्फे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर खत पुरवठा

नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू आहे. अशा परिस्थितीत खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी कृषी सेवा केंद्रावर येऊन बियाणे व खते खरेदी केल्यास जास्त गर्दी होऊ शकते. या परिस्थितीत योग्य ती खबरदारी घेऊन खरीप हंगामाच्या पूर्व तयारी सुरू आहे. कृषीमंत्री दादा भुसे यांच्या संकल्पनेतून शेतकरी गटांची नोंदणी करून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर खत आणि बियाण्यांचा पुरवठा करण्याचा उपक्रम निफाड तालुक्यात सुरू करण्यात आला आहे.
Fertilizer supply directly to farmers' farm by Agriculture Department in Niphad taluka

शेतकऱ्यांना सर्व कृषी निविष्ठा थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोचविण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालय निफाड यांच्यातर्फे नोंदणी करण्यात येत आहे. त्यानुसार सुरवातीस बुधवार (ता.६) निफाड पंचायत समितीचे उपसभापती शिवा पाटील सुराशे, उपविभागीय कृषी अधिकारी गोकुळ वाघ यांच्या उपस्थितीत तालुक्यातील खडक माळेगाव येथून ईशान फर्टिलाईजर यांच्याकडून मौजे टाकळी विंचुर येथील सृष्टी फार्मर्स प्रोड्युसर कंपनीस एकूण १०० गोणी खताचा पुरवठा बांधापर्यंत करण्यात आला. 

या उपक्रमामुळे शासनाने ठरवून दिलेल्या रास्त दरातच कृषी निविष्ठा शेतकऱ्यांना उपलब्ध होतील. यामुळे शेतकऱ्यांची कुठेही फसवणूक होणार नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यास सुद्धा मदत होईल. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन निफाड पंचायत समिती उपसभापती शिवा सुराशे, तालुका कृषी अधिकारी बी. जी. पाटील यांनी केले. या वेळी मंडळ कृषी अधिकारी डी. एन. सोमवंशी, पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी बाळासाहेब खेडकर, सृष्टी फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे संचालक बापूसाहेब मोकाटे, शंकरराव शिंदे, दत्तात्रय मापारी, भीमराज पवार, केशव जाधव, चांगदेव शिंदे, दत्तु पवार, फकिरा गांगुर्डे, संतोष बोराडे, वाळुबा पवार यांसह व कृषी विभागातील कर्मचारी वर्ग उपस्थित होते.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com