नगर जिल्हा परिषदेत सभापतिपदासाठी फिल्डिंग  

Fielding for the post of chairperson in the Zilla Parishad
Fielding for the post of chairperson in the Zilla Parishad

नगर ः नगर जिल्हा परिषदेत अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडीत भाजपला बाजूला ठेवून शिवसेना, राष्‍ट्रवादी, काँग्रेस, अपक्ष व अन्य आघाडीच्या सदस्यांना एकत्र केले. त्यामुळे भाजपला सपशेल माघार घ्यावी लागली. आता विषय समितीचे सभापतिपद पदरात पाडून घेण्यासाठी निष्ठावान सदस्यांसह त्यांच्या गॉडफादर नेत्यांनी फिल्डिंग लावली आहे. त्यामुळे विषय समितीच्या सभापतिपदासाठी कोणाचे वजन भारी भरते याकडे लक्ष लागले आहे. 

राज्याच्या राजकारणात शिवसेना, राष्‍ट्रवादी, काँग्रेस यांची आघाडी होऊन सरकार तयार झाले. त्याच धर्तीवर थेट नगर जिल्हा परिषदेतही यंदा अध्यक्ष उपाध्यक्षपदाच्या निवडी झाल्या. जिल्हा परिषदेत पक्षांच्या चिन्हावर निवडून आलेले काँग्रेसचे २३ तर राष्ट्रवादीचे १९ सदस्य आहेत. शिवसेनेचे सहा, भाजपचे चौदा, मंत्री शंकरराव गडाख यांच्या क्रांतिकारी शेतकरी पक्षांचे ५, महाविकास आघाडीचे चार आणि कम्युनिस्ट एक सदस्य आहे. नुकत्याच झालेल्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीत विखे गटासह भाजपचे सदस्य वगळता शिवसेना, राष्‍ट्रवादी, काँग्रेस, अपक्ष असे जवळपास ४४ सदस्य एकत्र आले. त्यामुळे भाजपला सपशेल माघार घ्यावी लागली. 

गेल्या अडीच वर्षांत काँग्रेसला अध्यक्षपदासह दोन समित्या, तर राष्ट्रवादीला उपाध्यक्षपदासह दोन समित्या होत्या. अध्यक्षपदावर काँग्रेसच्या शालिनीताई विखे होत्या. तर उपाध्यक्षपदावर राष्ट्रवादीच्या राजश्री घुले होत्या. त्या आता अध्यक्ष झाल्या आहेत. समाजकल्याण समितीचे सभापती उमेश परहर आणि बांधकाम समितीचे सभापती कैलास वाकचौरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे तर महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अनुराधा नागवडे व कृषी समितीचे सभापती अजय फटांगरे हे काँग्रेसचे सभापती होते. आता मात्र जिल्हा परिषदेतील राजकीय समीकरणे बदललेली आहेत. एकहाती पाठबळ दिलेल्या शिवसेना व गडाख यांच्या शेतकरी क्रांतिकारी पक्षाला व महाविकास आघाडीतील अपक्षालाही सभापतिपद द्यावे लागणार असल्याचे चित्र आहे. जिल्हा परिषदेत लवकरच विषय समितीच्या सभापतींची निवड होणार आहे. अध्यक्षपद राष्ट्रवादीला तर उपाध्यक्षपद काँग्रेसला मिळाले आहे. त्यामुळे आता दोन्ही काँग्रेसला साथ देणाऱ्या गडाख यांच्या शेतकरी क्रांतिकारी पक्षाला बांधकाम ही वजनदार समिती हवी असल्याची चर्चा चालू आहे.

वरिष्ठ पातळीवर चर्चा जिल्हा परिषदेतील विषय समितीच्या सभापतिपदावर संधी मिळावी, यासाठी सदस्यांसह त्यांच्या नेत्यांनी लक्ष घातले आहे. स्थानिक नेत्यांसह वरिष्ठ पातळीवरील नेत्यांत याबाबत चर्चाही सुरू आहेत. मात्र, त्याबाबतची माहिती बाहेर पडली तर अन्य दावेदार सावध होतील, असा कयास बांधून सभापतिपदाबाबत चर्चा चालू आहे, एवढेच सांगितले जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com