agriculture news in Marathi, fiasco irrigation well scheme, Maharashtra | Agrowon

गोंदिया जिल्ह्यात सिंचन विहीर योजनेचा उडाला फज्जा
टीम अॅग्रोवन
शनिवार, 2 नोव्हेंबर 2019

गोंदिया ः जिल्ह्यात मागेल त्याला विहीर योजनेचा पुरता फज्जा उडाला आहे. जिल्ह्याला मिळालेल्या ११०० उद्दिष्टांपैकी ३८८ विहिरींनाच मंजुरी देण्यात आली असून, त्यांचेही काम गेल्या सात महिन्यांत पुढे सरकले नाही. प्रशासनाच्या या उदासीन धोरणाबद्दल शेतकऱ्यांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. 

गोंदिया ः जिल्ह्यात मागेल त्याला विहीर योजनेचा पुरता फज्जा उडाला आहे. जिल्ह्याला मिळालेल्या ११०० उद्दिष्टांपैकी ३८८ विहिरींनाच मंजुरी देण्यात आली असून, त्यांचेही काम गेल्या सात महिन्यांत पुढे सरकले नाही. प्रशासनाच्या या उदासीन धोरणाबद्दल शेतकऱ्यांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. 

आदिवासीबहुल आणि नक्षलप्रवण अशी गोंदिया जिल्ह्याची ओळख. धान (भात) हे या भागातील मुख्य पीक आणि शेती हेच रोजगाराचे मुख्य साधन. पावसाने खंड दिल्यास या भागातील शेतकरी, शेतमजुरांना रोजगाराच्या शोधात स्थलांतर करावे लागते. ही बाब लक्षात घेता शासनाने विदर्भात १३ हजार सिंचन विहिरींचा धडक कार्यक्रम हाती घेतला आहे. त्याअंतर्गत गोंदिया जिल्ह्याला २०१९-२० या वर्षाकरिता सुमारे ११०० विहिरींचे उद्दिष्ट आहे. त्या तुलनेत विहिरीची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिकच आहे.

असे असताना जिल्हा परिषद लघू पाटबंधारे विभागाकडून आहे ते उद्दिष्ट साध्य होण्यासाठीदेखील प्रयत्न केले जात नसल्याचे वास्तव समोर आले आहे. २०१९-२० या वर्षातील सात महिने लोटले; परंतु आजवर एकाही विहिरीच्या बांधकामाला सुरवात झाली नाही. मंजुरी मिळालेल्या विहिरींचे वर्गीकरण केल्यास त्यामध्ये एक विहीर आत्महत्याग्रस्त कुटुंबाला देण्यात आली आहे.

उर्वरित ३८७ विहिरी दारिद्र्य रेषेखालील व्यक्‍तींना मंजूर करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे ११०० विहिरींचे उद्दिष्ट असलेल्या गोंदिया जिल्ह्यात आजवर सुमारे ४७८१ शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. त्यातील ५९२ शेतकऱ्यांचे अर्ज अपात्र ठरले आहेत. तिरोडा तालुक्‍यातील १०४३ पैकी १५६ अर्ज पात्र ठरले आहेत.  

तालुकानिहाय विहिरी

तिरोडा ९१
गोंदिया  २७
आमगाव
देवरी  ३७
सडक अर्जुनी   २२
सालेकसा   ३२
अर्जुनी मोरगाव   १२४
गोरेगाव  

    
 
 
 
 

इतर अॅग्रो विशेष
अनुदान नव्हे; योगदानच वाचवेल शेतीलावातावरण बदल आणि कोसळणाऱ्या पाऊस धारा अथवा कडक...
साखर निर्यातीची सुवर्णसंधीपावसाळी स्थितीमुळे निर्यात न होऊ शकलेल्या साखर...
कापूस लोकायची लाज राखते; पण आमचं काय? यवतमाळ : ‘‘आमच्या कापसापासून तयार कपड्यानं आमी...
कंपोस्ट खते बनविण्याच्या पद्धतीजमिनीचा कस टिकविण्यासाठी सेंद्रिय पदार्थांचा...
एकदम बाजार समित्या बरखास्त करू नका:...पुणे ः केंद्रीय अर्थमंत्र्यांनी बाजार समित्या...
पावसाने मोसंबीच्या उत्पादनातही संकटाची...औरंगाबाद : लिंबूवर्गीय फळपिकात 'राजा' पीक म्हणून...
आंतरराष्ट्रीय द्राक्ष चर्चासत्र आजपासूनपुणे: राष्ट्रीय द्राक्ष संशोधन (एनआरसीजी)...
राज्यात पीकहानी ७० लाख हेक्टरच्याही...पुणे : केंद्र शासनाला पाठविल्या जाणाऱ्या अहवालात...
राज्यात गारठा वाढला; नगर १२.१ अंशावरपुणे : किमान तापमानात घट होत असल्याने राज्यात...
साखर कारखान्यांसाठी कर्ज परतफेडीचा...नवी दिल्ली ः केंद्र सरकारने साखर कारखान्यांसाठी...
दोडका पिकाने उंचावले अर्थकारणधामणखेल (ता. जुन्नर, जि. पुणे) येथील चंद्रकांत...
पेरू विक्रीसाठी प्रसिद्ध पेरणे फाटापुणे जिल्ह्यातील हवेली आणि शिरूर तालुक्यांच्या...
जळगावचे उडीद मार्केट यंदा पोचले...उडीद उत्पादनात खानदेश अग्रेसर आहे. जळगावच्या...
पर्यायाविना निर्णय घातकच! ऑ नलाइन राष्ट्रीय कृषी बाजार (ई-नाम) अधिक...
नैसर्गिक आपत्तीपासूनचा धडा काही वेदनांमधून सुखद आनंदप्राप्ती होते, तर काही...
किमान तापमानात किंचित वाढपुणे  : राज्यात थंडीची चाहूल लागल्यानंतर...
बाजार समित्यांना सक्षम पर्याय द्याः...पुणे ः केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी...
पावसाने संत्र्यात ४० टक्के फळगळ; ४००...नागपूर : राज्याचे मुख्य फळपिकांत महत्त्वाचे स्थान...
हमीभावाने कापूस खरेदी २० नोव्हेंबरपासून...जळगाव : भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) व...
बारा लाख टन साखर निर्यातीचा मार्ग मोकळापुणे : केंद्र शासनाने मुदतवाढ दिल्यामुळे देशातील...