ऊस बिलासाठी खते व्यापारी संघटना मैदानात

ऊस बिलासाठी खते व्यापारी संघटना मैदानात
ऊस बिलासाठी खते व्यापारी संघटना मैदानात

कोल्हापूर : चालू गळीत हंगाम सुरू होऊन दोन महिने झाले तरीदेखील ऊसदराची कोंडी फुटली नसून गेलेल्या अद्याप ही बिले शेतकरी बांधवांच्या खात्यावर जमा न झाल्याने पुढील पीक घेणे अडचणीचे ठरले आहे. तरी ऊसबिले त्वरित जमा करण्यात यावीत, या मागणीचे निवेदन कोल्हापूर जिल्हा बी-बियाणे, कीटकनाशके, खते व्यापारी संघटनेच्या वतीने बुधवारी (ता. ९) जिल्हाधिकारी व प्रादेशिक साखर सहसंचालक कोल्हापूर यांना देण्यात आले.

संघटनेच्या वतीन देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे आहे की, कोल्हापूर जिल्ह्यात ऊस गाळप होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटला तरीदेखील अद्याप ही ऊसबिले खात्यावर जमा झालेली नाहीत. त्यातच ऊसदर व एफआरपी याची ही कोंडी फुटलेली नाही. साखर कारखानदार, शासन व शेतकरी संघटना यांच्यात अनेक वेळा चर्चेच्या फेऱ्या झाल्या आहेत. मात्र, अद्याप ही यावर ठोस निर्णय झालेला नाही.

त्यातच चालू वर्षी ऊस उत्पादनात कमालीची घट झाली आहे. उत्पादन खर्च ही निघत नाही, अशा या सर्व घटकांचा परिणाम गोरगरीब शेतकरी वर्गावर झाला आहे. गेलेल्या ऊसपिकाचे पैसे हाती न आल्याने पुढील पिकाचे व्यवस्थापन करणे शेतकरी बंधूंना जिकिरीचे बनले आहे. यामुळे शेतकरी द्विधा मनस्थितित अडकले आहेत. पूर्णता शेतीवर आधारितच शेतकऱ्याचा संसार उभा असल्याने वेळेतच त्यांना त्यांच्या घामाचे दाम मिळणे गरजेचे आहे. 

शासन आणि साखर कारखानदार यांनी त्वरित या बाबींचा गांभीर्यपूर्वक विचार करून आमची मागणी करावी, या वेळी संघटनेच्या वतीने उपाध्यक्ष विकास कदम, सचिव सागर खाडे, खजानिस अशोक श्रीमाळ, नितीन जंगम, अभिजित खोत, संतोष कुंभार, संजय आढाव, शिवराज पाटील, राहुल हेरवाडे, रवी घेजी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने महसूल उपजिल्हाधिकारी अरविंद लाटकर व प्रादेशिक साखर सहसंचालक रावल यांच्या वतीने रमेश बराडे यांनी निवेदन स्वीकारले.

शेतकऱ्यांची कामे खोळंबली वाढत्या महागाईचा सामना करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. केवळ चर्चा आणि घोषणा करण्यापेक्षा ऊस दराची कोंडी त्वरित फोडून ऊसबिले शेतकरी बांधवांच्या खात्यावर करावित. जेणेकरून बाजारपेठेतील विस्कटलेल्या अर्थव्यवस्थेला अधिक बळकटी येईल व पुढील ऊस पिकाबरोबरच अन्य पिकांची लागवड, मशागत करणे सोईचे होईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com