खत विक्रीत वाढ

देशात कोविड १९ ची समस्या तसेच लॉकडाउन असतानाही खत विक्रीत चांगली झाली.
urea
urea

पुणे : देशात कोविड १९ ची समस्या तसेच लॉकडाउन असतानाही खत विक्रीत चांगली झाली. मात्र दुसऱ्या बाजूला खतावरील सरकारकडून येणारे अनुदान थकीत राहत असल्याने खत उद्योगाला चिंतेत टाकणारे आहेत. लॉकडाउनमध्ये खत उद्योगाला मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागले. मजुरांची टंचाई, रसायनांचा तुटवडा, खत पिशव्यांची टंचाई जाणवली. मात्र केंद्र शासनाने हस्तक्षेप करून या समस्या मार्गी लावल्या. त्यामुळे खत विक्री घटली नाही, असे खत उद्योगातून सांगण्यात आले.  देशात एप्रिल ते सप्टेंबरमधील सहामाहीची खत विक्री खत कंपन्यांसाठी आशादायक ठरली आहे. शेतकऱ्यांनी गेल्या वर्षीच्या सहामाहीच्या तुलनेत यंदा ४.९ टक्के युरिया जादा विकत घेतला. युरियाचे उत्पादन देशांतर्गत वाढवून देखील मागणी चांगली राहिल्यामुळे युरिया आयातीत या सहामाहीत २२ टक्के वाढ झाली आहे.  डीएपीचे देशांतर्गत उत्पादन मात्र ११ टक्क्यांनी घटली आहे. मात्र दुसऱ्या बाजूला आयात १२ टक्क्यांनी वाढली आहे. एमओपी आयातदेखील ३.९ टक्क्यांनी लाढल्याचे खत उद्योग सूत्रांचे म्हणणे आहे.   “देशातील खत विक्री किंवा आयात वाढीला चांगला मॉन्सून, वाढता पेरा कारणीभूत राहिला आहे. विशेष म्हणजे कीड-रोगांचा कमी प्रादुर्भाव होता. तेलबिया, ऊस आणि कापूस लागवडीत झालेली वाढ रासायनिक खतांच्या विक्रीला प्रोत्साहन देणारी ठरली,” असे सूत्रांनी स्पष्ट केले.  खताचा वापर वाढत असताना खत उत्पादक कंपन्यांना सरकारी अनुदान वेळेत मिळत नसल्याने समस्या वाढल्या आहेत.  गेल्या वर्षी अनुदानाचे ३९ हजार कोटी रुपये थकीत होते. अनुदानासाठी अर्थसंकल्पात ७७ हजार कोटींची तरतूद करून देखील ४८ हजार कोटी रुपयांच्या आसपास रक्कम थकीत राहिली. ‘खत उद्योगाची आर्थिक घडी बसविण्यासाठी विशेष पॅकेज, जीएसटीमध्ये सूट या मुद्द्यांचा विचार सरकारला करावा लागेल,’ असे खत उद्योग कंपन्यांचे म्हणणे आहे.

एप्रिल ते सप्टेंबरमधील खत विक्रीतील वाढ (टक्क्यांत)

  युरिया १५.७ 
  डीएपी   ५१.१  
  संयुक्त खते   ३९.४  
  एमओपी     ३६.७  
  एसएसपी ८.४  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com