agriculture news in Marathi FIAF says review agri reform Maharashtra | Agrowon

कृषी सुधारणांचा वेळोवेळी आढावा घ्याः ‘एफएआयएफए’

वृत्तसेवा
सोमवार, 27 जुलै 2020

केंद्र सरकारने या सुधारणांचा शेतकऱ्यांशी सल्लामसलत करून आढावा घ्यावा, अशी मागणी ऑल इंडिया फार्मर्स असोसिएशनने (एफएआयएफए) केली आहे.

नवी दिल्लीः केंद्र सरकार ‘पीएम-किसान’ योजनेसह ‘आत्मनिर्भर भारत’च्या तिसऱ्या टप्प्यात जाहीर केलेल्या ‘शेती सुधारणेचे आठ टप्पे’ या योजनांच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात सुधारणा करत आहे.  शेती आणि शेतकऱ्यांसाठी करत असलेल्या सुधारणांचे कौतुक आहे. मात्र केंद्र सरकारने या सुधारणांचा शेतकऱ्यांशी सल्लामसलत करून आढावा घ्यावा, अशी मागणी ऑल इंडिया फार्मर्स असोसिएशनने (एफएआयएफए) केली आहे. 

‘एफएआयएफए’ आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, गुजरात आदी राज्यांतील शेतकरी आणि शेतमजुरांचे प्रतिनिधित्व करणारी संघटना आहे. ‘एफएआयएफए’ केंद्र सरकारने नुकतेच जाहीर केलेल्या शेतमाल विक्रीसंदर्भात काढलेल्या फारर्मर्स ट्रेड ॲण्ड कॉमर्स (प्रमोशन ॲण्ड फॅसिलिटेशन) ऑर्डिनन्स, २०२०, द फार्मर्स (एम्पावर्मेंट ॲण्ड प्रोटेक्शन) ॲग्रीमेंट ऑन प्राइस अशुरन्स ॲण्ड फार्म सर्व्हिसेस ऑर्डिनन्स, २०२० आणि द इसेन्शल कमोडीटी (अमेंडमेंट) ऑर्डिनन्स, २०२० संदर्भातही शेतकऱ्यांशी चर्चा करण्याची मागणी केली आहे. 

केंद्र सरकारने आणलेली पुरोगामी धोरणे योग्यपणे राबविण्यासाठी योग्य पावले उचलावी आणि या धोरणांचा वेळोवेळी आढावा घ्यावा. ‘एफएआयएफए’ चे अध्यक्ष जावारे गौडा म्हणाले, केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी केलेल्या सुधारणांचे आम्ही कौतुक करतो. देशभरातील शेतकऱ्यांना या सुधारणांचा फायदा होण्यासाठी सरकार योग्य पावले उचलून अंमलबजावणी करेल, अशी आशा आहे. सरकारने या धोरणांचा शेतकऱ्यांमध्ये जागरूकता आणि शिक्षणाचा प्रसार करावा. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये या धोरणांविषयी अपप्रचार होणार नाही आणि त्यांना योग्य फायदा मिळेल.

‘एफएआयएफए’ने मांडलेले मुद्दे

  • कृषी सुधारणांच्या केंद्राच्या धोरणाचे स्वागत
  • केंद्राने शेतकऱ्यांची जुन्या जोखडातून सुटका केली
  • शेतकऱ्यांशी सल्लामसलत करून सुधारणांचा आढावा घ्या
  • शेतकऱ्यांमध्ये सुधारणांविषयी जागरुकता करावी
  • शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासाठी योग्य पावले उचलावी
  • धोरणांची अंमलबजावणी जलद आणि योग्यरितीने व्हावी

इतर अॅग्रोमनी
बाजारातील असंतुलनामुळे सोयाबीनची दरवाढपुणे ः जागतिक बाजारात सध्या सोयाबीन दरात झालेली...
कापूस आवक वाढूनही दर स्थिरावले जळगाव ः  कापड उद्योगातील वाढती महागाई व...
सोयाबीनमधील तेजी कायम पुणे ः आवक कमी मात्र मागणी जास्त असल्याने देशातील...
सोयाबीन दरात सुधारणा पुणे ः सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी यंदा...
आयात उडदाला ग्राहक मिळेना पुणे : देशात यंदा उडीद उत्पादनात घट झाली मात्र...
तुरीचे दर स्थिरावले; नवीन तूर पुढील...पुणे : देशातील नवीन तूर डिसेंबरपासून बाजार येणार...
खानदेशात कापसाच्या खेडा खरेदी दरात वाढजळगाव : खानदेशात कापसाची किमान ८६०० व कमाल ९२००...
कापूस उत्पादक देशांमध्ये पुरवठा २०...जळगाव : जगात कापसाचा मोठा तुटवडा तयार होत आहे....
कंटेनर्सची टंचाई पुढील वर्षीही...पुणे : चालू वर्षीत शेतीमालासह इतर वस्तूंच्या...
धनत्रयोदशीला जळगावात ३० किलो सोने विक्रीजळगाव : जळगावची केळी व अस्सल सोन्यासाठी सुवर्ण...
जगभरात कापसाचे दर चढेच राहतीलपुणे : जागतिक कापूस वापरात होणारी वाढ, कमी शिल्लक...
तुरीला हवा हमीभाव खरेदीचा आधारपुणे : पुढील महिन्यापासून नवीन तुरीची बाजारात आवक...
दिवाळीमुळे हळदीला उठावपुणे : दिवाळीमुळे हळदीच्या मागणीत वाढ झाली आहे....
गुजरातमधून गुळाला मागणी वाढलीकोल्हापूर : यंदा गुजरातमधून गुळाला मागणी वाढत आहे...
खाद्यतेलाच्या दराऐवजी सोयाबीन दरात मोठी...पुणे : निवडणुका आणि सणांच्या पार्श्‍वभूमीवर...
मोदीजी, तुमच्यासारख्या व्यक्तीकडून ही...अहमदाबाद, गुजरात : खरिपातील तेलबिया बाजारात...
मागणीमुळे कापसाला यंदा दराची झळाळीपुणे : कोरोनानंतरच्या काळात वाढलेली मागणी आणि...
खाद्यतेलाच्या वाढत्या दरामुळे मोहरीच्या...पुणे : खाद्यतेलाच्या वाढत्या दर आणि...
देशांतर्गत कडधान्य उत्पादनवाढ गरजेचीपुणे : गेल्या तीन दशकांत कडधान्य लागवड आणि...
भारतीय साखरेसाठी यंदा ‘फिलगुड’गेल्या महिन्याच्या कालावधीत साखर उद्योगासाठी...