Agriculture news in marathi Fertilizers, seed shops still closed in Nagar district | Agrowon

नगर जिल्ह्यामध्ये खते, बियाण्याची दुकाने अद्याप बंदच 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 27 मार्च 2020

नगर : लॉकडाऊनच्या काळात शेतीची कामे अडकू नयेत यासाठी खते, बियाण्यांची दुकाने चालू ठेवण्याचे सरकारचे आदेश आहेत. मात्र, गर्दी होत असल्याच्या कारणाने नगर जिल्ह्यामध्ये ही दुकाने बंदच आहेत. कृषी विभाग आणि जिल्हाधिकारी यांच्यात याबाबत चर्चा झाली असून दोन दिवसांत ती दुकाने सुरू करण्याबाबत निर्णय होणार आहे. 

नगर : लॉकडाऊनच्या काळात शेतीची कामे अडकू नयेत यासाठी खते, बियाण्यांची दुकाने चालू ठेवण्याचे सरकारचे आदेश आहेत. मात्र, गर्दी होत असल्याच्या कारणाने नगर जिल्ह्यामध्ये ही दुकाने बंदच आहेत. कृषी विभाग आणि जिल्हाधिकारी यांच्यात याबाबत चर्चा झाली असून दोन दिवसांत ती दुकाने सुरू करण्याबाबत निर्णय होणार आहे. 

कोरोनाचा संसर्ग रोखण्याच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन झालेले असले तरी ग्रामीण भागात शेतीची कामे रखडू नयेत यासाठी खते, बियाणे कीटकनाशके व अन्य निविष्ठा विक्रीची दुकाने सुरू ठेवण्याबाबत सरकारने आदेश दिलेले आहेत, मात्र ही दुकाने उघडी ठेवल्यास गर्दी होण्याच्या भीतीने नगर जिल्ह्यात बहुतांश दुकाने बंदच आहेत. 

दुकान उघडले की गर्दी होते. त्यामुळे पोलिस दुकान बंद करण्यास सांगतात. यामुळे मात्र शेतीची कामे अडली आहेत. खरीप हंगाम तोंडावर आल्याच्या पार्श्वभूमीवर खते, बियाणे जीवनावश्यक वस्तूच मोडते. कृषी आयुक्तांचे आदेश असतानाही दुकाने बंद असल्याच्या पार्श्वभूमीवर काही शेतकऱ्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडे चर्चा केली. त्यांनी जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांच्याशी चर्चा केली आहे. खते, बियाण्यांची दुकाने चालू ठेवण्याबाबत दोन दिवसात निर्णय होणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी सांगितले. 
 


इतर बातम्या
नांदेड, परभणी, हिंगोलीत वादळी पावसाने...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील अनेक...
गोंदिया जिल्हा बॅंकेची कर्जपरतफेडीस...गोंदिया ः ‘कोरोना’च्या पार्श्‍वभूमीवर देशभरात...
कमी दरात काजू खरेदीचा काही दलालांचा...सिंधुदुर्ग ः ‘कोरोना’मुळे निर्माण झालेल्या...
सोनुर्ली येथील स्वस्त धान्य दुकानाचा...चंद्रपूर : स्वस्त धान्य दुकानातील धान्याची...
खडकी ग्रामस्थांनी केल्या गावसीमा बंदभंडारा ः केंद्र सरकारकडून जारी करण्यात आलेल्या...
सोलापूरच्या पालकमंत्रीपदी जितेंद्र...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री...
मालेगाव तालुक्यातील कृषी सेवा केंद्रे...वाशीम  : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव...
जळगावात खासगी डेअरी चालक,...जळगाव  ः जिल्ह्यात दुधाच्या वितरणात येणाऱ्या...
पुणे जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, सदस्य...पुणे  : ‘कोरोना’ या राष्ट्रीय आपत्ती...
अत्यावश्यक सेवेतील शेतीमाल वाहतुकीस...सोलापूर  ः अत्यावश्यक सेवा म्हणून माल वाहतूक...
नगरमध्ये शिवभोजन केंद्रे पुन्हा सुरूनगर ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर गरजूंची उपासमार...
‘कोरोना’च्या राज्यात दिवसाला ५५००...मुंबई : राज्यात ‘कोरोना’ चाचण्यांची सुविधा देशात...
`तुम्ही घरी थांबा,आम्ही अखंडित...नाशिक : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
अकोल्यात शेतकरी उत्पादक गटांकडून घरपोच...अकोला  ः कृषी विभागाच्या कृषी तंत्रज्ञान...
सिन्नर तालुक्यात गारपिटीच्या तडाख्यात...नाशिक : सिन्नर तालुक्यातील पूर्व भागात दातली...
बेदाणा निर्मितीसाठी प्रोत्साहनपर अनुदान...नाशिक: कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशात...
विरवडे येथील सीना नदीत वाळू उपसा करणारे...सोलापूर  ः विरवडे (ता.मोहोळ) येथे सीना...
विदर्भ, मराठवाड्यात पुर्वमोसमीच्या सरी पुणे: राज्यात पुर्वमोसमी पाऊस आणि गारपीटीचे सत्र...
थेट विक्रीसाठी शेतकरी, गटांचा सहभाग...औरंगाबाद: शहरातील ग्राहकांकडून संचार बंदीच्या...
अतिरिक्त दूध शासन खरेदी करणार पुणे: राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा...