Agriculture news in marathi Fertilizers should be procured as per MRP | Agrowon

‘एमआरपी’नुसारच खतांची खरेदी करावी 

टीम अॅग्रोवन
रविवार, 18 एप्रिल 2021

यंदाच्या खरीप हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ‘एमआरपी’नुसारच रासायनिक खतांची खरेदी करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. 

सोलापूर ः यंदाच्या खरीप हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ‘एमआरपी’नुसारच रासायनिक खतांची खरेदी करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. 

खत विक्रेत्यांकडे सध्या जुन्या आणि नवीन दोन्ही प्रकारचा रासायनिक खतसाठा आहे. विक्रेत्याने जुना खतसाठा यापूर्वीच्या एमआरपीप्रमाणे विकणे बंधनकारक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी रासायनिक खतांची खरेदी करताना विक्रेत्यांकडे ई-पॅास मशिनवरील बिलाचा आग्रह धरावा. जुन्या साठ्याचे दर त्यामुळे शेतकऱ्यांना समजतील. खरेदी केलेल्या खताची पक्की पावती घ्यावी, असे आवाहनही केले आहे. खरेदी केलेल्या पोत्यांवरील खताची एमआरपी आणि विक्रेत्यांनी दिलेले पक्के बिल तपासून घ्यावे. शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. 

शेतकऱ्यांना काही तक्रार असल्यास त्यांनी ०२१७-२७२६०१३ या दूरध्वनी क्रमाकांवर संपर्क साधावा. ग्रामपंचायत स्तरावर जमीन सुपीक निर्देशांक फलक लावण्यात आले आहेत. त्यानुसार क्षेत्रीय स्तरावरील कृषी सहायक आणि कृषी पर्यवेक्षक यांचे मार्गदर्शन घेऊन जमिनीची सुपीकता निर्देशांकानुसार रासायनिक खतांचा संतुलित वापर करावा, असेही कृषी विभागाने दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. 


इतर ताज्या घडामोडी
सोयाबीन बियाणे निर्बंध मध्य प्रदेशकडून...पुणे ः परराज्यांत सोयाबीन बियाणे विक्रीवर निर्बंध...
‘महाबीज’चे सोयाबीन बियाणे दर ‘जैसे थे’अकोला : खरीप हंगामासाठी ‘महाबीज’ने सोयाबीन...
देशाच्या तुलनेत निम्मी साखर एकट्या...कोल्हापूर : देशाच्या साखरनिर्यात कोट्यापैकी जवळ...
‘गोकुळ’चा कल सत्तांतराकडेकोल्हापूर : अत्यंत चुरशीने झालेल्या कोल्हापूर...
‘सह्याद्री’च्या पर्वतरांगेमधून...नाशिक : सह्याद्रीच्या पर्वतरांगेत पश्‍चिम घाट...
राज्यात आंब्याचा हंगाम ऐन बहरातअकोल्यात बदाम आंबा ४००० ते ४५०० रुपये क्विंटल...
सोशल मीडियाद्वारे ६५ टन कलिंगड विक्रीपुणे : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी एप्रिल...
मध्य प्रदेश सरकारकडून बियाणे विक्रीवर...पुणे ः सोयाबीन बीजोत्पादनात देशात सर्वात मोठा...
पशुखाद्य निर्मितीचा कच्चा माल दुपटीने...सांगली : पशुखाद्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या...
दक्षिण भागात गारपिटीची शक्यतापुणे :  गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका...
परभणी जिल्ह्यात कडक निर्बंध लागूपरभणी ः  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी...
परभणी जिल्ह्यात लघु तलावांत सरासरी १९...परभणी ः वाढते तापमान, बाष्पीभवनाचा वाढलेला वेग,...
नाशिक जिल्ह्यात बाजार समित्यांमध्ये...नाशिक : पणन विभागाच्या परिपत्रकात सलग ३...
नाशिक : 'ऑक्सिजन एक्स्प्रेस'द्वारे २७....नाशिक : ‘‘जिल्ह्यातील प्राणवायूची तूट भरून...
सांगलीत केळीच्या क्षेत्रात घट होण्याची...सांगली ः जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात झालेल्या...
रत्नागिरीत ३७ टन काजू बी तारणरत्नागिरी ः काजूचे बाजारातील दर घसरल्यानंतर...
आदिवासी विकास मंडळ करणार गव्हाची खरेदीयवतमाळ : आदिवासी विकास महामंडळाकडून राज्यात...
परभणीत सोयाबीनचे दीड हजार क्विंटल...परभणी ः परभणी तालुक्यात यंदा ११० हेक्टरवर उन्हाळी...
भुईमुगाचे वाण निकृष्ट, कंपन्यांवर...यवतमाळ : जिल्ह्यात भुईमुगाच्या शेंगा न धरण्याचे...
नगरमध्ये महावितरणच्या पायाभूत सुविधांचे...नगर : कृषिपंप वीज धोरण २०२०च्या अंमलबजावणीमुळे...