सोलापुरात खते, बियाणे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर

यंदाच्या हंगामासाठी खते आणि बियाण्यांचा पुरवठा वेळेत आणि पुरेसा उपलब्ध झाला आहे. तसेच शेतकऱ्यांपर्यंतही तो पोचत आहे. या कामात शेतकरी गट आणि शेतकरी कंपन्यांची मोठी मदत होते आहे. - रविंद्र माने, कृषि उपसंचालक,कृषी विभाग, सोलापूर
Fertilizers, seeds in Solapur directly on farmers farm
Fertilizers, seeds in Solapur directly on farmers farm

सोलापूर : यंदाच्या खरिपासाठी शेतकऱ्यांना थेट बांधावर खते आणि बियाणे पोच करण्याची योजना कृषी विभागाने आखली आहे. शेतकरी गटांच्या माध्यमातून ही मोहीम आखण्यात येत आहे. जिल्ह्यातील ४०२३ गटांमार्फत जिल्ह्यात आतापर्यंत १६ हजार ५२८ शेतकऱ्यांना ३४६ क्विंटल बियाणे आणि ४५४३ मेट्रिक टन खताचा पुरवठा थेट बांधावर केला आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कृषिमंत्री दादा भुसे यांनी या विषयाला प्राधान्य देऊन खते-बियाणे शेतकऱ्यांना बांधावर पोचवण्यासाठी सूचना दिल्या आहेत. त्यानुसार ही कार्यवाही केली जात आहे. त्यासाठी ‘आत्मा’अंतर्गत स्थापन करण्यात आलेले गट आणि शेतकरी कंपन्यांची मदत घेण्यात येत आहे. या कामात शेतकरी गट आणि शेतकरी कंपन्याची भूमिका फार मोठी आहे. त्यांच्या सहकार्यामुळे शेतकऱ्यांना खते-बियाणांचा पुरवठा थेट होऊ शकतो आहे. 

आतापर्यंत उत्तर सोलापूर तालुक्यात ७८३ शेतकऱ्यांना, दक्षिण सोलापूर तालुक्यात २१०३, अक्क्लकोट तालुक्यात ५०१, मोहोळमध्ये ४९३, बार्शीत ३२०८, माढ्यात ४५०, करमाळ्यात ३८३६, पंढरपुरात ४४५७, माळशिरसमध्ये ७८९, सांगोल्यात ८१३, मंगळवेढ्यात २१८ शेतकऱ्यांना खते व बियाणे वाटप करण्यात आले. आतापर्यंत बार्शी तालुक्यात सर्वाधिक ५८ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा करण्यात आला. तर, पंढरपूर तालुक्यात सर्वाधिक १ हजार ३१ मेट्रिक टन खतांचा पुरवठा करण्यात आला. आणखीही काम चालू आहे. आणखी काही गट आणि कंपन्या खताच्या ऑर्डर देऊन तो पोच करण्याबाबत नियोजन करत आहेत. कृषि विभागानेही त्यासाठी पुढाकार घेतला आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com