agriculture news in marathi, few plants are alive, nagar, maharashtra | Agrowon

नगर जिल्ह्यात ग्रामपंचायतींनी लावलेली निम्मीच रोपे जिवंत

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

नगर : पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य देत शासनाने वृक्षलागवड मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेतून दोन वर्षांत (२०१६-१७ व २०१७-१८) जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या माध्यमातून पाच लाख ९७ हजार २०४ वृक्षांचे रोपण करण्यात आले. त्यातील सरासरी ६० टक्केच रोपे जिवंत आहेत. त्यात पहिल्या वर्षीची ५३.०१ तर दुसऱ्या वर्षीची ६२.९० टक्के रोपे जिवंत असल्याचे सांगण्यात आले.

नगर : पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य देत शासनाने वृक्षलागवड मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेतून दोन वर्षांत (२०१६-१७ व २०१७-१८) जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या माध्यमातून पाच लाख ९७ हजार २०४ वृक्षांचे रोपण करण्यात आले. त्यातील सरासरी ६० टक्केच रोपे जिवंत आहेत. त्यात पहिल्या वर्षीची ५३.०१ तर दुसऱ्या वर्षीची ६२.९० टक्के रोपे जिवंत असल्याचे सांगण्यात आले.

दुष्काळावर मात करायची असेल तर झाडे लावा झाडे जगवा असे आवाहन करत शासनाने लोकसहभाग, वन विभाग, सामाजिक वनीकरण आणि अन्य सरकारी विभागासह शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायती आणि प्रत्येक नागरिकाच्या मदतीने वृक्षलागवड मोहीम सुरू केली आहे. त्यानुसार दोन वर्षांपासून राज्यात वृक्षलागवड केली जात आहे.

राज्यातील अनेक भागाला काही वर्षांपासून दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. वृक्षांची संख्या कमी झाल्यानेच दुष्काळाशी सामाना करावा लागत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने वृक्षलागवड मोहिमेत सहभागी होण्याचे नागरिकांना आवाहन केले होते. त्यानुसार यंदा या मोहिमेला प्रतिसादही चांगला मिळाला आहे.

जिल्ह्यामध्ये पहिल्या वर्षी ग्रामपंचायतीमार्फत १ लाख चार हजार १६ रोपांची लागवड करण्यात आली होती. त्यातील ५५ हजार १३६ झाडे जगली. लावलेल्या रोपांच्या तुलनेत ५३.०१ टक्के रोपे जगली. गतवर्षी ४ लाख ९३ हजार १८८ रोपांची लागवड केली. त्यातील ३ लाख १० हजार २३० म्हणजे ६२.९० टक्के रोपे आजमितीला जिवंत आहेत. पहिल्या वर्षी रोपे जगवण्यात कोपरगाव, राहाता, राहुरी पुढे आहे तर शेवगाव, नगर तालुक्‍यात सर्वांत कमी रोपे जिवंत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

गतवर्षीची रोपे जिवंत ठेवण्यात अकोले, जामखेड, कर्जत, कोपरगाव, पाथर्डी, राहाता, श्रीगोंदा, राहुरी तालुके पुढे आहेत. शेवगाव, नगर मात्र मागेच असल्याचे जिल्हा परिषदेतून सांगण्यात आले.

यंदा चौदा लाख रोपांची लागवड
यंदा ग्रामपंचायतींना वृक्षारोपण मोहिमेसाठी चांगला प्रतिसाद मिळाला. जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत विभागासह अन्य विभागांनी यंदा गतवर्षीच्या तुलनेत तिप्पट वृक्षांचे रोपण केले आहे. यंदा जिल्हा परिषदेने लावलेल्या १४ लाख ७३ हजार १६४ रोपांपैकी १४ लाख ३२ हजार ०१८ रोपे ग्रामपंचायतीमार्फत लावण्यात आली आहेत. विशेष म्हणजे शासनाकडून दिलेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत अधिक वृक्षारोपण झाले असले तरी त्यातील किती प्रमाणात वृक्ष जिवंत राहतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


इतर ताज्या घडामोडी
कोल्हापूर बाजार समिती नोकर भरतीविरोधात...कोल्हापूर: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
नगर : मक्‍याला हमीभावापेक्षा कमी दर...नगर ः रब्बी हंगामामध्ये शासनाच्या किमान आधारभूत...
सातारा जिल्ह्यात खरिपाच्या ८२.८५ टक्के...सातारा  ः पावसाचा काहीसा जोर वाढल्याने...
पुणे बाजार समितीसह उपबाजार ...पुणे  ः ‘कोरोना’च्या फैलावामुळे शहरातील...
नगर जिल्ह्यात एक लाख १७ हजार हेक्टरवर...नगर  ः जिल्ह्यात यंदा जुलैच्या पहिल्याच...
अमरावतीत बियाणे कंपनीकडून ९०१ बॅग, २२...अमरावती : जिल्ह्यात सोयाबीन बियाणे उगवणीबाबत १...
कोविड-१९ रुग्णांच्या वास, चव संवेदनांवर...कोविड १९ च्या आजारातून बरे झाल्यानंतरही सुमारे ९०...
खानदेशात दुबार पेरणीसाठी ताग, बाजरी,...जळगाव  ः खानदेशात दुबार पेरणी आटोपली आहे....
जळगावमधील सिंचन प्रकल्पांची कामे...जळगाव  ः जिल्ह्यात तापी व गिरणा नदीवर...
निकृष्ट बियाणेप्रकरणी सर्व कंपन्यांवर...नगर: जिल्ह्यात गेल्या एक महिन्याच्या कालावधीत...
बॅंकांनी पीककर्ज प्रकरणे तत्काळ मार्गी...वर्धा  ः जिल्ह्यात पात्र शेतकऱ्यांपैकी एकही...
गोंदिया जिल्ह्यात युरियाची टंचाईगोंदिया  ः पावसामुळे धान रोवणीला वेग आल्याने...
औरंगाबाद जिल्ह्यात खतांचा पुरवठा सुरळीत...औरंगाबाद : जिल्ह्यात ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर...
अकोल्यात तूर सरासरी ५८०० रुपये क्विंटलअकोला  ः  येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगली जिल्ह्यातील तीन केंद्रांवर २०२३...सांगली  ः जिल्ह्यात हमीभावाने मका खरेदीसाठी...
रत्नागिरी जिल्ह्यात भात, नाचणी पिकासाठी...रत्नागिरी  : रत्नागिरी जिल्ह्यात भात, नाचणी...
आरोग्यदायी दालचिनीमसाल्यांच्या पदार्थांत, घरात मसाला करताना...
कोकण, कोल्हापूर पट्ट्यात मुसळधार...कोकण व कोल्हापूर भागावर १००२ तर महाराष्ट्रावर...
कोल्हापुरात दिड हजार, खते, बियाणे...कोल्हापूर  : बियाण्यांच्या उगवणीप्रश्नी...
सांगली जिल्ह्यात दोन लाख १९ हजार हेक्‍...सांगली : जिल्ह्यात पावसांचा खंड असला तरी  ...