खते दुकानातच नाहीत; मग बांधावर कशी मिळणार ः विखे पाटील

नगर : शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून, आघाडी सरकारातील मंत्री ‘हाताची घडी अन्‌ तोंडाला कुलूप’ लावून गप्प आहेत. खते दुकानातच नाहीत; मग बांधावर मिळणार कशी? असा सवाल आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला आहे.
Fertilizers are not only in the shop; Then how to get on the dam: Vikhe Patil
Fertilizers are not only in the shop; Then how to get on the dam: Vikhe Patil

नगर : शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून, आघाडी सरकारातील मंत्री ‘हाताची घडी अन्‌ तोंडाला कुलूप’ लावून गप्प आहेत. खते दुकानातच नाहीत; मग बांधावर मिळणार कशी? असा सवाल आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला आहे.

विखे पाटील म्हणाले, की महाबीज व खासगी बियाणे कंपन्यांनाही शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याचा आदेश सरकारने द्यावा. शेतकऱ्यांची बियाण्यांच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये सोयाबीन, बाजरी आणि इतरही पिकांचे उगवण क्षमता नसलेले बियाणे विकले गेले. सरकारच्या महाबीजकडूनही शेतकऱ्यांची फसवणूक व्हावी, हे अतिशय दुर्दैव आहे. सोयाबीनच्या उगवणक्षमतेचे निकष यंदा बदलल्याने हाती येईल तसे बियाणे राज्यात विकले गेले. बांधावर खते देण्याच्या योजनेचा पूर्णत: फज्जा उडाला. कृषी सहायकही बांधावर पोचू शकले नाहीत. खत खरेदीच्या पावत्या दिल्या जात नाहीत. स्टॉक आणि किमतीचे फलक लावलेले नाहीत. कृषी विभागातील अधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचा समन्वय नाही, अशी टीकाही श्री. विखे यांनी केली.

कृषी अधिकारी नेमके काय करतात नगर जिल्ह्यात सोयाबीन, बाजरी बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी आहेत. मात्र, त्याबाबत कृषी विभागाकडून अजूनही कारवाई झालेली नाही. ते दुर्लक्ष करत असल्याने कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कामाबाबत शंका निर्माण होत आहेत. कृषी विभागाचे अधिकारी कारवाई करत नसतील तर ते नेमके काय करतात असा प्रश्न विखे यांनी उपस्थित केला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com