श्री स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळा भक्‍तिभावाने साजरा

स्वामी समर्थ प्रकट सोहळा
स्वामी समर्थ प्रकट सोहळा

अक्कलकोट, जि. सोलापूर ः लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री वटवृक्ष स्वामी समर्थ महाराज देवस्थान (मूळस्थान) अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन सोहळा हजारो भाविकांच्या उपस्‍थितीत मोठ्या भक्‍तिभावाने रविवारी (ता. ७) पार पडला.  रविवारी पहाटे ५ वाजता श्रींची काकड आरती मंदिराचे पुजारी मोहन महाराज यांच्या हस्ते व समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या उपस्‍थितीत करण्यात आली. स्वामी भक्तांच्या गर्दीमुळे स्वामींचे दर्शन भाविकांना सुलभतेने होणेकरिता स्वामी भक्तांच्या वतीने नित्यनियमाने होणारे अभिषेक बंद ठेवण्यात आले होते. अभिषेकाची पावती करणाऱ्या स्वामी भक्तांना श्रीफळ, खडीसाखर प्रसाद देण्यात येता होता. सकाळी १० ते १२ या वेळेत जाेतिबा मंडपात देवस्थानचे विश्वस्त उज्‍ज्वलाताई सरदेशमुख यांच्या नेतृत्वाखाली महिला भजनी मंडळ अक्कलकोट यांच्या वतीने भजन करण्यात आले, त्यानंतर पाळणा कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर पुन्हा आरती करण्यात आली. सकाळपासून भजनगीत, पाळणा व आरती होऊन स्वामींचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. दुपारी १२ ते ३ या वेळेत देवस्थानच्या मैंदर्गी-गाणगापूर रोडवरील देवस्थानच्या भक्त निवास भोजनकक्ष येथे सर्व स्वामी भक्तांना स्वामी प्रसाद म्हणून भोजन प्रसाद देण्यात आले. दुपारी ४ ते ६ या वेळेत देवस्थानच्या जाेतिबा मंडपात व्यंकटेश संगीत विद्यालय सोलापूर यांच्या वतीने रसिका / सानिका कुलकर्णी यांचा शास्त्रीय राग गायनाचा सुमधुर भावभक्तिगीतांचा कार्यक्रम संपन्न झाला. गुढीपाडवा व रविवारच्या सलग सुट्यांमुळे दिवसभरात हजारो स्वामी भक्तांनी स्वामींचे दर्शन घेतले.   याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त विलासराव फुटाणे, महेश गोगी, श्रीशैल गवंडी, श्रीनिवास इंगळे, प्रदीप हिंडोळे, बाळासाहेब घाटगे, साईप्रसाद सामंत, अक्षय सरदेशमुख, श्रीपाद सरदेशमुख, प्रा. शिवशरण अचलेर, प्रसाद सोनार, ज्ञानेश्वर भोसले, संतोष जमगे, स्वामीनाथ लोणारी, संजय पवार, अमर पाटील, महादेव तेली, संजय पाठक, सागर गोंडाळ, गिरीश पवार, दीपक जरीपटके आदींसह असंख्य स्वामीभक्त उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com